Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-अहमदनगर जिला जमियत उलेमा ए हिंन्द शाखा बेलापुर यांच्या वतीने पुरग्रस्त निधीसाठी गावात मदत फेरी काढण्यात आली होती. सकाळी बेलापुरातील झेंडा चौक मैदानापासुन मदत फेरीस सुरुवात करण्यात आली लाँकडाऊन काळ, कोरोना परिस्थिती, कोलमडलेला व्यवसाय या ही परिस्थितीत गावातील व्यापारी नागरीकांनी माणूसकीचे दर्शन घडवत सढळ हाताने मदत केली मौलाना मुफ्ती ईर्शादुल्लाह कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली  बेलापुरचे अध्यक्ष अकबर सय्यद टिन मेकरवाले हाजी ईस्माईल शेख हाजी शकील कुरेशी ईस्माईल आतार शफीक बागवान हाजी चाँद बाबुलाल पठाण शहानवाज सय्यद शोएब शेख कय्युम मोहसीन आदि मदत फेरीत सहभागी झाले होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- शासनाच्या खावटी योजनेंतर्गत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर यांच्या वतीने बेलापुर बु!!बेलापुर खुर्द वळदगाव उंबरगाव ऐनतपुर या गावातील लाभार्थ्यांना जि प सदस्य शरद नवले व प .स सदस्य अरुण पा नाईक यांच्या उपस्थितीत ९५ आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप करण्यात आले            कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने आदिवासी बांधवाकरीता या वर्षी खावाटी अनुदान योजना सुरु केली आहे या योजनेंतर्गत प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या खात्यावर रोख दोन हजार रुपये तसेचएक किलो मटकी दोन किलो चवळी तिन कोलो हरबरा एक किलो वटाणा दोन किलो तूरदाळ एक किलो उडीद दाळ तीन किलो मिठ अर्धा किलो गरम मसाला एक लिटर शेंगदाणा तेल एक किलो मिरची अर्धा किलो चहा पावडर तीन किलो साखर असे अठरा किलो वस्तू व एक तेल पिशवी असे मोफत देण्यात आले तसेच लाभार्थ्याच्या खात्यावर रोख दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे  या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सदस्य मुस्ताक शेख रमेश अमोलीक शफीक बागवान भगवान मोरे जिना शेख दादासाहेब कुताळ मोहसीन सय्यद बाबुराव पवार दत्तू निकम सोपान निकम अनवर बागवान आदिवासी प्रकल्प विभाग राजुर येथील सुरेश कुराकुटे सुनिल गायकवाड अनिल मेढे वाल्मिक जाधव प्रशांत आचारी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )-गावातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेण्याच्या घटनेला आज दहा दिवस उलटून गेले असुन अजुनही त्या मुलीचा शोध न लागल्यामुळे पालकांचा जिव टांगणीला लागला आहे                येथील मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी २३   जुलै रोजी दुपारी घरातुन निघुन गेली होती या बाबत मुलीच्या आईने मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची फिर्याद बेलापुर पोलीस स्टेशनला दिलेली आहे   मुलीच्या आईच्या तक्रारी  वरुन पोलीसांनी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा राजि . नंबर I ४९३/२०२१ भा द वि कायदा कलम ३६३प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ज्या दिवशी ही मुलगी घरातून गेली त्याच दिवशी गावातील एक तरुणही घरातून पैसे घेवुन गायब झालेला आहे पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे परंतु त्यांचा कोठेही ठावठिकाणा लागलेला नाही मुलीचे नातेवाईकही सर्वत्र मुलीचा शोध घेत आहे तसेच पोलीसही आरोपीच्या मागावर आहेत लवकरच मुलीला पालकाच्या ताब्यात देवू असा विश्वास पोलीसांना आहे या बाबत पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे पुढील तपास करत आहे.

बेलापुर (प्रतिनिधी देविदास देसाई )- महसुल दिनानिमित्त महसुल विभागात चांगले कार्य करणाऱ्या अधीकाऱ्यांचा सन्मान करण्यात येत असुन जिल्ह्यात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली असुन १आँगस्ट महसुल दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महसुल दिनानिमित्त चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप असावी जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढेल तसेच इतरांनाही प्रेरणा मिळेल या भावनेतुन महसुल विभागात  उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असुन या वर्षी उत्कृष्ट तहसीलदार म्हणून श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे  उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पूनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांची निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून श्रीगोंदा तहसील मधील श्रीमती योगीता ढोले व जिल्हा पुरवठा कार्यालयातील अभिजीत वांढेकर यांची निवड करण्यात आलेली आहे उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून बेलापुर (श्रीरामपुर )मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व पाथर्डी येथील विरेश्वर खेडकर तर उत्कृष्ट अव्वल कारकुन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील एस व्ही ठोंबरे व राहुरी तहसील मधील श्रीमती ए एस राजवळ यांची निवड करण्यात आली आहे विशेष कोरोना योध्दा पुरस्कार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडधे आदर्श तलाठी प्रशांत हासे संगमनेर पोलीस पाटील गणेश जाधव संगमनेर आदेश साठे नेवासा राजेंद्र गीते जामखेड कोतवाल बी एम बोरडे पारनेर शरद गोंधणे शेवगाव आकाश कर्पे नगर उत्कृष्ट महसुल शिपाई हनुमान बोरगे उत्कृष्ट वाहन चालक महादेव डोंगरे उत्कृष्ट तलाठी बाळकृष्ण साबळे अकोले गुंजवटे सुजाता कर्जत कृष्णा आरसेवार राहाता महसुल सहाय्यक मंगेश ढुमणे आर एम शिरसाठ आदिची जिल्ह्यात उत्कृष्ट महसुलअधिकारी कर्मचारी म्हणून महसुल दिनानिमित्त निवड करण्यात आली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर प्राथमिक  आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गळनिंब येथे लसीकरण सुरू असताना अचानक गोंधळ उडाल्याने लसीकरण अर्ध्यावरच सोडून जाण्याची नामुष्की बेलापूर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांवर आली.   सविस्तर असे की,गळनिंब ता.श्रीरामपूर येथे गुरुवारी बेलापूर उपकेंद्रा अंतर्गत ४५ वर्षावरील नागरीकांसाठी दुसर्‍या डोसचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लसीकरणाची सुरवात ८ वाजेपासून आधार कार्ड जमा करुन  नाव नोंदणी करण्यात आली सरपंच शिवाजी चिंधे हे त्या ठिकाणी थांबून होते  ४५ वर्षापुढील दुसर्‍या डोससाठी आधार कार्ड जमा करून टोकन पध्दतीने लसीकरण सुरू करण्यात आले .६५ ते ७० पंचेचाळीस वर्षापुढील नागरीकांचा दुसरा डोस शिस्तबध्द पार पाडल्यानंतर ४५ वर्षाच्या आतील काही नागरीकांनी पहीला डोस मिळण्यासाठी अरेरावी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे लसीकरण काही काळ बंद करावे लागले डाॅक्टर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दोन तास गोंधळातच बसुन रहावे लागले.वैद्यकीय अधिकारी डाँक्टर देविदास चोखर यांनी प्रथम दुसरा डोस झाल्यानंतर लस शिल्लक राहीली तर १८ वर्षापुढील नागरीकांना देण्यात येईल असे सांगुन देखील जबाबदार नागरीकांनीच गोंधळ घातला या गोंधळामुळे नागरीकांना सेवा देणार्या कर्मचाऱ्यांवर उपाशी पोटी काम करण्याची वेळ आली त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी पसरली बेलापुर  प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कडीत खूर्द कडीत बु!!मांडवे फत्याबाद कुरणपुर गळनिंब उक्कलगाव एकलहरे नरसाळी बेलापुर खूर्द बेलापुर बु!! ऐनतपुर या गावांचा समावेश येतो नागरीकांना विशेष करुन वयोवृध्द नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास होवू नये म्हणून जि प सदस्य शरद नवले यांनी उपकेंद्रात जावून लसीकरण करण्याची सूचना केली होती त्यानुसार  डाँक्टर देविदास चोखर यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावोगावी लसीकरण सुरु केले होते त्यात पहीली लस घेतलेल्या ४५ वर्षापुढील नागरीकांना प्राधान्याने दुसरी लस द्यावी अशा सूचना असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ४५ वर्षावरील नागरीकांना लसीकरण सुरु केले त्यातच काही १८ वर्षावरील तरुणांचीही नोदणी केलेली होती त्या वेळी लस शिल्लक राहीली तर १८ वर्षावरील नागरीकांना देवु असे सांगताच काहींनी गोंधळ सुरु केला  हा गोंधळ तासभर चालू होता आरोग्य कर्मचारी देखील या गोंधळास वैतागले आलेली  लस संपवुन  त्यांनी गळनिंब मधुन काढता पाय घेतला गावातील काही जाणकार अडाणी नागरीकांमुळे अनेक गोरगरीब नागरीकांना लसीपासून वंचीत राहावे लागले.आता उपकेंद्रात होणाऱ्या गोंधळामुळे बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण करण्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी )- एस. टी. च्या अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्टचा कारभार धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नियमानुसार पारदर्शक व्हावा अशी

मागणी जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रणजीत श्रीगोड यांनी  महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे .

या बाबत प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी महसुल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले असुन त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सन २०१६ पासून एस. टी. खात्याने एखादया प्रवाशाचा बसमधून प्रवास करताना मृत्यू झाल्यास

त्याचे वारसदाराला १० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून  आर्थिक सहाय्य व्हावी या करीता "अपघात सहाय्यता निधी "

योजना तयार करून ट्रस्टची स्थापना केली. प्रत्यक्षात मात्र या घटनेतील उद्देश पाहून जनतेची

दिशाभूल करण्यात आली आहे  वारंवार तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल

यांचे अध्यक्षतेखाली ७ वरिष्ठ अधिका-यांची ट्रस्टीज म्हणून नियुक्त करण्यात आली होती .होणारे सर्व व्यवहार हे धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे होणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्ष कारभार

धर्मदाय आयुक्त यांचे नियमानुसार होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्व खर्च

प्रत्येक प्रवासाचे वेळी प्रवाशाकडून या कामासाठी १ रुपया विशेष निधी वसुल करण्यात येतो. हा

सर्व निधी ट्रस्टचे बँकेत जमा होत नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आलेला आहे या बरोबरच  इतरही  ९ सुचनांचे निवेदन ना. थोरात यांना देण्यात आले आहे

सर्व परिस्थिती लक्षात घेता या ट्रस्टचा सर्व कारभार पारदर्शकपणाने होण्याची गरज आहे. अन्यथा

जनतेचा विश्वास उडेल.या बाबत  वारंवार पत्रव्यवहार करुन सुध्दा दखल घेण्यात आली नाही.आमच्या तक्रारीला  केराची

टोपली दाखविण्यात आली आहे . जिल्हा प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड यांनी आमदार डॉ. सुधीर

तांबे, आमदार लहू कानडे यांचे उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, माजी

कार्याध्यक्ष ब्रिजलालजी सारडा व अशोक सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रनाथ पा. थोरात

इ. पदाधिकारी यांनाही दिलेले आहे   यापूर्वी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे,

उपमुख्यमंत्री ना. अजीतदादा पवार, परिवहन मंत्री ना. अनिल परब, प्रदेश भाजपा अध्यक्ष

आ. चंद्रकांत पाटील, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष

ना. जयंत पाटील यांना निवेदन दिलेले आहे. ते काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

श्रीरामपुर   (प्रतिनिधी  )- कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यांना वेळेची मर्यादा घालून दिली असुन व्यापारी वेळेचे बंधन पाळतात परंतु अवैध व्यवसाय खूलेआम दिवसभर सुरु असतात त्यांना पायबंद कोण घालणार ? असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.शासनाने घालून दिलेले नियम सर्व सामान्य जनता तंतोतंत पाळत आहेत परंतु अवैध व्यवसाय खूलेआम सुरु आहेत तालुक्यात मटका अन गुटखा खुलेआम सुरु आहे आकडा येण्याच्या वेळेस ठराविक ठिकाणी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते ज्यांच्या आशिर्वादाने अवैध व्यवसाय सुरु आहेत त्यांना ही गर्दी दिसत नाही का? असा सवाल विचारला जात आहे आता मटका खेळण्यासाठी व खेळविण्यासाठी मोबाईलचा वापर केला जात आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध व्यवसाय आढळल्यास संबधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सांगितले होते तरीही कुठेही अवैध व्यवसायात कमी आलेली नाही सर्व सामान्य नागरीकासाठी लाँकडाऊन असला तरी अवैध धंद्यावाल्यांना ती पर्वणीच ठरली आहे मंध्यतंरी गुन्हा अन्वेषन शाखेने गावठी हातभट्टी चालकावर कारवाई केली परंतु आजही मोठ्या प्रमाणात बनावट दारु तयार करुन ठराविक परमीट चालकांना विकली जाते गुटख्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली नागरीकांना हायसे वाटले गुटखा विक्री बंद होईल असे वाटत असतानाच दाम दुपटीने गुटख्याची विक्री खूलेआम ठिकठिकाणी होत आहे आजही मोठ्या प्रमाणात बाहेरहून गुटख्याची आवक सुरुच आहे अनेक वाळू तस्कराकडे खेळण्यातल्या पिस्तूलाप्रमाणे गावठी कट्टे आहेत इतरांना धमकावण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे वाळू तस्करी प्रतिष्ठेची होत आहे अनेक व्हाईट काँलर राजकारणी वाळूच्या धद्यांत सहभागी होत आहे वाळू तस्करी सुरु राहण्याकरीता आपले राजकीय वजन वापरले जात आहे तर काही वाळू तस्कर पोलीस ,महसुल कर्मचाऱ्यांवर दबाव आणून वाळू तस्करी करत आहे अधिकारीही लालच व धमक्यांना बळी पडत आहेत बोगस पावत्यांच्या आधारे शासनाची फसवणूक होत आहे अनेक ठिकाणी पत्याचे क्लब जुगार अड्डे चालू आहेत मात्र सर्व सामान्यावर कारवाई केली जाते त्यामुळे अवैध व्यवसाय खूलेआम व व्यापाऱ्यांना बंधने हे सर्व सामान्यांच्या समजण्या पलीकडचे आहे मा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी या बाबीकडे लक्ष द्यावे या प्रकरणात बेजबाबदारपणे वागनारे अधिकाऱ्यांची व कर्मचार्‍यांची तडकाफडकी बदली करावी अशी नागरीक ,व्यापारी ,फेरीवाले ,शेतकरी आदिंची मागणी आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget