Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-वेळेवर पगार न मिळाल्यामुळे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत या आत्महत्येस शासनच जबाबदार असुन  कर्मचाऱ्यांंच्या आत्महत्येस जबाबदार असणारावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर एस टी आगारात एसटी कामगारांच्या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यानी जाहीर पाठींबा देऊन. निवेदन आगारप्रमुखांना देण्यात दिले .त्या प्रसगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष, तुषार बोबडे जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष विकी राऊत, शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, दीपक लांडे तालुका सरचिटणीस, संदीप विशम्‍भर शहर सचिव, प्रथमेशवर गांगुर्डे शहर उपाध्यक्ष, अभिजीत खैरे तालुका उपाध्यक्ष,

आदी पदाधिकारी उपस्थित होते.कामगारांच्या कामबंद आंदोलनास मनसेच्या वतीने पाठींबा देण्यात आला  त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब  शिंदे म्हणाले की  कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा.तसेच एसटी ड्रायव्हर कंडक्टर हे ऊन वारा वादळ कुठलाही प्रसंग असला तरीपण आपली सेवा योग्य रीतीने देत असतात महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असताना एसटी ड्रायव्हर कंडक्टर आपला जीव मुठीत घेऊन अहोरात्र प्रामाणिकपणे आपले कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडतात तरी राज्य सरकार त्यांना म्हणावे तसे सुख सुविधा देत नाही व इतरां पेक्षा कमी पगार  देत असते राज्य सरकार भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाचा समावेश राज्य सरकार स्वतः कडे विलगीकरण करून घेत नाही आम्ही आज राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन यापुढे कामगार बांधवांच्या आंदोलना मध्ये सक्रिय सहभाग घेऊ व महाराष्ट्र सरकारला तुमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे आश्वासन  जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिले. कामगारांना पाठींब्याचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी   श्रीरामपूर एसटी वाहतूक निरीक्षक किरण शिंदे,सहा.वाहतूक निरीक्षक वसंत लटपटे यांना तसेच एसटी कामगार सुरेश चांदणे,देविदास कहाणे,प्रभाकर पवार,अमोल पगारे,वसंत दहिफळे,सुनील तुपे,विष्णू गर्जे,रवी मारवाडे,शामलिंग शिंदे,भगवान पाचारणे,प्रशांत लिहिणार,मुन्नाभाई शेख,यांना देण्यात आले.




बेलापुर  (प्रतिनिधी  )-बाल वयातच ज्याचे पालकत्व हरवले तोच व्यक्ती वयाच्या १९ व्या वर्षी अनेक अनाथांचा नाथ बनला असुन समाजातील दानशुर व्यक्तींनी या चांगल्या समाज कार्यास हातभार लावावा असे अवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे .बेलापुर येथील गोखलेवाडी येथे १९ वर्ष वय असणारे ह भ प कृष्णानंद महाराज यांनी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम सुरु केला असुन आज या आश्रमात १३ अनाथ मुले मुली शिक्षण घेत आहे आश्रमाचा दर महा खर्च हा ३५ हजार रुपये असुन कृष्णानंद महाराज हा खर्च किर्तन प्रवचन करुन भागवत आहे परंतु कोरोनामुळे किर्तन प्रवचन बंद पडले त्यामुळे त्यांनी आपल्याकडील असलेले चार चाकी वाहन विकुन मुलांचा खर्च भागविला गावकंरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे गांवाकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी सामाजिक कार्याची जाण ठेवुन गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्याकडून वर्गणी जमा करुन या अनाथ आश्रमास मदत करण्याचा निर्णय घेतला व जमा झालेले सतरा हजार पाचशे रुपयाचा निधी दिपावलीच्या दिवशी कृष्णानंद महाराजाकडे सुपुर्त करण्यात आला या वेळी सरपंच महेंद्र साळवी यांनी देखील बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने जी मदत करता येईल ती सर्वा मदत करण्याचे अश्वासन दिले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आश्रमास पाच गुंठे जागा विनामोबदला दिल्याबद्दल प्रकाश मेहेत्रे  व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले. या वेळी जालींदर कुऱ्हे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,दिलीप दायमा,प्रकाश मेहेत्रे,रावसाहेब अमोलिक,मुस्ताक शेख,वैभव कु-हे,गणेश बंगाळ,दादासाहेब कुताळ,महेश कु-हे,शफीक बागवान,नामदेव मेहेत्रे,अकबर सय्यद,अजिज शेख,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी प्रकाश मेहेत्रे यांनी आभार मानले.


बेलापुर  (प्रतिनिधी )-आपल्या सर्वावर या मातीचे ऋण असुन ते फेडण्यासाठी मातीशी ईमान राखत  राजकारणापलीकडे जावुन गावात बंधुभाव टिकविण्यासाठी प्रयत्न करावे असे आशिर्वचन गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी बेलापूरवासीयांना दिले.राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली बेलापुर ग्रामपंचायतीला स्थापन होवुन शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्या दृष्टीने आचार्य किशोरजी व्यास यांची ग्रामपंचायतीला  भेट महत्वाची मानली जात आहे.  जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे

यांच्याकडून आचार्य किशोरजी व्यास यांनी ग्रामपंचायत कारभाराबद्दल माहीती करुन घेतली बऱ्याच वर्षानंतर स्वामीजी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते  या वेळी ग्रामस्थांना आशिर्वादीत करताना स्वामीजी म्हणाले की जगात कुठेही असलो तरी या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे येथे खेळलो बागडलो येथील मातीच्या कणाकणाशी एकरुप झालो ज्या प्रवरा माईच्या तिरावर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहीली त्याच प्रवरेचे पाणी पिऊन मी मोठा झालो आहे अनेक तपस्वी लोकांनी या गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले होते या गावात उद्योग  व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे सर्वांनी चांगली सेवा देण्याचा संकल्प करावा गावाची शांतता भंग होणार नाही जाती जातीत तणाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी गावात नविन रचनात्मक विकासात्मक कामे करावीत ज्या ठिकाणी माझी मदत लागेल ती करण्यास मी सदैव तत्पर राहील असेही ते म्हणाले. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने आचार्य किशोरजी व्यास यांचा सन्मान करण्यात आला या वेळी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे,जुने बालाजी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष हरजीभाऊ व्यास,रणजित श्रीगोड,महेशजी व्यास,जालिंदर कु-हे,भास्कर बंगाळ, सुधाकर खंडागळे,भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले,प्रफुल्ल डावरे,साहेबराव वाबळे,रामेश्वर सोमाणी,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,पुरुषोत्तम भराटे,बाळासाहेब दाणी,रविंद्र कोळपकर,राहुल माळवदे,योगेश पवार,मोहसिन सय्यद,दादासाहेब कुताळ,अजिज शेख,पत्रकार देविदास देसाई,विष्णूपंत डावरे, दिलीप दायमा,लक्ष्मण शिंदे,नितीन शर्मा,गणेश बंगाळ,बाबूलाल पठाण,सचिन वाघ,राकेश कुंभकर्ण,विशाल आंबेकर,महेश कु-हे,अमोल गाडे,बाळासाहेब शेलार,प्रकाश मेहेत्रे,राज गुडे,ग्रामपंचायत कर्मचारी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.






प्रतिनिधी- दि.14/11/2021 रोजी जिल्हास्तरीय पिंच्चाक सिलँट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पिंच्चाक सिलँट हा खेळ इंडनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून तो स्टॅंडिंग (फाईट), तुंगल(सिंगल),गंडा (डबल) रेग्यु (ट्रीपल),व या चार प्रकारात खेळला जातो हा खेळ देशात युवती व महिला विद्यार्थी यांच्या संरक्षणासाठी लोकप्रिय होत आहे याला युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार ,भारतीय विश्वविद्यालय संघ, ओलंपिक कन्सिल ऑफ एशिया ची मान्यता आहे याचा शाळेत व अखिल

भारतीय पोलीस खेळ महासंघाच्या खेळात समावेश झाला आहे या खेळाची स्पर्धा प्रियदर्शनी मंगल कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा पिंच्चाक सिलँट असोसिएशन चे सचिव प्रवीण कुदळे सर व उपाध्यक्ष प्रशिक्षक कलीम बिनसाद यांनी केले आहे स्पर्धेच्या आयोजनाबाबत बदल होऊ शकतात याकरिता संपर्क मोबाईल नंबर 97 30 65  04 53 प्रवीण कुदले.



श्रीरामपूर इमरान शेख याच्याकडून महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या बेलापूर शहराध्यक्ष माहिती व कायदाचे प्रतिनिधी राजनीति समाचार चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी राजनीति समाचार पोर्टल न्यूज चे प्रतिनिधी सय्यद एजाज सजन आली यांची पत्रकार संघाच्या अहमदनगर उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी सय्यद एजाज यांची या पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान केले सय्यद एजाज यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार पत्रकार संघाचे सचिव किशोर गाढे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद शेख प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण चांदवड प्रदेश उपाध्यक्ष नासीर पठाण (नाशिक) मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास राव पठारे ,मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे ,पुणे जिल्हा सचिव अफजल खान ,पुणे शहराध्यक्ष हनीफ भाई तांबोळी ,रायगड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल ,नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख ,नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण ,नासिक जिल्हा सचिव वहाब खान पठाण ,मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया शेख, चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे ,चांदवड शहराध्यक्ष रवींद्र केदारे चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड ,जेवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, जेवला शहराध्यक्ष हाजी शकील भाई शेख ,कोपरगाव तालुका अध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफ भाई शेख ,अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिन साद, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद शेख ,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष इद्रिस भाई शेख ,जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, संगमनेर शहराध्यक्ष शहानुर बेगम पुरे, संगमनेर तालुका अध्यक्ष दस्तगीर शाह ,घाट कोपर शहराध्यक्ष लियाकत सय्यद, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद भाई पठाण ,शेवगाव तालुका कार्याध्यक्ष जमीर शेख ,राहता तालुका अध्यक्ष विजय खरात ,राहता तालुका उपाध्यक्ष शब्बिर भाई कुरेशी, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण ,श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता तडके ,अहमदनगर महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ  समीना रफिक शेख श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी अहिरे ,पत्रकार अकबर भाई शेख, रमेश शिरसाट ,शेख अहमद नसीर, लक्ष्मण साठे ,साईनाथ बनकर आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या_

बेलापुर  (प्रतिनिधी  )- भारतीय जवान व पोलीस बांधवाच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी फ्रेंडस़् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानांसाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.फ्रेंडस़् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी बेलापुर येथील ध्वजस्तंभाजवळ भारत मातेच्या प्रतिमेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले मेजर मारुती पुजारी देविदास देसाई शरद देशपांडे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड  माजी सरपंच भरत साळूंके,बाजार समिती संचालक सुधीर नवले, विलास मेहेत्रे अशोक पवार  या मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभावर पणत्या पेटविण्यात आल्या या वेळी मोहसिन सय्यद अजिज शेख विशाल आंबेकर गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव

वाबळे भिमराज हुडे दिलीप दायमा,अजीज शेख, मधुकर औचिते,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक, जिना शेख, बाबूलाल पठाण,शहानवाज सय्यद,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे प्रफुल्ल काळे मयुर साळूंके जयेंद्र खटोड राजेश सुर्यवंशी शशिकांत तेलोरे गोपाल जोशी विष्णूकांत लखोटीया संदीप जाधव सुभाष शेलार विजय कोठारी निशिकांत लखोटीया प्रभात कुऱ्हे गोपाल सोमाणी महेश उंडे रामेश्वर कोतकर प्रशांत मुंडलीक महंत काळे योगेश जाधव सुमित सोमाणी साईनाथ शिरसाठ राम कुऱ्हे सुरेश जाधव आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर शशिकांत तेलोरे यांनी आभार व्यक्त केले.


श्रीरामपूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला संधी देणारे एकमेव ठिकाण म्हणजे शाळा. या शाळा मागील दीड वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे कमी अधिक प्रमाणात चालू बंद अवस्थेत आहेत. नेहमी शाळेत बागडणारी विद्यार्थी अशा काळात घरी थांबून उबगली आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागून राहिली आहे.दरम्यानच्या काळात ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांना संधी मिळत त्या त्यावेळी विद्यार्थी शाळेत येण्याचा प्रयत्न करत.

एरव्ही दिवाळीच्या सुटीत शाळेकडे कधीही न फिरकणारी विद्यार्थी यावेळी मात्र दिवाळीच्या दिवशी चक्क शाळेत उपस्थित राहून दीपोत्सव साजरा केला.उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाचा दीपोत्सव शाळेत उपस्थित राहून आपल्या सवंगड्यासोबत साजरा केला. 

इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी घरीं साजरी न करता शाळेतच दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.प्रमुख्याने कृतिशील शिक्षक शकील बागवान यांनी विद्यार्थ्यांना तसे आवाहनही केले होते.त्यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत मोठ्या आनंदमयी वातावरणात शाळेत दीप प्रज्वलन केले.ज्याप्रमाणे घरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने दीपप्रज्वलन करतात त्याच उत्साहाने प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःसोबत पणत्या आणि इतर साहित्य घेऊन आले आणि शाळेच्या अर्थात ज्ञानमंदिराच्या प्रांगणात ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केले.वर्गासमोर छानशी रांगोळी काढून सुशोभित केले.वर्गाला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधली.दिवाळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असताना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसला.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सभापती संगीता शिंदे,उपसभापती बाळासाहेब तोरणे,जिल्हा पारिषद सदस्य  शरद नवले, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,डॉ.वंदनाताई  मुरकुटे, सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ओहोळ,जितेंद्र भोसले,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षणविस्ताराधिकारी संजीवन दिवे,मंदा दुरगुडे,केंद्रप्रमुख मंगल गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,मुख्याध्यापिका लता पालवे व पालक आदींनी विद्यार्थ्यांच्या  या कार्याचे कौतुक केले.शाळेतील शिक्षकवृंद मेघा साळवे,डॉ.राज जगताप,संघमित्रा रोकडे,संतोष जमदाडे आदींनी या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले व सहकार्य केले. 



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget