Latest Post

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- बेलापूर  व परिसरात सर्वात जुनी असणाऱ्या जामा मस्जिदचे नुतनीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले  असुन मस्जिदच्या स्लँबच्या काँक्रीटीकरणाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके सुनील मुथा अरुण पा नाईक सुधीर नवले यांच्या हस्ते करण्यात आले          बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत असणारी जामा मस्जिद तिनशे ते साडेतिनशे वर्षापूर्वीची मस्जिद आहे  या  जामा मस्जिदचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोहसीन सय्यद मुन्ना बागवान यांनी घेतला या निर्णयास  अनिस काझी शफीक बागवान जब्बार आतार कौसर सय्यद नासीर बागवान यांनी सहमती दाखवीली व निधी गोळा करण्यास सुरुवात केली निधी जमा होताच कामास सुरुवात करण्यात आली बांधकाम व्यवसाय करणार्या सर्व मुस्लिम बांधवांनी विना मोबदला योगदान दिले अन कामास गती आली या मस्जिदच्या स्लँबच्या कामाचा नारळ गावातील सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समितीचे सचालक सुधीर नवले पचायत समिती सदस्य अरुण पा नाईक अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे  टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा जामा मस्जिदचे ट्रस्टी  बहोद्दीन सय्यद जाफरभाई आतार रणजीत श्रीगोड राम पौळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला जामा मस्जिदच्या कामाचा शुभारंभ हिंदु बांधवाच्या हस्ते करुन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे या उपक्रमामुळे दोन समाजात वाढत चाललेले अंतर कमी होवुन जातीय सलोखा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

बुलढाणा - 28 मई विगत 12 मई को 'वंदे भारत" मिशन के अंतर्गत फिलीपाइन्स से 12 लोग बुलढाणा पहुंचे थे जिन्हें प्रशासन के निर्देश पर शहर एक होटल में क्वॉरेंटाइन किया गया था किंतु एक 24 वर्षीय युवक वहां से प्रशासन को बिना सूचित किए फरार हो गया जिसकी स्वेब की रिपोर्ट कोरोना पॉजिटिव प्राप्त होने के बाद प्रशासन में खलबली मच गई है. इस मामले में फरार युवक के खिलाफ बुलढाणा शहर थाने में अपराध दर्ज किया गया है.
       देशभर में कोरोना के कारण लॉकडाउन घोषित किया गया है. कई लोग देश के विभिन्न शहरों में फंस गए थे. इसी प्रकार विदेशों में भी कई भारतीय अटके हुए थे. केंद्र शासन ने विदेश में अटके लोगों को अपने वतन वापस लाने के लिए "वंदे भारत" ये विशेष मिशन चलाया जिसके तहत बुलढाणा शहर में 12 मई को फिलीपाइन्स से 12 छात्र वापस लौटे थे. इन सब को प्रशासन ने बुलढाणा की आलीशान होटल बुलढाणा क्लब रेसीडेंसी में 14 दिन के लिए क्वारंटाईन कर दिया था.इन लोगों के स्वेब के नमूने लेकर जांच के लिए भेज दिए गए थे. इधर 14 दिन पूरे होने से 1 दिन पूर्व ही अर्थात 25 मई को दोपहर में एक युवक प्रशासन को बताए बिना ही होटल से अपने घर वापस आ गया और उसने कई लोगों से मुलाकात की,शहर के एक हेयर सलून पर भी गया इसके अलावा मैदान में अपने दोस्तों के साथ फुटबॉल भी खेला था. 27-28 मई की दरमियानी रात में इस युवक की रिपोर्ट प्रशासन को कोरोना पॉजिटिव प्राप्त होते ही प्रशासन युवक को अस्पताल ले जाने के लिए जब होटल पहुंचा तो पता चला कि, युवक होटल से फरार है. प्रशासन ने पहले तो युवक और उसके परिवार और उसके संबंध में आए तकरीबन 10 लोगों को कोविड अस्पताल में दाखिल किया है. फिलीपाइन्स से लौटे इस युवक का क्वारंटाईन सेंटर से फरार होना शहर के लिए यकीनन एक बड़ी मुसीबत खड़ी कर सकता है जिस की गंभीरता को भांपते हुए जिला अस्पताल के सीएस प्रेमचंद पंडित की शिकायत पर फरार युवक के खिलाफ बुलढाणा शहर। थाने में भादवि की कलम 188,279,271 तथा राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कानून 2005 की कलम 52,54 तथा महामारी अधिनियम 1897 की कलम 3 के तहत अपराध दर्ज किया गया है.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )-  करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. सर्व धार्मिक उत्सव घरामध्ये साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी रमजान ईद असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागात संचलन करून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. करोना विरोधात अहोरात्र लढा देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरी बद्दल नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवून स्वागत केले.करोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस मेहनत घेत आहे. धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाने संयम बाळगून रमजानमध्ये पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. असेच सहकार्य करत रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर  शहर पोलिसांनी संचलन केले.
जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सींह यांनी सर्व पोलुस बांधवांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली सर्वांची आरोग्य तपासणी झाली का पोलीसांना वेळेवर औषधे सँनिटायझर व ईतर सामुग्री वेळेवर दिली जाती का याचीही बारकाईने चौकशी केली श्रीरामपूर  शहर पोलीस स्टेशन पासुन निघालेले पोलीसांचे पथ संचलन वार्ड नंबर दोन मधुन पुन्हा पोलीस स्टेशनला आले या संचलनात अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मँडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीसांची आस्थेने चौकशी केल्यामुळे पोलीसांना एक वेगळीच उर्जा मिळाली.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- नगर मनमाड महामार्गावर व इतर ठिकाणी रस्यावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने नुकतीच अटक केली असून  त्यांच्याकडून तीन मोटारसायकली व एअरगन हस्तगत करण्यात आली आहे,     यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,नगर-मनमाड महामार्गावर तसेच पुणतांबा चौफुली व इतर ठिकाणी पहाटेच्यावेळी वाहने अडवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती, या टोळीने दिनांक 17 मे रोजी पहाटे ४,१५वा, लालजी तोमर हे मध्य प्रदेश येथून आपल्या एम, एच, 15/ ई,जी 47 17 या ट्रकमध्ये गहू घेऊन कोपरगाव औद्योगिक वसाहत येथे  येत असताना पुणतांबा चौफुलीजवळ गोदावरी शीड फॉर्म जवळ पत्ता विचारण्यासाठी थांबल्यावर अचानक मागून दोन विना नंबर मोटरसायकलीवर  सहा जणांनी येऊन या ट्रकच्या केबिनमध्ये घुसून ट्रकचालक व दोन साथीदारांना मारहाण करून त्यांच्याकडील 56000 रोख रक्कम लुटून नेली ,त्याच दिवशी दिनांक 17 मे रोजी पहाटे पाच वाजता वैभव फुला वाघ हे वर टेंबे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून आपल्या पिकअप गाडीत कोथिंबीर घेऊन सोलापूर येथे विकण्यासाठी गेले होते तेथून कोथंबीर विकून ते परत सोलापूरहून  आपल्या पिअकप गाडी नंबर एम, एच 41 /ए,जी 26 17 या वाहनातून परत आपल्या घरी वरचेटेंबे,ता, सटाणा येथे येत असताना पुणतांबा चौफुलीवर अचानक पाठीमागून दोन विना नंबरच्या मोटरसायकलवरून चार जण येऊन त्यांनीही पिअकप गाडी थांबून पिकअप मधील चालक व मालक यांना  मारहाण करून त्यांच्याकडील 35000 रुपये रोख काढून घेऊन पोबारा केला, या दोन्ही गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक 21 रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी असे असिफखान सरदारखान हे आपल्या साथीदारांसह आपली ट्रकMH41/AU/1301 यामध्ये कराड येथून साखर भरून मालेगाव येथे जात असताना निर्मळ पिंप्री शिवारात दोन विना नंबरच्या पल्सर गाड्यांवर चौघे जण पाठीमागावुन व गाडीअडवुन व, थांबवुन  केबिनमध्ये घुसून चालक व  ट्रकमधल्या साथीदारांना मारहाण करून ट्रक चालकाकडून एक लाख 12 हजार रोख व 5000 रुपयाचा मोबाईल चोरून नेला, या घटनेची फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला देण्यात आली, या तिन्ही घटने मुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीहोती, लॉक डाऊन काळात ज्या घटना घडल्या, या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे सोपवल्या नंतर पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पोलीस कर्मचारी पथकाने विविध पथके निर्माण करून विविध ठिकाणी या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीचा तपास लावण्यासाठी विविध ठिकाणी पाठवल्या, या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीचा शोध घेण्यात पोलिसांनी अहोरात्र मोठे परिश्रम घेतले, या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीत अरिफ गफुर शेख, वय 25 रा, अवघड पिंपरी तालुका, राहता व सागर गोरख मांजरे 24 मातापुर ता, श्रीरामपूर या  आरोपींसह  त्यांचे इतर साथीदार या टोळीत सक्रिय असल्याचे पोलिसांना समजले, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी  आरिफ शेख व सागर मांजरे यांना ताब्यात घेऊन त्यांचे साथीदार अविनाश श्रीधर साळवे वय 22 राहणार राहुरी ,सुखदेव गोरख मोरे ,वय २३राहणार पिंपळवाडी ,ता, राहाता,चेतन राजेंद्र सणाचे वय १९रा, पिंपळवाडी तालुका राहता, अक्षय सुदाम माळी वय22 राहणार खंडोबा गल्ली ,तालुका राहाता, अक्षय सुरेश कुलथे राहणार राहुरी, सागर पोपट  हरिचंद्रे,वय२२ राहणार राहुरी व एक अल्पवयीन मुलगा यांना विविध ठिकाणाहून पाठलागकरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे, या सर्व आरोपींकडून 120000 च्या दोन विनानंबरच्या पल्सर व तीस हजाराची एक मोटरसायकल तसेच २०००रु,ची एअरगनअसा  एकूण 1 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून जिल्ह्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, हे सर्व आरोपी राहुरी येथे रात्रीएकत्र येत, त्यानंतर ते पिंपळवाडी तालुका राहता येथे सुखदेव गोरख मोरे यांच्या घरी किंवा शेतात थांबत असत, त्यानंतर पहाटे तीन वाजता तीन मोटरसायकलीवर तीन तीन आरोपी बसुन महामार्गावर किंवा रस्त्यावर वाहनांची रेकी करण्यासाठी येत, दोन मोटरसायकलवरील सहा आरोपी  हे वाहनांचा पाठलाग करून, अडवून त्यांना लुटत व एका मोटरसायकलवरील तीन आरोपी हे इतर वाहने व पोलिसांची वाहने येतात, जातात यावर पाहणी करत व एकमेकांना मेसेज देत असत ,अशा या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने अटक केली असून या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे, या तपास कामी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शन व सूचनांवरून पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि सागर पाटील, शिशिरकुमार देशमुख नाणेकर, , मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे , रवींद्र कर्डिले संतोष लोंढे दीपक शिंदे रवी सोनटक्के ,विशाल दळवी राहुल सोळंकी रंजीत जाधव, सागर सुलाने, प्रकाश वाघ, सागर ससाणे, चालक संभाजी कोतकर सचिन कोळेकर आदींनी मोठे परिश्रम घेतले, अधिक तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.

शिर्डी (जय शर्मा )-सध्या कोरोणामुळे देशात जगात अनेक रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत ,अनेकांना राज्यात जिल्ह्यात रक्ताची मोठी गरज भासू लागली आहे, अशा परिस्थितीत रक्तदान करणे, सर्वात श्रेष्ठ दान समजले जात आहे ,त्यामुळेच शिर्डीतील समाजसेवेत अग्रेसर सहाणारे  समाज  बांधवांच्या वतीने सिंधी समाजातील समाजसेवकांनी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान च्या रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले ,
शिर्डीत श्री साईबाबा संस्थान ची रक्तपेढी असून येथे हे लॉक डाऊन पूर्वी साईभक्तांनी रक्तदान करावे , इतर दाना बरोबरच रक्तदान श्रेष्ठ असल्याचे विविध ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत ,लॉकडाउन पूर्वी शिर्डीत मोठी गर्दी होती, मोठ्या संख्येनेसंख्येने साईभक्त येऊन रक्तदान करत होते, मात्र लॉक डाऊन मुळे गेल्या 17 मार्च पासून शिर्डीत साईभक्त येणे बंद झाले आहे त्यामुळे रक्तदान करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे ,त्यामुळेच नेहमी रक्तदान करणारे शिर्डीतील सिंधी समाजातील बांधव यांनी दिनांक 23 /5/ 2020 रोजी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चा रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले, नित्य साई सेवा व सिंधी समाज मित्र मंडळातील सनी रोहरा, मनोज मोटवानी, सुनील तोलानी, रोहन तोलानी मनोज रामचंदानी सजंय फुदंवानी ,यांनी रक्तदान केले तसेच  राजेश टिकीयानी यांनी  मोलाचे सहकार्य केले, या सर्वांचे शिर्डी व परिसरातून अभिनंदन होत आहे.

(राहाता प्रतिनिधी  मसूद मुस्ताक शाह  ) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून शासनाने देशात लॉकडाऊन सुरू केला आहे, अशा लॉकडाऊनच्या  काळात सर्व काही बंद असताना रमजानचा पवित्र सण आला आहे ,आज शेवटचा पवित्र रोजा असून उद्या पवित्र रमजान ईद आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात राहूनच नमाज  अदा करावी व देशाला ,जगाला या कोरोणा महामारी पासून वाचवावे अशी अल्लाला प्रार्थना करावी ,असे आवाहन मुस्लिम समाजातील समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शहा यांनी केले आहे.जगात, देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे,  सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे , सर्व काम धंदे  बंद आहेत, लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू झाला आहे,  या लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात  काही वेळेत  काही दुकानांना उघडण्यास  परवानगी देण्यात आली आहे  , तसेच जिल्हा अंतर्गत अटी व शर्ती ठेवून प्रवासही करता येत आहे, मात्र संचारबंदी 31 मेपर्यंत जारी आहे , तसेच  कोरोणा महामारी चा  संसर्गाचा धोका ही   अद्याप टळलेला नाही , जरी  राहाता तालुका कोरोणा मुक्त असला तरी  कोरानाचा धोका  भविष्यातही टाळणे गरजेचे आहे,  या लॉकडाउनच्या  काळातच हा पवित्र रमजान महिना  आला आहे,  त्यामुळे  महिनाभर  सर्व मुस्लिम बांधवांनी  स्वच्छेने  तसेच शासनाचे ,व लॉकडाऊन चे नियम पाळत  प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात  नमाज अदा केली , आज  रमजानचा पवित्र  शेवटचा रोजाअसुन यासंदर्भात ,समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शाह यांनीपुढे।सागितले की, रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण अाहे, पण शंभर वर्षानंतर प्रथमच सामूहिकपणे नमाज न करता या दिवशी प्रत्येकाला घरात राहून नमाजअदा करावी लागत आहे, मात्र, प्रत्येकाचे जीवन, कुटुंब राज्य, देश महत्त्वाचा असून कोरोणा यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरातच नमाज अदा करावी व व फोनवरूनच एकमेकांना ईद शुभे्छा द्याव्यात ,तसेच या महामारी पासून सर्वांना वाचवण्याचे अल्लाला साकडे घालावे ,असे आवाहनही राहाता येथील समाजसेवक इलियास शहा व मे मुस्ताक शहा  यांनी यावेळी केलेआहे.

श्रीरामपूर -तालुक्यातील निपाणी वाडगाव परिसरातील लाटे वस्ती येथे रात्री गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यु झाला. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.या बाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लोटीवस्ती येथेल वायकर व साळवे यांच्यात जागेवरू वाद होता. या कारणावरून त्यांच्यात आज सायंकाळी पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही तरुणांनी त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तेथे तैनात करण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget