Latest Post

बुलडाणा - 19 जून -स्थानीम गुन्हे शाखा बुलडाणाच्या एका पथकाने धामणगांव धाड येथील एका गोदामावर धाड टाकून अंदाजे 180 क्विंटल धान्य पकडला असुन त्यात तांदूळ,मका,गहु व हरभरा आहे तर तांदूळ व गहु सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशनचा असु शकते,याची शहनिशा बुलडाणा तहिसलचे पुरवठा विभाग करीत आहे.
      बुलडाणा तालुक्यातील ताराडखेड येथील नदीम बेग यांनी धामणगाव धाड येथील  प्रकाश श्रीराम सपकाळ यांच्या मालकीचे धान्य गोदाम भाडेतत्वावर घेतले आहे. दरम्यान 16 जून रोजी सायंकाळच्या सुमारास बुलडाणा एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे,पोलिस उपनिरीक्षक इमरान इनामदार व इतर कर्मचारी वाहनाने गस्तीवर असतांना या गोदामात २ इसम संशयास्पद स्थितीत धान्याची पोती रचतांना दिसून आली. गोदामाची पाहणी केली असता गोदामात अंदाजे तांदूळ 200 कट्टे, मका 150 कट्टे, गहू 12 कट्टे, हरभरा 10 कट्टे असे अंदाजे 180 क्विंटल धान्य दिसून आले. याबाबत चौकशी केली असता सदर धान्य शासकीय वितरण प्रणालीतील विना परवाना साठवून ठेवल्याचा संशय आल्याने एलसीबीच्या पथकाने वरिष्ठांशी संपर्क साधून या बाबत बुलडाणा तहसीलदार यांना पत्र दिल्याने घटनास्थळी बुलडाणा पूरवठा निरीक्षक जूमडे व नायब तहसिलदार अमरसिंह पवार हे पोहचले. सदर धान्यसाठा हा शासकीय वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही हे रात्र झाल्यामुळे समजले नाही.सदर गोदाम 16 जूनला रात्री सील करून पुन्हा आज 17 जून रोजी उघडण्यात आले व सदर धान्याची मोजमाप करून सदर धान्यसाठा बुलडाणा येथील शासकीय धान्य गोदामात जमा करण्यात आल्याची माहिती आहे. पकडलेला धान्यातील तांदूळ व गहु हे रेशन चा आहे किंवा नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी,या प्रकरणी काय कार्यवाही होते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

श्रीरामपुर /प्रतिनिधी :लोकडाऊन मध्ये आख्खा देश त्रस्त असताना गोदी मिडियाचे काही दलाल पत्रकार व ॲकर  आपल्या चॅनलचे टी.आर.पी वाढवण्यासाठी एखाद्या धर्माची बदनामी व्हावी म्हणून काहीही बडबड करतात यासाठी आपले चॅनल न्युज 18 इंडियाचे टी.आर.पी वाढवण्यासाठी व मुस्लिम द्वेश पसरवण्यासाठी अमिश देवगण नामक दलाल  पत्रकाराने मुस्लिमांसाठी द्वैववत असणारे ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरुन आम्हा मुस्लिम बांधकांच्या भावना दुखावल्या आहे.अमिश देवगण हा ॲकर वेळोवेळी आपल्या शो मध्ये कोणालाही बोलवून फालतु डिबेट करत असतो .यात कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील याच सुद्धा भान ठेवत नाही .त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण करणारा अमिश देवगणवर गुंन्हा दाखल करावे नी न्युज 18 चॅनेलवर बंदी घालावी असे निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार यांना समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले .निवेदनावर समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएब जमादार , तालुकाध्यक्ष फय्याज कुरेशी , शहराध्यक्ष इमरान इरानी ,अरबाज कुरेशी ,दानिश पठाण ,आसिफ तांबुळी , जकरिया सय्यद , जाहिद कुरेशी , तनवीर शेख यांच्या सह्या आहेत .

श्रीरामपूर - देशात सध्या चालू असलेल्या कोरोना महामारी आणि आपल्या सर्व शेजारील देशांकडून चालु असलेल्या कुरापती अश्या संकटकाळीन परिस्थितीत आय बी एन 18 न्युज सारखे न्युज चॅनेल चा नालायक अॅंकर अमिश देवगण ने राष्ट्रीय सुफी संत मोईनोद्दीन चिश्ती अजमेरी रहे. यांच्या विषयी एका डीबेट मधे अतिशय चुकीचा शब्द प्रयोग करून देशाच्या मुस्लिम समाज आणि बाबांना मानणाऱ्या असंख्य भक्तांचे मन दुखावण्याचे काम केले आहे. अश्या नालायक पत्रकारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक सा. यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अमिश देवगण सारख्या नालायक देशद्रोही पत्रकारावर कार्यवाही करण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मुस्लिम समाजाच्या वतीने हाजी मुजफ्फरभाई शेख, मुन्नाभाई पठाण, अहमदभाई जहागिरदार फिरोज दस्तगिर,आदिल मखदुमी,डॉ.सलिम शेख, हाजी आरिफ बागवान, भाजपाचे फहीम शेख,साजिद मिर्झा, फिरोज पठाण,शाहीद कुरेशी,एम आय एम चे नाझीम शेख इकबाल शेख,यु.काॅ.चे जाफर शाह, सलिम जहागिरदार, सलिम झुल्ला, जावेद तांबोळी, आय्युब पोपटीया, नदिम तांबोळी, अबुल मणियार,अजून बर्‍याच समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील वृध्दाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील तपासणी केलेल्या सहाही जणांचे अहवाल काल निगेटिव्ह आल्यामुळे श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.कांदा मार्केट परिसरात राहत असलेल्या एका 75 वर्षीय वृध्दाचा अपघात झाला.त्यास प्रथम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यात तो फ्रॅक्चर झाल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी व पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रथम करोना चाचणी करून त्याचा अहवाल मागविला असता तो पॉझिटिव्ह आला होता.त्यामुळे श्रीरामपूर येथील स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत त्याच्या संपर्कात आलेले त्याच्या कुटुंबातील दोघे व श्रीरामपुरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याच्या संपर्कात आलेले चौघे असे सहा जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल काल सायंकाळी प्रास्त झाला. या सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. हे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला असला तरी श्रीरामपूकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

अहमदनगर दि.१७ - शहरातील कल्याणरोडवरील नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी १५ लाख ४४ हजार ८२० रुपयांची विदेशी दारुची वाहतूक करणारा पिकअप गाडी पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. नरेंद्र राजेंद्रसिंग रौतेला (वय ४०, रा.घर नं.२०४ प्रेमनगर, माजरा बायपास मलहान, डेहराडून, उत्तरखंड) , चालक बबन भाऊसाहेब काकडे (वय ३५, रा.गोरेगाव ता.पारनेर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार भाळवणीकडून कल्याण रोडाने अहमदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच १६, एई ११८१) ही विदेशी दारुचे बाँक्स घेऊन येत आहे. पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच १६, बीएच १९१९) या गाडीतून दारू घेऊन जाणारा मालक येत आहे. अशी पक्की खबर स्था.गु.शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार स्था.गु शाखेच्या पथकाने नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी सापळा लावून मुद्देमालासह दारू वाहुन नेणाऱ्या दोघांना पंचासमक्ष पकडण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना संदिप कर्डीले, पोकाँ रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, सागर सुलाने, कमलेश पाथरुट आदिच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.

नवी दिल्ली | वृत्तसंस्था पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव असताना मोठी माहिती समोर आली आहे.या चकमकीत जवळपास 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 पोहोचली असल्याचे एका वृत्तसंस्थेने सांगितले आहे.सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.20 जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्करानेही दुजोरा दिला आहे. चकमकीत जखमी झालेले 17 जवानदेखील शहीद झाल्यामुळे  एकूण संख्या 20 झाल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. तर या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 पोहोचली असल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

अहमदनगर ( प्रतिनिधी )   जिल्ह्यातील करोना बाधितांच्या आकड्यात मंगळवारी तिने वाढ झाली. यात मुंबई (कुर्ला) येथून आलेल्या दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोघे कुर्ला येथील वाहन चालक असून एका नगरजवळील बोल्हेगाव फाटा येथे तर दुसरा शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथे आला होता.तिसरा पॉझिटिव्ह राहाता येथील असून खासगी प्रयोग शाळेत या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 261 वर पोहचली असून यात अवघे 37 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार काल कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव (ता. शेवगाव) येथे आलेला 41 वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही व्यक्ती एसटीमध्ये चालक म्हणून काम करत असून 14 जून रोजी ही व्यक्ती भावी निमगाव येथे गावी आली होती. ताप आणि श्‍वसनाच्या त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल केल्यानंतर घेतलेला त्याचा स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आला आहे.तसेच कुर्ला नेहरूनगर येथून बोल्हेगाव फाटा, (नगर शहराजवळ) येथे आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती देखील कुर्ला नेहरूनगर येथे चालक म्हणून काम करत होती. त्याचा स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच राहाता शहरातील एका व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 261 वर पोहचली आहे.
दिवसभरात 51 अहवाल निगेटिव्ह जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत 3 हजार 508 स्त्राव नमुने तपासले असल्याची जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी यांनी दिली. मंगळवारी सकाळी 31 तर रात्री आणखी 20 असे 51 स्त्राव नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.
 सात रुग्णांची करोनावर मात जिल्ह्यातील आणखी सात करोनाग्रस्तांनी आजारावर मात करत घरी परतले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून आज मिळाला डिस्चार्ज मिळाला असून यात संगमनेर 4, राहाता 2 आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 213 झाली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget