श्रीरामपूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला संधी देणारे एकमेव ठिकाण म्हणजे शाळा. या शाळा मागील दीड वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे कमी अधिक प्रमाणात चालू बंद अवस्थेत आहेत. नेहमी शाळेत बागडणारी विद्यार्थी अशा काळात घरी थांबून उबगली आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागून राहिली आहे.दरम्यानच्या काळात ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांना संधी मिळत त्या त्यावेळी विद्यार्थी शाळेत येण्याचा प्रयत्न करत.
एरव्ही दिवाळीच्या सुटीत शाळेकडे कधीही न फिरकणारी विद्यार्थी यावेळी मात्र दिवाळीच्या दिवशी चक्क शाळेत उपस्थित राहून दीपोत्सव साजरा केला.उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाचा दीपोत्सव शाळेत उपस्थित राहून आपल्या सवंगड्यासोबत साजरा केला.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी घरीं साजरी न करता शाळेतच दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.प्रमुख्याने कृतिशील शिक्षक शकील बागवान यांनी विद्यार्थ्यांना तसे आवाहनही केले होते.त्यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत मोठ्या आनंदमयी वातावरणात शाळेत दीप प्रज्वलन केले.ज्याप्रमाणे घरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने दीपप्रज्वलन करतात त्याच उत्साहाने प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःसोबत पणत्या आणि इतर साहित्य घेऊन आले आणि शाळेच्या अर्थात ज्ञानमंदिराच्या प्रांगणात ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केले.वर्गासमोर छानशी रांगोळी काढून सुशोभित केले.वर्गाला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधली.दिवाळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसला.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सभापती संगीता शिंदे,उपसभापती बाळासाहेब तोरणे,जिल्हा पारिषद सदस्य शरद नवले, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,डॉ.वंदनाताई मुरकुटे, सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ओहोळ,जितेंद्र भोसले,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षणविस्ताराधिकारी संजीवन दिवे,मंदा दुरगुडे,केंद्रप्रमुख मंगल गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,मुख्याध्यापिका लता पालवे व पालक आदींनी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले.शाळेतील शिक्षकवृंद मेघा साळवे,डॉ.राज जगताप,संघमित्रा रोकडे,संतोष जमदाडे आदींनी या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले व सहकार्य केले.
Post a Comment