प्रतिनिधी- दि.14/11/2021 रोजी जिल्हास्तरीय पिंच्चाक सिलँट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पिंच्चाक सिलँट हा खेळ इंडनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून तो स्टॅंडिंग (फाईट), तुंगल(सिंगल),गंडा (डबल) रेग्यु (ट्रीपल),व या चार प्रकारात खेळला जातो हा खेळ देशात युवती व महिला विद्यार्थी यांच्या संरक्षणासाठी लोकप्रिय होत आहे याला युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार ,भारतीय विश्वविद्यालय संघ, ओलंपिक कन्सिल ऑफ एशिया ची मान्यता आहे याचा शाळेत व अखिल
भारतीय पोलीस खेळ महासंघाच्या खेळात समावेश झाला आहे या खेळाची स्पर्धा प्रियदर्शनी मंगल कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा पिंच्चाक सिलँट असोसिएशन चे सचिव प्रवीण कुदळे सर व उपाध्यक्ष प्रशिक्षक कलीम बिनसाद यांनी केले आहे स्पर्धेच्या आयोजनाबाबत बदल होऊ शकतात याकरिता संपर्क मोबाईल नंबर 97 30 65 04 53 प्रवीण कुदले.
Post a Comment