शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा)सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे, अशा लॉक डाऊन च्या काळात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये राहता व कोपरगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना व व दोन्ही तालुक्यातील मौलानाना पोलिसांनी बोलावून रमजान ईद निमित्त बैठक घेतली, मात्र या बैठकीला सुमारे शंभर ते दीडशे मुस्लीम बांधव उपस्थित होते पोलिसांनी लॉक डाऊन चे नियम तोडत पोलीस स्टेशन आवारात गर्दी जमवली, हे लॉक डाऊन चे नियम पायदळी तुडवल्या यासारखे असून यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्स पाळण्यात आले नाही ,शिवाय अनेकांनी मास्क वापरलेले नव्हते, विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लॉक डाऊन चा नियम दाखवणारे पोलीस मात्र आपल्याच आवारात ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची बैठक बोलावतात व या बैठकीला गर्दी होत असताना शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे मार्गदर्शन करतात, इतर पोलिस अधिकारीही हे सर्व पाहतात पण कोणीही नियमाचे पालन करण्यासाठी दक्षता घेत नाही,येथे कोणताही नियम पाळला जात नव्हते, तसेच पत्रकारांनाही आत मध्ये येण्यास मज्जाव करण्यात येत होता, अहमदनगर जिल्हा नॉन रेड झोन मध्ये जरी असला व। शिर्डीजरी कोरोणा मुक्त असली तरी कोरोणा चा प्रादुर्भाव किंवा संसर्ग अशा गर्दीच्या बैठकांमुळे होण्याची दाट शक्यता असल्याने हे टाळणे गरजेचे होते परंतु कुंपणच शेत खात असले तरी यावर सर्वसामान्य काय करणार। पोलिसांनी यावेळी गर्दी सांगणे गरजेचे होते मात्र पोलीस यंत्रणाही यावेळी कुचकामी ठरली गेली, नियम व कायदा सर्वांना सारखाच आहे ,त्यामुळे लॉकडाउन चे नियम व कायदे मोडणाऱ्या सर्वांची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी त्वरित चौकशी करून कारवाई करावी व ज्यांनी लॉकडाउनचे नियम मोडले आहेत, ज्यांनी ही बैठक बोलावली व सोशल डिस्टंन्स न पाळता नियम मोडले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शिर्डी मधून होत आहे.
Post a Comment