श्रीरामपूर प्रतिनिधी-आरटीओ कार्यालय परिसरातील बोगस एजंट व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी प्रशासनातील प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, येथे गैरमार्गाने कार्यरत असलेल्या काही एजंटांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाजकंटकांच्या माध्यमातून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खोटे व गैरकायदेशीर काम करून घेणेकरिता दबाव आणला आहे. यापूर्वी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटक व दलालांवर कायदेशीर करावाई करण्यासाठी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती प्रज्ञा अभंग, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, मोटार वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी यांनी फिर्यादी दिल्या आहेत. या प्रकारामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रचंड दहशतीखाली काम करत आहेत. संबंधित समाजकंटक व एजंटांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत कार्यालयीन कामकाज निषेध म्हणून बंद ठेवणार आहोत.बोगस एजंट व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करण्यात यावी, अन्यथा सामूहिकरित्या काम बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अधिकारी व कर्मचार्यांनी दिला आहे.निवेदनावर मोटार वाहन निरिक्षक सर्वश्री पद्माकर गो. पाटील, विकास सूर्यवंशी, विनोद घनवट, धर्मराज पाटील, सुनील गोसावी, श्रीमती जयश्री बागुल, सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती प्रज्ञा अभंग, श्रीमती श्वेता कुलकर्णी, श्रीमती मयुरी पंचमुख, श्रीमती सुजाता बाळसराफ, अतुल गावडे, धिरजकुमार भामरे, हेमंत निकुंभ, मयुर मोकळ, वरिष्ठ लिपिक हर्षल माळी, दर्शन सोनावणे, अमोल मुंडे, प्रकाश शिलावट, तसेच गोकुळ सुळ, अंकुश अंडे, वैभव गावडे, रावसाहेब शिंदे, नरेंद्र इंजापुरी, शंकर काटे, श्रीकांत शिरे, विशाल पाटील, सचिन असमार, सुनील शेवरे, परेश नावरकर, हेमंत नागपुरे आदींची नावे आहेत.

Post a Comment