दुसरी फिर्याद अमोल नागेश सावंत (वय 34, रा. वार्ड नं. 7, श्रीरामपूर) याने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, थत्ते ग्राऊंड येथील रामनवमीचा पाळण्याचा ठेका राजेंद्र भोसले यांनी घेतला असून त्यांना सहआयोजक म्हणून नागेश किसनराव सावंत, सलिम जहागिरदार, सलिम झुला, रियाज पठाण, जोएफ जमादार (सर्व रा. श्रीरामपूर) हे काम करतात. सदर ठिकाणी स्वयंसेवक म्हणून माझ्यासोबत निखील संजय वाडेकर, रोहीत भाऊसाहेब भोसले, सुनील मारूती डुक्रे व इतर स्वयंसेवक काम करतात. काल रात्री 11 च्या सुमारास सलिम झुला हे व मी पाळणा बंद करीत असताना तेथे 10-15 मुलं आले. यामध्ये अनिकेत गायकवाड, ओसामा शेख (दोघे रा. दत्तनगर), तसेच साहील याकुब सय्यद, फरदिन खान, जिब्राईल कक्कर, रहेमान इम्रान पठाण (सर्व रा. वॉर्ड. नं. 2) हे सर्वजण पाळण्यामध्ये फुकट बसण्याचा प्रयत्न करीत होते.तेव्हा मी व माझ्या सोबत असलेल्या स्वयंसेवक सहआयोजकांनी त्यांना विरोध करत पाळणा आता बंद झाला आहे, तुम्ही नंतर या, असे समजावून सांगत असताना त्यांनी आरडाओरडा करून आमच्याशी वाद घालून, शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व काठीने आम्हाला मारहाण करत दहशत निर्माण केली. असेे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी गुरनं 282/2022 नुसार अनिकेत गायकवाड, ओसामा शेख, (रा. दत्तनगर), सोहिल याकुब सय्यद, फरदिन खान, जिब्राईल कक्कर, रहेमान इमान पठाण (सर्व रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर) व इतर 8 ते 10 इसमांच्याविरोधात भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निविक्षक संजय सानप अधिक तपास करीत आहेत.
श्रीरामपुरात पाळण्यात बसण्यावरून धुमश्चक्री,9 जखमी, परस्पर विरोधी फिर्यादी, 30 जणांवर गुन्हा दाखल
श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामनवमी यात्रेतील पाळण्यात बसण्याच्या कारणावरून थत्ते मैदानावर तुफान हाणामारी झाली. यात 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून त्यावरून पोलिसांनी 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी रात्री अंध, मूकबधीर मुलांना रहाट पाळण्यात मोफत बसविण्यात येणार होते. त्यावेळी काही तरुण पाळण्याजवळ आले. आम्हाला मोफत पाळण्यात बसू द्या, असा आग्रह त्यांनी धरला. त्यास पाळणा चालकांनी विरोध दर्शविल्याने त्यांच्यात वादावादी झाली. त्याचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. यावेळी चॉपरचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. अचानक हाणामारी सुरु झाल्याने धावपळ व मोठा गोंधळ झाला. त्यामुळे इतर दुकाने लागलीच बंद झाली.या घटनेत रोहित भोसले (वय 22), सुनील डुक्रे (वय21), अमोल सावंत (वय 31), निखिल वाडेकर (वय 11), जिब्राईल काकर (वय 20), सोहेल सय्यद (वय 22), रहेमान सय्यद (वय 15), ओसामा शेख (वय 20), व फरदीन खान (वय 20) हे 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. ओसामा इम्रान शेख, (वय 20, धंदा चिकन दुकान, रा. दत्तनगर) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, काल रात्री 11 वा. माझा मित्र अनिकेत गायकवाड याच्याबरोबर थत्ते ग्राऊंडवर पाळण्यामध्ये बसण्याकरीता गेलो असता पाळण्याजवळ अगोदरच उभे असलेले सलीम लुल्ला, रोहीत भोसले, निखील संजय वाडेकर, सुनील मारूती डुक्रे, अमोल नागेश सावंत (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी मला व गायकवाडला तसेच तेथे उभे असलेल्या सोहेल याकुब सय्यद, फरदीन लियाकत खान, रहेमान इमान पठाण, जिब्राईल सलिम कक्कर यांना तुम्ही तिकीट काढलेले आहे का? असे विचारले.यावर आम्ही त्यांना समजावून सांगत असताना आम्ही पाळण्यात फुकट बसण्याचा प्रयत्न करत असल्याचा गैरसमज करून त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून काठीने माझ्या हातावर, पाठीवर मारहाण केली. त्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होवून मी खाली पडलो. या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुरनं 283/ 2022 प्रमाणे सलिम लुल्ला, रोहित भोसले, निखील वाडेकर, सुनील डुक्रे, अमोल सावंत व इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम 143, 147, 148, 149, 326, 323, 504, 506 नुसार दाखल केला आहे.
Post a Comment