Latest Post

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा)सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे, अशा लॉक डाऊन च्या काळात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये राहता व कोपरगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना व व दोन्ही तालुक्यातील मौलानाना पोलिसांनी बोलावून रमजान ईद निमित्त बैठक घेतली, मात्र या बैठकीला सुमारे शंभर ते दीडशे मुस्लीम बांधव उपस्थित होते पोलिसांनी लॉक डाऊन चे नियम तोडत पोलीस स्टेशन आवारात गर्दी जमवली, हे लॉक डाऊन चे नियम पायदळी तुडवल्या यासारखे असून यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्स पाळण्यात आले नाही ,शिवाय अनेकांनी मास्क वापरलेले नव्हते, विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लॉक डाऊन चा नियम दाखवणारे पोलीस मात्र आपल्याच आवारात ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची बैठक बोलावतात व या बैठकीला गर्दी होत असताना शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे मार्गदर्शन करतात, इतर पोलिस अधिकारीही  हे सर्व पाहतात पण कोणीही नियमाचे पालन करण्यासाठी दक्षता घेत नाही,येथे कोणताही नियम पाळला जात नव्हते, तसेच पत्रकारांनाही आत मध्ये येण्यास मज्जाव करण्यात येत होता, अहमदनगर जिल्हा नॉन रेड झोन मध्ये जरी असला व। शिर्डीजरी  कोरोणा मुक्त असली तरी कोरोणा चा प्रादुर्भाव किंवा संसर्ग अशा  गर्दीच्या बैठकांमुळे होण्याची दाट शक्यता असल्याने हे टाळणे गरजेचे होते परंतु कुंपणच शेत खात असले तरी यावर सर्वसामान्य काय करणार। पोलिसांनी यावेळी गर्दी सांगणे गरजेचे होते मात्र पोलीस यंत्रणाही यावेळी कुचकामी ठरली गेली, नियम व कायदा सर्वांना सारखाच आहे ,त्यामुळे लॉकडाउन चे नियम व कायदे मोडणाऱ्या सर्वांची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी त्वरित चौकशी करून कारवाई करावी व ज्यांनी लॉकडाउनचे  नियम मोडले आहेत, ज्यांनी ही बैठक बोलावली व सोशल डिस्टंन्स न पाळता  नियम मोडले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शिर्डी मधून होत आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने जाहीर केलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये झाल्याने जिल्ह्यात अनेक सुविधा, बाबींना शुक्रवार (दि.22) पासून जिल्हा प्रशासनाने नव्याने परवानगी दिली आहे. त्यात प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने उघडण्यास, तसेच रिक्षा, टॅक्सी, जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलूनही सुरू होणार असून विवाह, अंत्यविधीला 50 लोक उपस्थित राहू शकतात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. मात्र, दररोज सायंकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत सक्तीने सर्व बंद ठेवण्यात येणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनमधील जिल्हे घोषित केले असून त्यात नगर जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी बुधवारी जिल्ह्यात कोणत्या बाबी सुरू राहतील व कोणत्या बाबींना प्रतिबंध असेल याबाबत आदेश काढले. त्यात प्रामुख्याने कंटेन्मेंट झोन (ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले) वगळता आतापर्यंत बंद असलेल्या बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. याशिवाय सर्व दुकानेही उघडतील. मात्र, याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असेल.अत्यावश्यक सेवेची दुकाने (मेडिकल, पेट्रोलपंप, एटीएम) मात्र त्यांच्या निर्धारित वेळेत सुरू राहतील. दुकानांत गर्दी झाल्याचे आढळल्यास दुकाने त्वरित बंद केली जातील. क्रीडा संकुले, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या होतील. मात्र प्रेक्षक व सार्वजनिक जमावास बंदी असेल. सर्व खासगी व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी असेल. मात्र दुचाकीवर केवळ एकचजण प्रवास करेल. तीन चाकीवर तीन, तर चार चाकीतही तिघांनाच परवानगी असेल. जिल्हांतर्गत बस सेवेला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह व शारिरिक अंतर ठेवून व स्वच्छताविषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.
144 कलम कायम-जिल्ह्यात अनेक व्यवहारांना परवानगी दिलेली असली तरी कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. याचा भंग करणार्‍यावर कडक करवाईचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.
सातच्या आत घरात-अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर, फिरण्यास सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत निर्बंध राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानांत ग्राहकांमध्ये 6 फुटांचे अंतर राखावे व पाच पेक्षा जास्त ग्राहक एका ठिकाणी नसावेत, असे आदेशात म्हटले आहे.
थुंकणार्‍यावर होणार दंड-सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वा कामाचे ठिकाणी थुंकणार्‍यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी. सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकी दरम्यान सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत.
 हे सुरू करण्यास परवानगी-सलून दुकाने, हॉस्पिटल, क्लिनिक, बाह्यरुग्ण तपासणी, टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी वाहने (चालकासह तिघे), दुचाकी (केवळ चालक), जिल्हांतर्गत बससेवा, मालवाहतूक, उद्योग, बांधकामे, शहरातील व ग्रामीणमधील सर्व दुकाने, बाजारपेठा, ई-कॉमर्सद्वारे वस्तूपुरवठा, खासगी कार्यालये, शासकीय कार्यालये (100 टक्के), कृषीविषयक कामे, बँका आणि वित्तीय सेवा, टपाल व कुरिअर सेवा, तातडीच्या वैद्यकीय कारणासाठी प्रवास, कटिंग, सलून, स्पा, ब्यूटीपार्लर, स्टेडियम (प्रेक्षकांशिवाय), रेस्टॉरंट (केवळ होम डिलीवरीकरिता), बसस्थानक, रेल्वेस्थानकवरील कॅन्टीन, दुय्यम निबंधक कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, विवाह समारंभ, अंत्यविधी (केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत).
 हे मात्र बंदच-विमान, रेल्वे, मेट्रो वाहतूक, आंतरराज्य रस्ते मार्गाने प्रवास, आंतरजिल्हा बससेवा, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मॉल्स, धार्मिक स्थळे व मोठ्या गर्दीची ठिकाणे, आठवडे बाजार बंद राहणार. 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षांखालील मुले व गरोदर स्त्रिया यांना घराबाहेर पडता येणार नाही. तथापी बस स्थानक, रेल्वे स्टेशन व विमानतळ येथील कॅन्टीन सुरू ठेवता येतील. केवळ घरपोहच डिलीवरीसाठी रेस्टॉरंटचे किचन सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

कोपरगाव प्रतिनिधी-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात दोन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने  वाईनशॉप बंद आहेत. जिल्हयात काही ठिकाणी वाईनशॉप सुरू झाले, मात्र कोपरगावात  खबरदारी म्हणुकन वाईन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक मद्यप्रेमींची हाल होत होते. नुकतेच कोपरगाव शहरामध्ये दुकाने उघडण्या संदर्भात लॉक डाऊन  शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यानुसार उद्या गुरूवार दिनांक 21 मे पासून आठवड्यातुन दोन दिवस सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत कोपरगाव शहरातील वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील मद्यपी मधुन मोठे समाधान व्यक्त होत आहे
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात, राज्यात लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे येथे सर्व बंद होते, दोन महिन्यापासून कोपरगाव येथील वाईन शॉप व मध्य विक्री केंद्रही बंद होती , व आजपर्यंत बंद आहेत, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मद्यविक्री केंद्रे अटी व शर्तींवर चालू करण्यात आली आहेत, मात्र कोपरगावात आज पर्यंत मध्य विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती, कारण कोपरगाव जवळच येवला शहरात कोरोना चे रुग्ण आढळत असल्याने कोपरगावात ही मोठी दक्षता घेण्यात येत होती ,त्याच धर्तीवर येथिल मद्य विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात शहरात थोडी ढिलाई देण्यात आली असल्याने तसेच काही दुकाने काही वेळेसाठी उघडण्यात येणार आहेत ,गेल्या दोन महिन्यापासून बंद असणारे वाईन्स शॉप ,देशी दारू दुकाने, बिअर शॉपी आदी मद्य विक्री केंद्र आठवड्यातून दोन दिवस सकाळी १० ते५ या वेळेत उघडण्यात येणार आहे, तशी प्रशासनाने परवानगी दिल्याचे मद्यपीमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे, मात्र ही मद्यविक्री केंद्रे उघडल्यानंतर लॉक डाऊन चे नियम पाळणे महत्त्वाचे आहे अन्यथा श्रीरामपूर, राहता, राहुरी याठिकाणी वाईन शॉप उघडताच मोठी गर्दी झाली होती ,सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते, अनेकांच्या तोंडाला मास्क ही नव्हते ,त्यामुळे हे वाईन शॉप त्वरित पोलिसांनी कारवाई करत बंद केली होती, कोपरगावात ही गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली वाईन्स गुरुवारी उघडणार असे समजताच मद्यपींची  गर्दी येथे होण्याची दाट शक्यता आहे ,परंतु वाईन शॉप दुकानात लॉक डाऊन चे नियम पाळणे अति महत्त्वाचे आहे अन्यथा दुकानदार व ग्राहकांवर कारवाई करण्यात यात येईल असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे ,तसेच
दि, 22 तारखे नंतर दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यास पुढील सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे अशे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेआहे. 

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )-शिंगणापूर येथील मायलेकी मंगल किसन ढोले वय ४५ व मुलगी सुमन विठ्ठल कुदळे वय २५व लहान मुलगा गौरव वय ३व सौरव वय एक वर्ष या घरातुन बेपत्ता झाल्याची तक्रार  पती  विठ्ठल सुखदेव कुदळे यांने कोपरगाव ग्रामीण पोलीसात दिली होती शोधाशोध करून हि तपास लावण्यात यश आले नव्हते घरात असलेली अडचण बेरोजगारी व कोरोणा महामारी आजारामुळे लाॅकडाउन व संचारबंदी असल्याने मला काम नव्हते घरातील कौटुंबिक अडचणी मुळे बाहेर पडलेल्या होत्या त्यांनी भोजणालया समोरील जागेत शिर्डी येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र जवळपास असलेले साईबाबा संस्थान चे सुरक्षा रक्षक व काही तरुणांच्या लक्षात हा प्रकार येताच शिर्डी पोलीसांनी तात्काळ गंभीर दखल घेऊन साईनाथ रुग्णालयात त्याना दाखल केले  यावेळी या महिला पोटाला अन्न मिळत नसेल तर जगायचे कशाला व कौटुंबिक ताणतणाव यामुळे टोकाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून डॉ प्रफुल्ल पोरवाल यांनी उपचार सुरू केले आहेत मंगल ढोले या महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्याचे तपासणी मध्ये पुढे आले  आहे दोघींची ही प्रक्रृत्ती सुधारत आहे  कौटुंबिक ताणतणाव असलेली गरिबी बेरोजगारी व दोन महिन्यांपासून नसलेला रोजगार यातुन हा प्रकार घडला आहे   बेरोजगारी गरिबी कौटुंबिक ताणतणाव यातुन हा प्रकार घडला आहे असावा असा संशय महिलेचा पती विठ्ठल सुखदेव कुदळे यांने बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले.

शिर्डी ( राजेंद्र गडकरी ) सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन सुरू आहे, या लॉक डाऊन मुळे शिर्डीतही ही सर्व काही बंद आहे, गेल्या दोन महिन्यापासून शिर्डीत सर्व बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प आहे, त्यामुळे शिर्डीतील घरपट्टी ,पाणीपट्टी शिर्डी नगरपंचायत ने माफ करावी, अशी मागणी शिर्डी करांमधून होत आहे, दरवर्षी शिर्डीतून मोठ्या प्रमाणात नगरपंचायतला कर शिर्डीकर देतात, मात्र या संकटकालीन आपत्तीत यावर्षी शिर्डीकरानाही आर्थिक टंचाई भासत असल्याने यावर्षी घरपट्टी ,पाणीपट्टी नगरपंचायतीने रद्द करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे,शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राचे शहर आहे, येथे नगरपंचायत आहे, शिर्डीतील नगरपंचायत ही राज्यातील श्रीमंत अशी नगरपंचायत समजली जाते, दरवर्षी शंभर टक्के घरपट्टी पाणीपट्टी वसुली होत असते, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू आहे ,दोन महिने शिर्डीतील दुकाने पूर्ण बंद होती ,साईभक्त येणे बंद असल्यामुळे शिर्डीतील आर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प होती शिर्डीतील बहुतांशी लोकांचे जीवन हे साई मंदिर व साई भक्तांवर अवलंबून आहे ,मात्र तेच बंद असल्याने येथे आर्थिक टंचाई जाणू लागली आहे, अशा संकटकालीन परिस्थितीत यावर्षी नगरपंचायतीने शिर्डी करांना सहकार्य करण्याऐवजी शिर्डीतील नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी भरण्याचे फोनवर सूचना केल्या जात आहेत, घरपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन कट करण्यात येईल असेही सांगितले जात आहे, मुळातच लॉक डाऊन मुळे संकटात सापडलेला शिर्डीकर आता या शिर्डी नगरपंचायत च्या फतव्याने मोठा पेचात सापडला आहे त्यामुळे सर्व थरातून यावर्षी शिर्डीतील  घरपट्टी व पाणीपट्टी नगरपंचायतने मोठे  मन दाखवून माफ करावी, अशी एकमुखी मागणी आता शिर्डीतील सर्वसामान्य व गरीब तसेच सर्व रहिवाशी करत आहेत.

शिर्डी (जय शर्मा)- शिर्डी व परिसरात लॉकडाउन च्या काळात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, परिसरात अवैध दारू तसेच वाहने चोरीला जाण्याचे प्रकारात मोठी वाढ झाली आहे, वाहने जाळण्याचे प्रकार  सुरूच आहेत, या गोष्टीवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नुकतीच रांजणगाव येथून चोरीला गेलेली महिंद्रा पिकअप जीप एम एच ४५/९३५२व ती चोरी करणारे चार आरोपी उमेश वायदंडे, आकाश दीपक गायकवाड संदीप दिलीप रजपूत व एक लहान मुलगा यांना मुद्देमालासह पकडले आहे, अहमदनगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी शिर्डीत येऊन हे चोरी करणारे चार आरोपी पकडतात मुद्देमाल जप्त करतात मग स्थानिक पोलिस काय करतात। असा सवाल शिर्डीकर करत आहेत, तसेच शिर्डी व परिसरात सध्या लॉक डाऊन च्या काळात सुद्धा मोटरसायकली,कार, जाळणारे  यांचा तपास मात्र अजून लागत नाही, यामुळे शिर्डीतील  पोलीस अधिकारी कुठे।आहेत,असा प्रश्न शिर्डीकर विचारत आहेत,शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, येथे लॉकडाउनच्या अगोदर दररोज हजारो साईभक्त साई दर्शनासाठी येत जात असत, मोठी आर्थिक उलाढाल येथे होत असत, अशा आर्थिक उलाढाल होणाऱ्या शहरात दोन नंबर धंदे हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, सध्या कोरोणामुळे सर्व बंद असताना व लॉक डाऊन सुरू असतानाही ही अवैध दारूधंदे, अवैध व्यवसाय ,व्यवसाय अवैध दारूचे साठे,दारू चोऱ्या तसेच रस्त्याने जाणारे वाहने अडवून पैसे लुटणे ,वाहने चोरी, करणे, घराबाहेर अंगणात उभ्या असणाऱ्या मोटरसायकली ,कार जाळणे असे प्रकार शिर्डी व परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढले आहे, मात्र  या सर्व गोष्टींकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे ,शिर्डी व परिसरात असे अवैध धंदे वाढले असतानाही स्थानिक पोलीस मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे, त्यामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून शिर्डीत नेमकी पोलीस प्रशासन काय करते आहे असा सवाल उठत आहे याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे असेही शिर्डीतून बोलले जात आहे.

राहता प्रतिनिधी ( मुस्ताक शाह ) कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  देशात, राज्यात लॉक डाऊन सुरू आहे ,राहता शहरात लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात ढिलाई झाल्यासारखे वाटत आहे, कारण येथेकिराणा,भाजीपाला,दुध,मेडीकल,आदी घेण्यासाठी रस्त्यावर खूप गर्दी दिसून येते ,तसेच रस्त्यावर दुकानात मोठी गर्दी होत आहे,  राहाता शहरात  व्यावसायिकांना नियम अटी ठेऊन व्यापार करण्यास परवानगी दिली असली तरी अनेक जण मास्क वापरत नाही, सुरक्षितव  सामाजिक अंतर ठेवत नाही , लॉकडाउनचे नियम पाळत नाही, परवानगी नसतानाही विनाकारण मोटरसायकल ,वाहने घेऊन फिरतात,अशीच परिस्थिती राहिली तर कोरोणाचां शिरकाव शहरात होण्याचे प्रकार घडतील, शासनाने जरी व्यापार करण्याची, काही दुकाने काही वेळेसाठी उघडण्याची परवानगी दिली असली तरी अनेक जण दुकानांची वेळ पाळत नाहीत, तसेच खरेदीच्या निमित्ताने लोकही बाहेर पडत आहेत, म्हणून लोकांनी विनाकारण फिरू नये, गरजे पुरतेच बाहेर निघायला हवे आणि यावर प्रशासनाने बंधने  आणणे गरजेचे आहे, राहता शहर कोरोणा मुक्त आहे ,ते तसेच या पुढेही  राहावे, यासाठी पोलीस, महसूल, राहता नगरपालिका व सर्व नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आता राहताकरामधुन  बोलले जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget