शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )-शिंगणापूर येथील मायलेकी मंगल किसन ढोले वय ४५ व मुलगी सुमन विठ्ठल कुदळे वय २५व लहान मुलगा गौरव वय ३व सौरव वय एक वर्ष या घरातुन बेपत्ता झाल्याची तक्रार पती विठ्ठल सुखदेव कुदळे यांने कोपरगाव ग्रामीण पोलीसात दिली होती शोधाशोध करून हि तपास लावण्यात यश आले नव्हते घरात असलेली अडचण बेरोजगारी व कोरोणा महामारी आजारामुळे लाॅकडाउन व संचारबंदी असल्याने मला काम नव्हते घरातील कौटुंबिक अडचणी मुळे बाहेर पडलेल्या होत्या त्यांनी भोजणालया समोरील जागेत शिर्डी येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र जवळपास असलेले साईबाबा संस्थान चे सुरक्षा रक्षक व काही तरुणांच्या लक्षात हा प्रकार येताच शिर्डी पोलीसांनी तात्काळ गंभीर दखल घेऊन साईनाथ रुग्णालयात त्याना दाखल केले यावेळी या महिला पोटाला अन्न मिळत नसेल तर जगायचे कशाला व कौटुंबिक ताणतणाव यामुळे टोकाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून डॉ प्रफुल्ल पोरवाल यांनी उपचार सुरू केले आहेत मंगल ढोले या महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्याचे तपासणी मध्ये पुढे आले आहे दोघींची ही प्रक्रृत्ती सुधारत आहे कौटुंबिक ताणतणाव असलेली गरिबी बेरोजगारी व दोन महिन्यांपासून नसलेला रोजगार यातुन हा प्रकार घडला आहे बेरोजगारी गरिबी कौटुंबिक ताणतणाव यातुन हा प्रकार घडला आहे असावा असा संशय महिलेचा पती विठ्ठल सुखदेव कुदळे यांने बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले.

Post a Comment