श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशनजवळील जागृत देवस्थान हनुमान मंदिरात काल हनुमान जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.काल पहाटे 4 वाजता एक तालात एक सुुरात भजने व हनुमान चालिसा पठण करण्यात आले. या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पहाटे 6 वाजता हनुमान जन्मोसत्वाचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. लहू कानडे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, सौ. भारती फंड, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रांताधिकारी अनिल पवार, सौ. सई अनिल पवार, माजी नगरसेवक दिलीप नागरे, रवी पाटील, पोलीस निरीक्षक संजय सानप, श्री. पगारे, हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनिलाल पोरवाल, खजिनदार सुनिल गुप्ता, काँग्रेेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, कुणाल करंडे, तेजस बोरावके, कुणाल करंडे, चंपालाल फोफळे, चंदू गुप्ता, सुर्यकांत तांबडे, आदिंनी दर्शन घेवून अभिषेक केला.सायंकाळी 5 ते 5.30 वाजता हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. रात्री 8.00 ते 8.30 वाजता श्री महाआरती करण्यात आली होती. पहाटे हनुमान जन्मोत्सवादरम्यान ढोल ताशांच्या गजरात, मंत्रोच्चाराच्या सुरात तसेच फटाक्यांच्या अतिषाबाजीत हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.हनुमान जन्मोत्सवानिमित्त यावेळी स्व. चंद्रप्रकाश खुशिराम गुप्ता यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या भंडार्याचा कार्यक्रम गुप्ता परिवाराच्यावतीने काल संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान आयोजित करण्यात येवून भाविकांनी त्याचा लाभ घेतला.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान ट्रस्ट, हनुमान मंदिर सेवेकरी व भाविकांसह ट्रस्टचे चेअरमन मणिलाल पोरवाल, खजिनदार सुनिल गुप्ता, चंपालाल फोफळे, सुभाष फेगडे, राजेंद डावखर, कल्याण कुंकूलोळ, अरुण गुप्ता, मोहन नारंग, सतिश ताकटे, प्रल्हाद महाराज, आदिनाथ खरात, अगस्ती त्रिभूवन, विष्णू लबडे, महेंद्र नारंग, अनिल छाबडा, पुनित सुनिल गुप्ता, प्रथम गुप्ता, शिवनाथ गुप्ता, रमेश निकम, संजय पांडे, गोस्वामी बंगाली, वाल्मिक राऊत, हरि अछडा, गौरव गुप्ता, बंटी गुलाटी, मनोज थापर, श्रीहनुमान मंदिर खिचडी सेवेकरी मंडळ, हनुमान मंदिर भजनी मंडळ, श्री साईसेवक परिवार, यांनी विशेष परिश्रम घेतले. हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
Post a Comment