कोपरगाव प्रतिनिधी-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात दोन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने वाईनशॉप बंद आहेत. जिल्हयात काही ठिकाणी वाईनशॉप सुरू झाले, मात्र कोपरगावात खबरदारी म्हणुकन वाईन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक मद्यप्रेमींची हाल होत होते. नुकतेच कोपरगाव शहरामध्ये दुकाने उघडण्या संदर्भात लॉक डाऊन शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यानुसार उद्या गुरूवार दिनांक 21 मे पासून आठवड्यातुन दोन दिवस सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत कोपरगाव शहरातील वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील मद्यपी मधुन मोठे समाधान व्यक्त होत आहे
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात, राज्यात लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे येथे सर्व बंद होते, दोन महिन्यापासून कोपरगाव येथील वाईन शॉप व मध्य विक्री केंद्रही बंद होती , व आजपर्यंत बंद आहेत, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मद्यविक्री केंद्रे अटी व शर्तींवर चालू करण्यात आली आहेत, मात्र कोपरगावात आज पर्यंत मध्य विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती, कारण कोपरगाव जवळच येवला शहरात कोरोना चे रुग्ण आढळत असल्याने कोपरगावात ही मोठी दक्षता घेण्यात येत होती ,त्याच धर्तीवर येथिल मद्य विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात शहरात थोडी ढिलाई देण्यात आली असल्याने तसेच काही दुकाने काही वेळेसाठी उघडण्यात येणार आहेत ,गेल्या दोन महिन्यापासून बंद असणारे वाईन्स शॉप ,देशी दारू दुकाने, बिअर शॉपी आदी मद्य विक्री केंद्र आठवड्यातून दोन दिवस सकाळी १० ते५ या वेळेत उघडण्यात येणार आहे, तशी प्रशासनाने परवानगी दिल्याचे मद्यपीमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे, मात्र ही मद्यविक्री केंद्रे उघडल्यानंतर लॉक डाऊन चे नियम पाळणे महत्त्वाचे आहे अन्यथा श्रीरामपूर, राहता, राहुरी याठिकाणी वाईन शॉप उघडताच मोठी गर्दी झाली होती ,सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते, अनेकांच्या तोंडाला मास्क ही नव्हते ,त्यामुळे हे वाईन शॉप त्वरित पोलिसांनी कारवाई करत बंद केली होती, कोपरगावात ही गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली वाईन्स गुरुवारी उघडणार असे समजताच मद्यपींची गर्दी येथे होण्याची दाट शक्यता आहे ,परंतु वाईन शॉप दुकानात लॉक डाऊन चे नियम पाळणे अति महत्त्वाचे आहे अन्यथा दुकानदार व ग्राहकांवर कारवाई करण्यात यात येईल असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे ,तसेच
Post a Comment