Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी )- आमच्या ताब्यात असलेल्या संस्थांच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणखी काही राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी जनता विकास अघाडीच्या सर्व मतदारांना निवडून द्या असे अवाहन जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड यांनी केले जनता विकास अघाडीच्या वतीने विविध भागात घेण्यात आलेल्या प्रचार  सभेत ते बोलत होते     आपल्या भाषणात जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड म्हणाले की पाच वर्षात गावात रस्ते गटारी स्ट्रिट लाईट स्वच्छता अशी अनेक कामे केली विरोधकांनी एकही काम न करता केवळ आरडा- ओरड अडथळा आणण्याचे काम केले सदस्यावर ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली तीच ताकद गावाकरीता मोठा निधी आणण्यासाठी खर्च करा जनता तुम्हांला डोक्यावर घेईल पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे निवडणूक आली की यांना जनतेची आठवण येते कोरोना काळात हेच बोंबा मारणारे कुठे दडून बसले होते यांना जनतेच्या नाही आपल्या जिवाची भिती होती म्हणून तर हे घरात दडून बसले होते त्यावेळेस गावातील लोकांच्या मदतीला आम्ही धावुन आहे ते आमचे कर्तव्ये  होते सकाळ पासुन सायंकाळ पर्यत आम्ही गावात ठाण मांडून होतो कुणाला काय लागते कुणाला उपचाराची गरज आहे हे आम्ही कोरोनाला न घाबरता करत होतो हे काम सार्या गावाने पाहीले आहे ते तुम्हाला कसे दिसणार कारण तुम्ही आपल्या कुटुंबा समवेत घरात सुखरुप होता त्यामुळे कोण कामाचा कोण बिन कामाचा हे मतदारांना सांगण्याची    गरज नाही सर्वांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होणारी माणसे आहेत आपल्या सारखी खोटे हसणारे तोंडावर गोड बोलणारे नाही आमच्या ताब्यात असणार्या संस्थेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आम्ही सोडविले आपण काय केले याचे आत्मपरिक्षण करा असा मोलाचा सल्लाही खटोड यांनी दिला

बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी गावात जे चुकीचे चालले आहे ते बंद पाडा संस्कृतीक परंपरा लाभलेल्या गावात आपल्या आया- बहीणींची इज्जत सुरक्षित ठेवायची असेल तर गावकरी मंडळाला विजयी करा चुकीच्या कामाबाबत आवाज उठवा नाहीतर भावी पिढी माफ करणार नाही असा खणखणीत इशारा गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा यांनी दिला आहे  ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारार्थ गावकरी मंडळाच्या गणपती गल्ली केशव गोविंद मंदिर चौक शिवनेरी गल्ली आयोध्या काँलनी रामगड गायकवाड वस्ती येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.आपल्या भाषणात गावकरी मंडळाचे नेते  सुनिल मुथा पुढे म्हणाले की जि प शरद नवले यांनी सत्ताधार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडलाच आहे पंरतु आणखी बरेच काही कारनामे पुराव्यासह माझ्या हाती आले आहे त्यांनी तोंड उघडण्याची भाषा केली मग मी पण आता तोंड उघडाच मग माझ्याकडे असलेली जादुई पोटलीच उघडतो मग त्यातुन कुणाचे काय बाहेर येईल हे सांगता येत नाही ते जर जनते समोर आणले तर जनता तुमचे कपडे.काढल्याशिवाय राहणार नाही आपल्या इज्जतीच पंचनामा होईल म्हणून माझ्याकडे  मध्यस्थ पाठविले त्यामुळे मी पण ते टाळले नाही तर ... गावातील चुकीच्या कामावर बोट ठेवण्याची जबाबदारी आपली आहे ग्रामपंचायत कारभारावर नियंत्रण ठेवले नाही तर हे पुढारी गावही विकतील तेव्हा मतदारांनो जागृक व्हा प्रत्येक कामाची माहीती विचारा सत्ताधार्यावर अंकुश ठेवा हे काम माझ्या एकट्याचे नाही कारभारावर अंकुश नसेल तर सत्ताधारी मन मानेल तसे वागतात पण ते होवु देणार नाही गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरी चुका केल्या तरी त्यांना देखील जाब विचारण्याची दाणत आपल्यात आहे अनेक ठिकाणी गटारी झाल्या पण केवळ बिले काढुन मोकळे झाले गटारीला ढाळच नसल्यामुळे सांडपाणी जागेवरच तुंबले आहे हे लोक मला सांगतात परंतु ते काम होतानाच आपण संबधीतंना जाब विचारला पाहीजे होता सगळे ठेकेदार एकत्र होवुन सत्ता मिळविण्यासाठी धडपड करत आहे पण या वेळेस जनता मतदार हुशार झालेला आहे तुमच्या काळ्या पिशव्या व आणखी काही घेवूनही मतदार गावकरी मंडळालाच विजयी करतील यात शंकाच नाही ज्यांनी गावची मुख्य बाजारपेठ भकास करण्याचे महापाप केले त्यांना पेठेत फिरकु देवु नका ग्रामपंचायतीचे भंगार विकणारे कोण अन बोंब झाल्यावर परत आणणारे कोण हे आता जनतेला समजले आहे गावात वाढत चाललेले आतिक्रमण हा फार गंभीर प्रश्न आहे पंरतु कार्यकर्ते दुखवायचे नाही म्हणून हे गप्प आहे पेठेतुन पायी चालणेही अवघड झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर भिंत बांधली अन एकानेही आवाज उठविला नाही गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या मी स्वतः जावुन ती भिंत तोडेल माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण गावाच्या हितासाठी मी ते करेल असेही मुथा म्हणाले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रभाग क्रमांक १ मधील नदीच्या पलीकडे असणारा भाग मळहद परिसरातुन गावकरी मंडळास वाढता पाठींबा मिळत असुन या वेळेस प्रभाग क्रमांक १ मधुन ईतिहास घडण्याची शक्यता आहे.       प्रभाग क्रमांक १ मधे एकुण मतदार १८५५ असुन त्यातील दोनशेच्या पुढे मतदार मयत आहेत म्हणजे एकुण मतदान १६५० च्या आसपास आहे जवळपास १३५० ते १४०० मतदान होण्याची शक्यता गृहीत धरली तर निवडून येण्याकरीता ७००च्या पुढेच मते मिळवावी लागतील या प्रभागात असणार्या मळहद भागात मतदारांची संख्या ३३७ असुन या वेळेस हेच मतदार विजयी उमेदवार ठरवु शकतील या भागातुन आजपर्यंत एकाही व्यक्तीला जनता अघाडीच्या वतीने उमेदवारी दिली गेलेली नाही त्यामुळे या परिसरातुन नाराजीचा सुर आहे या भागातील नागरीकांच्या अनैक समस्या आहेत परंतु त्याकडे फारसे कुणीही लक्ष दिले नाही त्या भागात स्मशानभूमीचा प्रश्न होता तो मोठ्या मुश्कीलीने सोडविला गेला अनेक ठिकाणी पावसाळ्यात वस्तीवर जाता येत नाही पण उमेदवार केवळ पाच वर्षतुन येतात त्यामुळे त्यांना येथील परीस्थीतीची जाणीव नाही त्यामुळेच तर एका निवडणूकीवर बहीष्कार टाकण्याची घोषणा या भागातील नागरीकांनी केली होती त्यांनंतर काही सुधारणा होवुन या भागातील प्रश्न मार्गी लागतील असे वाटले होते परंतु तसे काही झालेच नाही त्यामुळे हा परिसर बेलापुर खूर्द ग्रामपंचायतीला जोडण्याचीही मागणी करण्यात आली होती या सर्व बाबीचा विचार करुन गावाकरी मंडळाचे नेते शरद नवले यांनी प्रभाग १ मधुन बागवान तबसुम शफीक या मळहद येथील महीलेस उमेदवारी दिल्यामुळे या भागातील मतदारांचा उत्साह वाढला आहे तसेच गोरे सांजया बापुराव व सौ माधुरी प्रशांत ढवळे यांना उमेदवारी दिली असुन त्यांचे चिन्ह रोलर ट्रँक्टर व अँटोरिक्षा आहे गावकरी मंडळाच्या प्रचारात आता मळहद परिसरातील कार्येकर्ते उत्साहात काम करताना दिसत आहे त्यामुळे मंडळाच्या नेत्यामध्येही कमालीचा उत्साह जाणवत आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर गटातुन दोन वेळा जिल्हा परिषदेत निवडून येवुन नऊ वर्षात या गावाला किती निधी दिला आगोदर याचा खूलासा करा मग आमच्या कामावर बोट ठेवा लोकांनी तुम्हाला जिरवा- जिरवी करीता निवडून दिले नाही याचे भान ठेवा असा सवाल बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी केला आहे जनता विकास अघाडीच्या वतीने गावात अनेक ठिकाणी काँर्नर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या सभेत बोलताना बाजास समितीचे संचालक व जनता विकास अघाडीचे नेते सुधीर नवले म्हणाले की  आम्ही भ्रष्टाचार केला हीच एकच कँसेट शरद नवले वाजवत आहे कामावर चर्चा करा आम्ही न केलेली कामे दिसतात त्याच बरोबर केलेली कामे पण सांगा की जनतेला स्वतः काही करायचे नाही अन आम्ही केलेल्या कामावर खोट्या तक्रारी करुन अधिकार्यावर दबाव आणून चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडण्या पलीकडे आपण केले काय हे सांगा तुम्हाला आलेल्या निधीपैकी किती निधी गावाला दिला याचा खूलासा करा लोकांनी जिल्हा परिषद सदस्य केले ते विकास कामे करण्यासाठी कुणाच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावण्यासाठी नाही आपण नेमलेले दलाल लोकाकडून पैसे उकळतात हे दिसत नाही का उगीच भूई थोपटू नका विकास कामावर बोला आमचे काम बोलते आहे काम करणारा थोडा फार चुकणार आहे पण आपण जि प सदस्य असताना काहीच केले नाही दुसर्यांच्या चौकशा लावण्या पलीकडे त्यामुळेच  आता पराभव दिसु लागल्यामुळे बेताल आरोप सुरु केले असुन कोण कामाचा कोण बिन कामाचा हे जतनेला माहीत आहे कोण गोड हसातो गोड बोलतो हे ही ठाऊक आसल्यामुळे लोकही आता त्यांच्याबरोबर गोडच बोलत आहे १५तारखेनंतर सागळा खूलासा होणारच आहे मतदार सुज्ञ आहेत ते खोट्या भुलथापेला बळी पडणार नाही असेही सुधीर नवले म्हणाले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सत्ताधार्यांना दहा वर्षाच्या कार्यकाळात शासनाचा २० कोटी रुपयाचा निधी मिळाला अन या पैशात एकही ठोस काम झाले नाही मग हा निधी गेला कुठे असा सवाल करुन गावाच्या विकासाठी गावकरी मंडळाच्या सर्व सदस्यंना निवडणूक द्या असे अवाहन गावकरी मंडळाचे नेते जि प सदस्य शरद नवले यांनी केले.गावकरी मंडळाच्या प्रचारार्थ गावात गावठाण सुभाषवाडी शेलारवाडा राजवाडा खटोड काँलनी येथे आयोजित सभेत बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की गावाच्या विकासाचा एक मास्टर प्लँन आपण तयार केलेला आहे आमच्या ताब्यात आपण सत्ता दिली तर आम्ही एकदम पारदर्शी कारभार करु ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज संगणका मार्फत केले जाईल दररोजच्या कामाचा हिशोब कार्यालयाच्या फलकावर लावला जाईल ग्रामस्थांना आपल्या तक्रारी करीता ग्रामपंचायत कार्यालयात येण्याची गरज नाही त्याकरीता एक टोल फ्री नंबर दिला जाईल नागरीक घर बसल्या आपली तक्रार करु शकेल अशी व्यवस्था केली जाईल मागील बोगसगीरी

भ्रष्टाचाराला आमच्याकडे थारा नसेल पिण्याचे पाणी रस्ते गटारी नागरीकांचे आरोग्य या कामास प्राधान्य दिले जाईल एवढा मोठा निधी आला असताना त्याचा वापर सत्ताधार्यांनी केवळ खिसे भरण्यासाठी केला अन मी कामाला आडवे येतो असा कांगावा केला मी आडवे आलो पण चुकीच्या कामाला गावात चाललेल्या चुकीच्या कामावर बोट ठेवले बोगस बिले काढणार्या विरुध्द आवाज उठविली यांना पैसे खायला अडचण होवु लागल्यामुळे माझ्या नावाने ओरडायला लागले दोनदा सरपंच पद भोगलेली व्यक्ती चुकीच्या कामामुळे अपात्र ठरविली गेली काहींनी तर संबध नसतानाही ग्रामपंचायत ठेकेदारीवर चालवायला घेतली अन कुणीही विरोध केला नाही मन मानेल तसे काम करुन बोगस बिले काढली चुकीचे कामकाज चाललेले असतानाही कुणीही विरोध केला नाही  आमच्या सदस्यांनी त्यास विरोध केला गावाचा निधी स्वतःच्या फायद्याकरीता वापरला दुसरीकडील रस्ता आपल्या काँम्प्लेच्या फायद्याकरीता बस स्टँडच्या मागे करुन घेतला झाडे तोडली चुकीच्या कामांना विरोध केल्यामुळे त्यांनी माझा धसका घेतला आहे स्वतःच्या काँम्प्लेक्ससाठी ४० फुटाचा रस्ता करुन घेतला अन ९  लाख रुपयाचे बिल काढले असे चुकीचे काम करणारांना मतदानाच्या माध्यमातून जाब विचारण्याची वेळ आलेली आहे गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या निधी आणण्याचे काम माझे आहे असेही जि प सदस्य शरद नवले म्हणाले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावाच्या विकासासाठी गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या गावकरी मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवुन  विकास कामे करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे असे विधान गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा यांनी केले गावकरी मंडळाच्या प्रचारार्थ खटोड काँलनी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते     आपल्या भाषणात मुथा पुढे म्हणाले की आपला स्वाभिमान गहान ठेवु नका आज पैशाच्या जोरावर तुमची मते विकत घेतली जातील परंतु पाच वर्षे तुम्ही विकास कामावर बोलुच शकणार नाही कुणी काम घेवुन गेले तर ते लगेच पैसे घेवुन मतदान केले हे म्हणतील त्यामुळे आपला मतदानाचा हक्क न घाबरता आपली

सदसद विवेक बुध्दी जागी ठेवुन मतदान करा समोरच्या पार्टीने काही दिले तरी ते घ्या पण मतदान गावकरी मंडळालाच करा या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी होणार असली तरी तो पैसा सत्तेतुनच मिळविलेला आहे तो गावाचा म्हणजे आपलाच पैसा आहे पैसा त्यांचा घ्या पण मतदान गावकरी मंडळाला करा मी आजपर्यत गावाच्या विकासासाठी भाडणे करत आलेलो आहे हे सर्वांनी पाहीले आहे मग ते अतिक्रमण असो रस्त्याचे काम असो की भंगार चोरीचे प्रकरण असो चुकणाराला जाब विचारण्याची आपल्यात दानत आहे दहा वर्ष सत्ता भोगली म्हणून काहींना वाटत असेल की आम्ही गावचे मालक झालो तर तो समज काढुन टाका कै मुरलीशेठ खटोड यांनी २२ वर्ष गाव गाडा हाकला पण कुणाची त्यांच्या कारभारावर बोट ठेवण्याची ताकद झाली नाही अन आज काय चालले आहे हे सर्व आपल्या समोर आहे या भागातील फार वर्षापासुनचा प्रलंबीत असलेला गटारीचा प्रश्न तातडीने सोडविला जाईल या बाबत संबधीत सोमाणी कुटुंबीयांशी चर्चा झालेली आहे अन मार्गही निघालेला आहे त्यामुळे गावकरी मंडळाचे सर्व उमेदवार तरुण तडफदार असुन ते निश्चितच गावचा चेहरा मोहरा बदलुन टाकतील असेही मुथा म्हणाले.

बेलापुर (प्रतिनिधी  )- - लाॅकडाऊन काळात मयत व अपंग माणसांच्या नावावर खोटे चेक काढुन आपले उखळ पांढरे केले  बगलबच्यांना सांभाळले अशा नतद्रष्ट लोकाना जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार  नाही असे उदगार जि प सदस्य शदर नवले यांनी काढले  सर्वसामान्य लोकांना कुठेही मदत दिली गेली नाही , खरे लाभार्थी लाभापासुन वंचित राहीले  त्यांना मदत केली नाही,  अश्या लोकांना तुम्ही निवडून देणार आहात का? सभा  पार पडल्यावर मतदारांना फोन केले जातात   तुम्ही सभेत का गेलात ? अशी दमबाजी सत्ताधाऱ्यांकडून केली जाईल, तुम्ही मिटींगला का गेले व का बोलले ?  तुम्हाला धमकावले जाईल घाबरू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील  आता या  गावगुंडांची दादागिरी मोडून काढण्याची वेळ तुमच्यावर आली.

          *असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना केले*.


      - *सभेत बोलताना नवले पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या जागेत बचत गट भवन बांधण्याचा मानस आहे, बचत गटांना  चालना देण्यासाठी मोठे मार्केट उभे करण्यासाठी त्यांची जबाबदारी आमच्या सारख्यावर राहणार असल्याने ती आपण पुर्ण करू, अशी ग्वाही नवले दिली.*


       *आपल्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार नवले यांनी केला आहे*. 


         *आलीबाबा चाळीस जणांची टोळी गावात आता  एकएका मतांसाठी वणवण फिरत आहे.  दहा वर्षात काय दिवे लावले हे जनता आता विचारत इहे हीच सुज्ञ जनता इतकी दुधखुळी नाही, गावाला यापुढील काळात नवीन वळण लावावा लागणार आहे. यांचीही बोगसगिरी जनता खपवून घेणार नाही* 

    -  *असेही नवले म्हणाले* 


   -  *सभेत बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की*, 

   *खार्‍या पिण्याच्या पाण्यामुळे माता -भगिनी आजारी पडत आहे. आपले जेष्ठ नागरिक आजारी पडत असल्याने आपल्या गावामध्ये व आपल्या भागात मोठ्या आरोग्याच्या समस्या उभ्या  आहेत पाणी पुरवठ्यावर कुणाचेही नियंत्रण नाही   पाणी पुरवठ्याला कुठेही टायमिंग नाहीच,बडी मंडळी दररोज आर ओचे फिल्टर पाणी पित आहे पण सर्वसामान्याचे काय त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार  असा सवाल अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे* 

*चाँदनगर येथे झालेल्या गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठकीत केला*. 


      *खंडागळे म्हणाले की, गेल्या 10 वर्षेच्या कालखंडात विकास कामांमध्ये  फार मोठा भ्रष्टाचार* *झालेला आहे.  विकास कामे*

*करत असतानाच मलई खायची हा मोठा उद्योग गेल्या 10 वर्षेच्या कालखंडात सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा आरोप खडांगळे यांनी केला*


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget