सांस्कृतिक वारसा वाढविणयासाठी अशा उपक्रमांचे वरचेवर आयोजन करणे गरजेचे आहे. त्यातून येणारी पिढी मनाने सशक्त बनेल . सर्वच वयोगटातील स्पर्धकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद बघून भारावलो असल्याचे ते म्हणाले.राजेंद्र कांबळे म्हणाले, कलेच्या सानिध्यात मनुष्याला किती आनंद मिळतो, हे आज पहावयास मिळाले. कुठल्याही कलेची साधना केल्यास मनुष्याच्या आयुष्यात नकारात्मकता प्रवेशच करू शकत नाही. ही कलेची ताकद असते.आयोजकांकडून स्पर्धकांना ड्रॉईंग शिट्स वाटप करण्यात आले होते तरीही काही स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चाने कॅनव्हॉस, हॅण्डमेड पेपर्स आणून चित्रे काढली. कोरोनामुळे दोन ते तीन वर्षांपासून अशा स्पर्धांचे आयोजन होत नव्हते. त्यामुळे रंगलहरी आर्ट ॲकॅडमीने राबविलेल्या या उपक्रमास श्रीरामपूर तालुक्यासह, नाशिक, पुणे, कोपरगाव, राहाता येथील स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पत्रकार विकास अंत्रे, अशोकराज आहेर, श्री. धनवटे सर, संदिप कासार, जीवन सुरूडे, सत्यजित उदावंत, अमितराज आहेर, राजेंद्र उदावंत, विजय फुलारे, ललित बनसोडे, भाऊसाहेब बनकर, प्रशांत जोर्वेकर, सोनिया कंकड, रविंद्र निकम, भारत शेंगळ, अर्चना आहेर, मिनल भागवत, पुर्वा पवार, चैतन्या आहेर, ईश्वरी भागवत, साईश भागवत, कविता बनसोडे
आदी प्रयत्नशील होते. सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक संतोष मते यांनी केले.चौकट-६५ वर्षांचा ज्येष्ठ स्पर्धक चित्रकलेतील सर्वांच्या अभिरूचीला वाव देण्यासाठी रंगलहरी आर्ट ॲकॅडमीने स्पर्धेत चार वर्षांपुढील सर्वांनाच सहभाग घेण्याची मुभा दिली होती. त्यास खुपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सर्वच वयोगटातील अनेक कलाकारांनी आपली हौस यावेळी भागवली. येथील कारभारी सलालकर या ६५ वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारानेही स्पर्धेत सहभाग घेत अतिशय सुंदर चित्र रेखाटले. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबच अनेक शिक्षकांनीही चित्र रेखाटून स्पर्धेचा आनंद लुटला.

Post a Comment