Latest Post

अहमदनगर- ३ खूनप्रकरणात सहभागी असणारा व ८ वर्षापासून मोक्का गुन्ह्यात फरार असणा-या कुख्यात गुंडास पकडण्याची धडकेबाज कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. भरत विठ्ठल एडके (वय ३९, रा. भाईदंर, जिल्हा ठाणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या आरोपीने अनेक गंभीर गुन्हे केले असून, याला पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी झाली आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी (दि.१८) आयोजित पञकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके आदिंसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिनकर मुंढे, सपोनि गणेश इंगळे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, सुरेश माळी, रवि सोनटक्केव चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पुणे येथील बिल्डर फैजल खान व बेलवंडी येथील आकाश मापारी खून प्रकारणात सहभागी असणारा व तात्कालीन मुखेड (जि. नांदेड) शिवसेना तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या खून प्रकारणीसह मोक्का गुन्ह्यात आठ वर्षापासून आरोपी भरत एडके हा फरार होता. दि. ३ सप्टेंबर २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास जामखेड बीड रोडवरील, मोहागावचे शिवारात, अज्ञात ५-६ चोरट्यांनी त्यांचेकडील एक पांढरे रंगाची चारचाकी गाडीमध्ये पाठीमागून येऊन मला व साक्षीदार यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडीस आडवी लावून थांबवून रिव्हॉल्वरचा (गावठी कट्टयाचा) धाक दाखवून, लाथाबुक्यांनी मारहाण करुन, तुमच्याकडील माल काढा असे म्हणून एका आरोपीने मयत शंकर पाटील माधवराव ठाणेकर, (मुखेड, जि. नांदेड) येथील शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख यांच्या छातीवर गुप्ती सारखे धारदार हत्याराने भोकसून जिवे ठार मारुन ६ लाख ५९ हजार रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व इनोव्हा कार दरोडा चोरी करुन चोरुन नेली. या भालचंद्र बापूसाहेब नाईक (वय ५३ रा. पेठवडज ता. कंधार जिल्हा नांदेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३ /२५ व ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करुन ६ आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी ५ आरोपींना तत्कालीन तपास पथकाने अटक करुन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील ६ लाख ५९ हजार रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. यावेळी गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. आरोपी भरत एडके हा गुन्हा घडले पासून फरार होता.या तपासकामो स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की,आरोपी भरत एडके हा कोथरुड (जि. पुणे) येथे केटरर्सकडे काम करत आहे. आता गेल्यास तो मिळून येईल. अहमदनगर पथक तात्काळ कोथरुडेला रवाना होऊन आरोपीची माहिती घेतली. आरोपी हा चांदणी चौक, कोथरुड, ( जि. पुणे) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे अहमदनगर पोलिसांनी सापळा लावला. थोडयाच वेळात आरोपी हा संशयीतरित्या फिरताना दिसला. पोलिसांना खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु पोलिस खाक्या दाखविताच त्याने त्याचे नाव व पत्ता तसेच, जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३/२५ व ४/२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) बाबत चौकशी करता त्याने गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. अहमदनगर जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपी भरत विठ्ठल एडके हा अहमदनगर जिल्ह्यातील चार गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यात फरार आहे.श्रीगोंदा ९७/२०१५ भादविक ३९४, ३०२, २०१, १०९, ३४१, १२० (ब), ३४ प्रमाणे आरोपी भरत यास ताब्यात घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस हे करीत आहे.आरोपी भरत विठ्ठल एडके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला मोक्का, खून, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी असे १० गुन्हे दाखल आहेत, असे श्री पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर प्रतिनिधी-चार महिन्यात श्रीरामपूर, नेवासा, कुकाणा, सोनई, पाथर्डी, जामखेड व एमआयडीसी परिसरात जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तर असिफ नासिर शेख (रा. वाळुंज, औरंगाबाद), गुलाब्या शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव ता. नेवासा) हे पसार झाले आहेत. दरम्यान चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली.आरोपींकडून सुमारे 9 लाख 12 हजार रूपये किंमतीचे 172 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत केला आहे. श्रीरामपूर येथील दादासाहेब ज्ञानदेव मरकड (रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास केला होता. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. नेवासा परिसरामध्ये चोरी केलेले सोने काही चोरटे विकण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे खडका फाटा रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन चोरटे तेथे आले. त्यातील सचिन भोसले याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तर असिफ शेख, गुलाब्या भोसले हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान पोलिसांनी भोसले याच्या ताब्यातून सुमारे 9 लाख 12 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. त्याच्यावर आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे जामखेड, सोनई, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर पसार झालेले दोघे आरोपी देखील सराईत असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार सुनील चव्हाण, दत्ता गव्हाणे, मनोहर गोसावी, भाऊसाहेब कुरूंद, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, ज्ञानेश्‍वर शिंदे, शंकर चौधरी, संदीप दरदंले, सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, रणजित जाधव, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, रोहित येमुल, मयुर गायकवाड, विजय धनेधर, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने केली.

नाशिक प्रतिनिधी-नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वच धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ३ मे पर्यंत भोंगे लावण्यातही परवानगी घ्यावी असे परिपत्रक काढण्यात आले आहे. राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून असून काय प्रतिक्रिया उमटत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांना भोंगे, ध्वनी प्रक्षेपण यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज करून लेखी मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच त्याचा वापर करावा. सदर आदेश ३ मे २०२२ पासून अंमलात येईल असे परिपत्रक पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी जारी केले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे १८ जुलै २००५ चे ध्वनीक्षेपक संबंधी निर्णयाच्या अनुषंगाने मशिदीवरील भोंग्यामधून उच्च स्वरात घोषणांमुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याने ३ मे २०२२ पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविण्याकरिता ईशारा दिला आहे.त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सदर अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशात असे नमूद केले आहे कि,मनसेला मशिदी समोर हनुमान चालीसा पठणाचा अधिकार नसून फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्याचा सदर प्रयत्न असून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मशिदींच्या १०० मिटर परिसरात ध्वनी क्षेपकाद्वारे अजनच्या पाचही वेळी १५ मिनिट आधी व नंतर हनुमान चालीसा किंवा कुठल्याही प्रकारचे भजन,गाणे किंवा ईतर भोंगे प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.कुणालाही भोंगे वाजवण्यास परवानगी हवी असेल त्यांना ३ मे पर्यंत मुभा देण्यात आली आहे.सदर आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामध्ये ४ महिने ते १ वर्षे शिक्षेची तरतूद असून विशेष परिस्थिती मध्ये ६ महिन्यापर्यंत तडीपारीची कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.ध्वनी क्षेपकासाठी आवाज मर्यादा कशी असेल? 1)औद्योगिक क्षेत्र रात्री ७० डेसिबल व दिवसा ७५ डेसिबल. 2)व्यावसायिक क्षेत्र व वाणिज्य क्षेत्र रात्री ५५ डेसिबल,दिवसा ६५ डेसिबल. 3) निवासी क्षेत्र रात्री ४५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल. 4)शांतता परिक्षेत्रात रात्री ४० डेसिबल व दिवसा ५० डेसिबल.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशनजवळील जागृत देवस्थान हनुमान मंदिरात काल हनुमान जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.काल पहाटे 4 वाजता एक तालात एक सुुरात भजने व हनुमान चालिसा पठण करण्यात आले. या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पहाटे 6 वाजता हनुमान जन्मोसत्वाचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. लहू कानडे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, सौ. भारती फंड, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रांताधिकारी अनिल पवार, सौ. सई अनिल पवार, माजी नगरसेवक दिलीप नागरे, रवी पाटील, पोलीस निरीक्षक संजय सानप, श्री. पगारे, हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनिलाल पोरवाल, खजिनदार सुनिल गुप्ता, काँग्रेेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, कुणाल करंडे, तेजस बोरावके, कुणाल करंडे, चंपालाल फोफळे, चंदू गुप्ता, सुर्यकांत तांबडे, आदिंनी दर्शन घेवून अभिषेक केला.सायंकाळी 5 ते 5.30 वाजता हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. रात्री 8.00 ते 8.30 वाजता श्री महाआरती करण्यात आली होती. पहाटे हनुमान जन्मोत्सवादरम्यान ढोल ताशांच्या गजरात, मंत्रोच्चाराच्या सुरात तसेच फटाक्यांच्या अतिषाबाजीत हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.हनुमान जन्मोत्सवानिमित्त यावेळी स्व. चंद्रप्रकाश खुशिराम गुप्ता यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या भंडार्‍याचा कार्यक्रम गुप्ता परिवाराच्यावतीने काल संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान आयोजित करण्यात येवून भाविकांनी त्याचा लाभ घेतला.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान ट्रस्ट, हनुमान मंदिर सेवेकरी व भाविकांसह ट्रस्टचे चेअरमन मणिलाल पोरवाल, खजिनदार सुनिल गुप्ता, चंपालाल फोफळे, सुभाष फेगडे, राजेंद डावखर, कल्याण कुंकूलोळ, अरुण गुप्ता, मोहन नारंग, सतिश ताकटे, प्रल्हाद महाराज, आदिनाथ खरात, अगस्ती त्रिभूवन, विष्णू लबडे, महेंद्र नारंग, अनिल छाबडा, पुनित सुनिल गुप्ता, प्रथम गुप्ता, शिवनाथ गुप्ता, रमेश निकम, संजय पांडे, गोस्वामी बंगाली, वाल्मिक राऊत, हरि अछडा, गौरव गुप्ता, बंटी गुलाटी, मनोज थापर, श्रीहनुमान मंदिर खिचडी सेवेकरी मंडळ, हनुमान मंदिर भजनी मंडळ, श्री साईसेवक परिवार, यांनी विशेष परिश्रम घेतले. हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

अहमदनगर प्रतिनिधी - जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी क्रिकेट बेटींगव्दारे जुगार अड्डयांवर छापा टाकुन कारवाई करण्याबाबत जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पोलीस ठाण्यांना आदेश केला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी सदर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन कारवाईचे आदेश दिले होते.तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी अहमदनगर जिल्हयात आय.पी.एल. बेटींगची माहिती घेत असताना पो. नि. अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत, नगर शहरात हनुमान मंदिरापाठीमागे, सुर्यनगर, अहमदनगर येथे मोकळया मैदानात चेतन पांडुरंग वराडे ( रा. सुर्यनगर, अहमदनगर), प्रविण गिते (रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर) याचे सांगणे वरुन व त्याचे अर्थिक फायदयाकरीता कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सन रायझर्स हैद्राबाद या दोन संघामध्ये चालु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटींग जुगार खेळतो व खेळवितो अशी बातमी मिळाल्याने पथकातील, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ अण्णा पवार, पोना शंकर चौधरी, पोना सचिन आडबल, पोना लक्ष्मण खोकले असे सदर ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपी क्र. १) चेतन पांडुरंग वराडे (वय ४१, रा. सुर्यनगर, अहमदनगर) यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातुन क्रिकेट बेटींग खेळण्यासाठी लागणारे जुगाराची साधने जप्त केली.खेळ हा प्रविण गिते ( रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर (फरार)) याचे सांगणे वरुन खेळवित असल्याचे त्याने सांगितल्याने सदर आरोपी क्र. १ यास ताब्यात घेवून जप्त मुददेमाल व आरोपी पोलीस स्टेशनला घेवुन जावुन वरील दोन आरोपी विरुध्द पोहेकों संदिप पवार यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर प्रतिनिधी- पहाटे ३ वाजेच्या सुमारास फिर्यादि अक्षय कुंडलिक गोल्हार वय 30 वर्षे, राहणार कोहिनूर मंगल कार्यालयासमोर सावेडी अहमदनगर,यांचे मालकीचे नगर सोलापूर रोड वरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात सात ते आठ आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करून व पिस्टलचा धाक दाखवून मोबाईल रोख रक्कम असा एकूण २,५५,८०० रुपये रकमेचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता.(सा,स,मो,)सदर घटनेबाबत अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२१ भादवि कलम ३९५,३९७ सह आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता,वरील प्रमाणे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर व श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदरचा गुन्हा घडल्यास ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपी नामे १) कृष्णा विलास भोसले वय २२ वर्ष,रा. हातवळण दाखले,तालुका आष्टी,जिल्हा बीड,२) सुरेश पुंजाराम काळे वय ३८ वर्ष,रा.सोनवीर, तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर,३) रावसाहेब विलास भोसले वय ४० वर्ष,रा. हातवळण दाखले ,तालुका आष्टी,जिल्हा बीड,४) आजिनाथ विलास भोसले वय २५ वर्ष,रा. हातवळण दाखले,तालुका आष्टी,जिल्हा बीड, यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.आरोपींकडे वरील नमूद गुन्हा बाबत विचारपूस केली असता ते प्रथम उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले त्यांना अधिकृत विश्वासात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांना सदरचे गुन्हे त्यांचे साथीदार १) भरत विलास भोसले राहणार हातवळण तालुका आष्टी(फरार)२) पवन युनूस काळे राहणार गुणवडी तालुका अहमदनगर( फरार) अशांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले होते तपासादरम्यान सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का)कलम ३(१)(!!),३(२)व ३(४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना दिले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकाची नेमणूक करून सपोनि.सोमनाथ दिवटे,पोसई.सोपान गोरे,पोहेकाँ.संदिप पवार, दत्तात्रय इंगळे,सुनील चव्हाण,संदीप घोडके, दिनेश मोरे,विश्वास बेरड,शंकर चौधरी,राहुल सोळंके,मेघराज कोल्हे,जालिंदर माने,योगेश सातपुते,चापोहेकॉ.बबन बेरड, संभाजी कोतकर,भरत बुधवंत यांचे पथकाची नेमणूक करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या पथक पोलीस अधिकारी व अंमलदार नगर तालुका हद्दीमध्ये पेट्रोलिंग फिरत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी नामे पवन काळे हा गुणवडी तालुका नगर येथे त्यांचे राहते घरी येणार असून आता गेल्यास मिळून ही अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कटके यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ गुणवडी तालुका नगर येथे रवाना करून मिळालेल्या बातमीच्या माहितीवरून आरोपी बाबत माहिती घेऊन कारवाई करणे बाबत सूचना दिली. पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी गुणवडी तालुका नगर येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन सापळा लावला थोड्याच वेळात(सा ,स,स) मिळालेल्या माहितीतील एक संशयीत इसम त्यांचे राहते घरी परिसरात येताना पथकाला दिसला पोलिस पथकाची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला बातमीतील आरोपी हा सदर इसम असल्याची पथकाचे खात्री होताच त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले त्याला पोलिस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव व पूर्ण पत्ता विचारला असता त्यांने सुरुवातीस तो उडवा उडवीचे उत्तरे देऊन लागला त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पवन युनूस काळे राहणार गुणवडी तालुका नगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२१ भादवि कलम ३९५,३९७,सह आर्म अॅक्ट कलम व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम हा गुन्हा केल्याची कबुली दिली.  आरोपीविरुद्ध विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी अहमदनगर ग्रामीण विभाग,श्री.अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची  131 वी जयंती श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार माननीय  भानुदास मुरकुटे तसेच जयंती समितीचे अध्यक्ष श्री सुरेश अमोलिक उपाध्यक्ष सुधीर तेलोरे विश्वास अमोलिक राजेश अमोलिक  यांच्या उपस्थितीत संपन्न झाली  बेलापूरातील मुख्य ध्वजस्तंभाजवळ उत्कृष्ट अशी सजावाट करुन त्या ठिकाणी महामानव डाँक्टर बाबासाहेब  आंबेडकराचा पुतळा ठेवण्यात आला होता  या वेळी महिलानी देखील  महामानवास अभिवादन केले या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक बाजार समिती संचालक सुधीर नवले सरपंच महेंद्र साळवी पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले दिलीप दायमा किशोर कदम ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक भाई शेख रमेश अमोलिक   भारत साळुंके विलास नाना मेहेत्रे प्रल्हाद अमोलिक दिलीप अमोलिक  हाजी इस्माईल शेख एकलव्य संघटना अध्यक्ष बाबुराव पवार राहुल तेलोरे मयूर खरात अमोल तेलोरे अलिशा अमोलिक पवन रणदिवे मेजर निलेश अमोलिक विकास अमोलिक गौरव वाकडे सागर साळवे  बाबुलाल भाई पठाण स्वप्नील अमोलिक अल्ताफ शेख बबनबाई अमोलिक प्रभावती अमोलिक आशाबाई तेलोरे शिंधु खरात सुशीला खरात सुनीता तेलोरे अनिता खरात आरोही तेलोरे नीलम तेलोरे तेरेजा तेलोरे सीमा तेलोरे जयश्री जाधव  अमोलिक जयेश अमोलिक अनिकेत गजभिव निलेश सोनवणे रजनीकांत तेलोरे अल्ताफ भाई शेख अरुण अमोलिक  उपस्थित होते शेवटी ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले या वेळी गावातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget