अहमदनगर प्रतिनिधी- पहाटे ३ वाजेच्या सुमारास फिर्यादि अक्षय कुंडलिक गोल्हार वय 30 वर्षे, राहणार कोहिनूर मंगल कार्यालयासमोर सावेडी अहमदनगर,यांचे मालकीचे नगर सोलापूर रोड वरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात सात ते आठ आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करून व पिस्टलचा धाक दाखवून मोबाईल रोख रक्कम असा एकूण २,५५,८०० रुपये रकमेचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता.(सा,स,मो,)सदर घटनेबाबत अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२१ भादवि कलम ३९५,३९७ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता,वरील प्रमाणे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर व श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदरचा गुन्हा घडल्यास ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपी नामे १) कृष्णा विलास भोसले वय २२ वर्ष,रा. हातवळण दाखले,तालुका आष्टी,जिल्हा बीड,२) सुरेश पुंजाराम काळे वय ३८ वर्ष,रा.सोनवीर, तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर,३) रावसाहेब विलास भोसले वय ४० वर्ष,रा. हातवळण दाखले ,तालुका आष्टी,जिल्हा बीड,४) आजिनाथ विलास भोसले वय २५ वर्ष,रा. हातवळण दाखले,तालुका आष्टी,जिल्हा बीड, यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.आरोपींकडे वरील नमूद गुन्हा बाबत विचारपूस केली असता ते प्रथम उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले त्यांना अधिकृत विश्वासात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांना सदरचे गुन्हे त्यांचे साथीदार १) भरत विलास भोसले राहणार हातवळण तालुका आष्टी(फरार)२) पवन युनूस काळे राहणार गुणवडी तालुका अहमदनगर( फरार) अशांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले होते तपासादरम्यान सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का)कलम ३(१)(!!),३(२)व ३(४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना दिले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकाची नेमणूक करून सपोनि.सोमनाथ दिवटे,पोसई.सोपान गोरे,पोहेकाँ.संदिप पवार, दत्तात्रय इंगळे,सुनील चव्हाण,संदीप घोडके, दिनेश मोरे,विश्वास बेरड,शंकर चौधरी,राहुल सोळंके,मेघराज कोल्हे,जालिंदर माने,योगेश सातपुते,चापोहेकॉ.बबन बेरड, संभाजी कोतकर,भरत बुधवंत यांचे पथकाची नेमणूक करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या पथक पोलीस अधिकारी व अंमलदार नगर तालुका हद्दीमध्ये पेट्रोलिंग फिरत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी नामे पवन काळे हा गुणवडी तालुका नगर येथे त्यांचे राहते घरी येणार असून आता गेल्यास मिळून ही अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कटके यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ गुणवडी तालुका नगर येथे रवाना करून मिळालेल्या बातमीच्या माहितीवरून आरोपी बाबत माहिती घेऊन कारवाई करणे बाबत सूचना दिली. पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी गुणवडी तालुका नगर येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन सापळा लावला थोड्याच वेळात(सा ,स,स) मिळालेल्या माहितीतील एक संशयीत इसम त्यांचे राहते घरी परिसरात येताना पथकाला दिसला पोलिस पथकाची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला बातमीतील आरोपी हा सदर इसम असल्याची पथकाचे खात्री होताच त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले त्याला पोलिस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव व पूर्ण पत्ता विचारला असता त्यांने सुरुवातीस तो उडवा उडवीचे उत्तरे देऊन लागला त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पवन युनूस काळे राहणार गुणवडी तालुका नगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२१ भादवि कलम ३९५,३९७,सह आर्म अॅक्ट कलम व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी अहमदनगर ग्रामीण विभाग,श्री.अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment