शिर्डी (जय शर्मा)- शिर्डी व परिसरात लॉकडाउन च्या काळात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, परिसरात अवैध दारू तसेच वाहने चोरीला जाण्याचे प्रकारात मोठी वाढ झाली आहे, वाहने जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत, या गोष्टीवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नुकतीच रांजणगाव येथून चोरीला गेलेली महिंद्रा पिकअप जीप एम एच ४५/९३५२व ती चोरी करणारे चार आरोपी उमेश वायदंडे, आकाश दीपक गायकवाड संदीप दिलीप रजपूत व एक लहान मुलगा यांना मुद्देमालासह पकडले आहे, अहमदनगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी शिर्डीत येऊन हे चोरी करणारे चार आरोपी पकडतात मुद्देमाल जप्त करतात मग स्थानिक पोलिस काय करतात। असा सवाल शिर्डीकर करत आहेत, तसेच शिर्डी व परिसरात सध्या लॉक डाऊन च्या काळात सुद्धा मोटरसायकली,कार, जाळणारे यांचा तपास मात्र अजून लागत नाही, यामुळे शिर्डीतील पोलीस अधिकारी कुठे।आहेत,असा प्रश्न शिर्डीकर विचारत आहेत,शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, येथे लॉकडाउनच्या अगोदर दररोज हजारो साईभक्त साई दर्शनासाठी येत जात असत, मोठी आर्थिक उलाढाल येथे होत असत, अशा आर्थिक उलाढाल होणाऱ्या शहरात दोन नंबर धंदे हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, सध्या कोरोणामुळे सर्व बंद असताना व लॉक डाऊन सुरू असतानाही ही अवैध दारूधंदे, अवैध व्यवसाय ,व्यवसाय अवैध दारूचे साठे,दारू चोऱ्या तसेच रस्त्याने जाणारे वाहने अडवून पैसे लुटणे ,वाहने चोरी, करणे, घराबाहेर अंगणात उभ्या असणाऱ्या मोटरसायकली ,कार जाळणे असे प्रकार शिर्डी व परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढले आहे, मात्र या सर्व गोष्टींकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे ,शिर्डी व परिसरात असे अवैध धंदे वाढले असतानाही स्थानिक पोलीस मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे, त्यामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून शिर्डीत नेमकी पोलीस प्रशासन काय करते आहे असा सवाल उठत आहे याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे असेही शिर्डीतून बोलले जात आहे.

Post a Comment