बेलापूर ( प्रतिनिधी )- बेलापूर व परिसरात सर्वात जुनी असणाऱ्या जामा मस्जिदचे नुतनीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले असुन मस्जिदच्या स्लँबच्या काँक्रीटीकरणाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके सुनील मुथा अरुण पा नाईक सुधीर नवले यांच्या हस्ते करण्यात आले बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत असणारी जामा मस्जिद तिनशे ते साडेतिनशे वर्षापूर्वीची मस्जिद आहे या जामा मस्जिदचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोहसीन सय्यद मुन्ना बागवान यांनी घेतला या निर्णयास अनिस काझी शफीक बागवान जब्बार आतार कौसर सय्यद नासीर बागवान यांनी सहमती दाखवीली व निधी गोळा करण्यास सुरुवात केली निधी जमा होताच कामास सुरुवात करण्यात आली बांधकाम व्यवसाय करणार्या सर्व मुस्लिम बांधवांनी विना मोबदला योगदान दिले अन कामास गती आली या मस्जिदच्या स्लँबच्या कामाचा नारळ गावातील सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समितीचे सचालक सुधीर नवले पचायत समिती सदस्य अरुण पा नाईक अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा जामा मस्जिदचे ट्रस्टी बहोद्दीन सय्यद जाफरभाई आतार रणजीत श्रीगोड राम पौळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला जामा मस्जिदच्या कामाचा शुभारंभ हिंदु बांधवाच्या हस्ते करुन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे या उपक्रमामुळे दोन समाजात वाढत चाललेले अंतर कमी होवुन जातीय सलोखा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
Post a Comment