बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्या सर्वावर या मातीचे ऋण असुन ते फेडण्यासाठी मातीशी ईमान राखत राजकारणापलीकडे जावुन गावात बंधुभाव टिकविण्यासाठी प्रयत्न करावे असे आशिर्वचन गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी बेलापूरवासीयांना दिले.राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली बेलापुर ग्रामपंचायतीला स्थापन होवुन शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्या दृष्टीने आचार्य किशोरजी व्यास यांची ग्रामपंचायतीला भेट महत्वाची मानली जात आहे. जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे
यांच्याकडून आचार्य किशोरजी व्यास यांनी ग्रामपंचायत कारभाराबद्दल माहीती करुन घेतली बऱ्याच वर्षानंतर स्वामीजी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते या वेळी ग्रामस्थांना आशिर्वादीत करताना स्वामीजी म्हणाले की जगात कुठेही असलो तरी या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे येथे खेळलो बागडलो येथील मातीच्या कणाकणाशी एकरुप झालो ज्या प्रवरा माईच्या तिरावर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहीली त्याच प्रवरेचे पाणी पिऊन मी मोठा झालो आहे अनेक तपस्वी लोकांनी या गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले होते या गावात उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे सर्वांनी चांगली सेवा देण्याचा संकल्प करावा गावाची शांतता भंग होणार नाही जाती जातीत तणाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी गावात नविन रचनात्मक विकासात्मक कामे करावीत ज्या ठिकाणी माझी मदत लागेल ती करण्यास मी सदैव तत्पर राहील असेही ते म्हणाले. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने आचार्य किशोरजी व्यास यांचा सन्मान करण्यात आला या वेळी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे,जुने बालाजी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष हरजीभाऊ व्यास,रणजित श्रीगोड,महेशजी व्यास,जालिंदर कु-हे,भास्कर बंगाळ, सुधाकर खंडागळे,भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले,प्रफुल्ल डावरे,साहेबराव वाबळे,रामेश्वर सोमाणी,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,पुरुषोत्तम भराटे,बाळासाहेब दाणी,रविंद्र कोळपकर,राहुल माळवदे,योगेश पवार,मोहसिन सय्यद,दादासाहेब कुताळ,अजिज शेख,पत्रकार देविदास देसाई,विष्णूपंत डावरे, दिलीप दायमा,लक्ष्मण शिंदे,नितीन शर्मा,गणेश बंगाळ,बाबूलाल पठाण,सचिन वाघ,राकेश कुंभकर्ण,विशाल आंबेकर,महेश कु-हे,अमोल गाडे,बाळासाहेब शेलार,प्रकाश मेहेत्रे,राज गुडे,ग्रामपंचायत कर्मचारी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment