यावेळी संघटनेचे तुकाराम जाधव, रामदास जाधव, रुबाब पटेल, दादासाहेब काळे, रमेश निषेध, निलेश लहारे, हितेश ढुमणे,राजु भालदंड आदींनी तिव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,दिनांक ८
नोव्हेंबर २०२१ रोजी औरंगाबाद याठिकाणी आयोजित सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल बिभत्स व अपमाजनक तथा अवमानकारक शब्द वापरुन संवर्गाचा अवमान केलेला आहे, वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून सदर कामे करताना जनमानसांशी संपर्क व समन्वय ठेऊन अत्यंत सचोटीने व पारदर्शक पध्दतीने असंख्य अडी-अडचणींवर मात करून काम करणारा घटक आहे,असे असतानासुद्धा आमदार महोदयांनी या बाबी विचारात न घेता बेताल वक्तव्य करुन जाणिवपुर्वक जनमानसात ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा मलिन केली आहे,
या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत असून जोपर्यंत आमदार संजय शिरसाठ यांच्यावर शासन दरबारी भा.द.संहितेनुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, ते राज्यातील ग्रामसेवक संवर्गाची जाहिरपणे माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलन करीत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटना डी.एन.ई.१३६ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रमेश निबे, सचिव दादासाहेब काळे, श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष नितेश लहारे, सचिव राजु भालदंड, जि.प.कर्मचारी महासंघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रुबाब पटेल, सचिव हितेश ढुमणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुकाराम जाधव,ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास जाधव यांच्या समवेत तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सर्वश्री ए.ए.विधाटे, डी.एल.डोंगरे, पी.पी.दर्शने, एच.एस.ढुमणे, पी.यु.वाघमारे, आर.ए.भालदंड, व्ही.ई.देसाई,आर.आर.कांदळकर,व्ही.एस.मेहेत्रे, बी.एस.म्हस्के, सी.डी.तुंबारे, आर.एफ.जाधव, टी.के.जाधव, पी.व्ही.ढुमणे, आर.बी.ओहोळ, व्ही.एन.धाकतोडे, श्रीमती. एस.ए. जाधव, श्रीमती,एस.एस.शेटे, एस.डी.उंडे, पी.एन.सोनवणे, आर.व्ही.निबे, आर.आय.पटेल, एन.डी.लहारे,श्रीमती एस.डी. पोळ.समीर मणियार आदींच्या स्वक्षऱ्या आहेत.
Post a Comment