शिर्डी ( राजेंद्र गडकरी ) सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन सुरू आहे, या लॉक डाऊन मुळे शिर्डीतही ही सर्व काही बंद आहे, गेल्या दोन महिन्यापासून शिर्डीत सर्व बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प आहे, त्यामुळे शिर्डीतील घरपट्टी ,पाणीपट्टी शिर्डी नगरपंचायत ने माफ करावी, अशी मागणी शिर्डी करांमधून होत आहे, दरवर्षी शिर्डीतून मोठ्या प्रमाणात नगरपंचायतला कर शिर्डीकर देतात, मात्र या संकटकालीन आपत्तीत यावर्षी शिर्डीकरानाही आर्थिक टंचाई भासत असल्याने यावर्षी घरपट्टी ,पाणीपट्टी नगरपंचायतीने रद्द करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे,शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राचे शहर आहे, येथे नगरपंचायत आहे, शिर्डीतील नगरपंचायत ही राज्यातील श्रीमंत अशी नगरपंचायत समजली जाते, दरवर्षी शंभर टक्के घरपट्टी पाणीपट्टी वसुली होत असते, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू आहे ,दोन महिने शिर्डीतील दुकाने पूर्ण बंद होती ,साईभक्त येणे बंद असल्यामुळे शिर्डीतील आर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प होती शिर्डीतील बहुतांशी लोकांचे जीवन हे साई मंदिर व साई भक्तांवर अवलंबून आहे ,मात्र तेच बंद असल्याने येथे आर्थिक टंचाई जाणू लागली आहे, अशा संकटकालीन परिस्थितीत यावर्षी नगरपंचायतीने शिर्डी करांना सहकार्य करण्याऐवजी शिर्डीतील नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी भरण्याचे फोनवर सूचना केल्या जात आहेत, घरपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन कट करण्यात येईल असेही सांगितले जात आहे, मुळातच लॉक डाऊन मुळे संकटात सापडलेला शिर्डीकर आता या शिर्डी नगरपंचायत च्या फतव्याने मोठा पेचात सापडला आहे त्यामुळे सर्व थरातून यावर्षी शिर्डीतील घरपट्टी व पाणीपट्टी नगरपंचायतने मोठे मन दाखवून माफ करावी, अशी एकमुखी मागणी आता शिर्डीतील सर्वसामान्य व गरीब तसेच सर्व रहिवाशी करत आहेत.

Post a Comment