एसटी बस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न झाल्यामुळे आत्महत्या गुन्हा दाखल करावा मनसे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-वेळेवर पगार न मिळाल्यामुळे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत या आत्महत्येस शासनच जबाबदार असुन  कर्मचाऱ्यांंच्या आत्महत्येस जबाबदार असणारावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर एस टी आगारात एसटी कामगारांच्या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यानी जाहीर पाठींबा देऊन. निवेदन आगारप्रमुखांना देण्यात दिले .त्या प्रसगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष, तुषार बोबडे जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष विकी राऊत, शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, दीपक लांडे तालुका सरचिटणीस, संदीप विशम्‍भर शहर सचिव, प्रथमेशवर गांगुर्डे शहर उपाध्यक्ष, अभिजीत खैरे तालुका उपाध्यक्ष,

आदी पदाधिकारी उपस्थित होते.कामगारांच्या कामबंद आंदोलनास मनसेच्या वतीने पाठींबा देण्यात आला  त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब  शिंदे म्हणाले की  कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा.तसेच एसटी ड्रायव्हर कंडक्टर हे ऊन वारा वादळ कुठलाही प्रसंग असला तरीपण आपली सेवा योग्य रीतीने देत असतात महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असताना एसटी ड्रायव्हर कंडक्टर आपला जीव मुठीत घेऊन अहोरात्र प्रामाणिकपणे आपले कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडतात तरी राज्य सरकार त्यांना म्हणावे तसे सुख सुविधा देत नाही व इतरां पेक्षा कमी पगार  देत असते राज्य सरकार भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाचा समावेश राज्य सरकार स्वतः कडे विलगीकरण करून घेत नाही आम्ही आज राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन यापुढे कामगार बांधवांच्या आंदोलना मध्ये सक्रिय सहभाग घेऊ व महाराष्ट्र सरकारला तुमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे आश्वासन  जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिले. कामगारांना पाठींब्याचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी   श्रीरामपूर एसटी वाहतूक निरीक्षक किरण शिंदे,सहा.वाहतूक निरीक्षक वसंत लटपटे यांना तसेच एसटी कामगार सुरेश चांदणे,देविदास कहाणे,प्रभाकर पवार,अमोल पगारे,वसंत दहिफळे,सुनील तुपे,विष्णू गर्जे,रवी मारवाडे,शामलिंग शिंदे,भगवान पाचारणे,प्रशांत लिहिणार,मुन्नाभाई शेख,यांना देण्यात आले.




Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget