अहमदनगर प्रतिनिधी - जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी क्रिकेट बेटींगव्दारे जुगार अड्डयांवर छापा टाकुन कारवाई करण्याबाबत जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पोलीस ठाण्यांना आदेश केला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी सदर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन कारवाईचे आदेश दिले होते.तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी अहमदनगर जिल्हयात आय.पी.एल. बेटींगची माहिती घेत असताना पो. नि. अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत, नगर शहरात हनुमान मंदिरापाठीमागे, सुर्यनगर, अहमदनगर येथे मोकळया मैदानात चेतन पांडुरंग वराडे ( रा. सुर्यनगर, अहमदनगर), प्रविण गिते (रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर) याचे सांगणे वरुन व त्याचे अर्थिक फायदयाकरीता कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सन रायझर्स हैद्राबाद या दोन संघामध्ये चालु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटींग जुगार खेळतो व खेळवितो अशी बातमी मिळाल्याने पथकातील, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ अण्णा पवार, पोना शंकर चौधरी, पोना सचिन आडबल, पोना लक्ष्मण खोकले असे सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपी क्र. १) चेतन पांडुरंग वराडे (वय ४१, रा. सुर्यनगर, अहमदनगर) यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातुन क्रिकेट बेटींग खेळण्यासाठी लागणारे जुगाराची साधने जप्त केली.खेळ हा प्रविण गिते ( रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर (फरार)) याचे सांगणे वरुन खेळवित असल्याचे त्याने सांगितल्याने सदर आरोपी क्र. १ यास ताब्यात घेवून जप्त मुददेमाल व आरोपी पोलीस स्टेशनला घेवुन जावुन वरील दोन आरोपी विरुध्द पोहेकों संदिप पवार यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment