राहता प्रतिनिधी ( मुस्ताक शाह ) कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात, राज्यात लॉक डाऊन सुरू आहे ,राहता शहरात लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात ढिलाई झाल्यासारखे वाटत आहे, कारण येथेकिराणा,भाजीपाला,दुध,मेडीकल,आदी घेण्यासाठी रस्त्यावर खूप गर्दी दिसून येते ,तसेच रस्त्यावर दुकानात मोठी गर्दी होत आहे, राहाता शहरात व्यावसायिकांना नियम अटी ठेऊन व्यापार करण्यास परवानगी दिली असली तरी अनेक जण मास्क वापरत नाही, सुरक्षितव सामाजिक अंतर ठेवत नाही , लॉकडाउनचे नियम पाळत नाही, परवानगी नसतानाही विनाकारण मोटरसायकल ,वाहने घेऊन फिरतात,अशीच परिस्थिती राहिली तर कोरोणाचां शिरकाव शहरात होण्याचे प्रकार घडतील, शासनाने जरी व्यापार करण्याची, काही दुकाने काही वेळेसाठी उघडण्याची परवानगी दिली असली तरी अनेक जण दुकानांची वेळ पाळत नाहीत, तसेच खरेदीच्या निमित्ताने लोकही बाहेर पडत आहेत, म्हणून लोकांनी विनाकारण फिरू नये, गरजे पुरतेच बाहेर निघायला हवे आणि यावर प्रशासनाने बंधने आणणे गरजेचे आहे, राहता शहर कोरोणा मुक्त आहे ,ते तसेच या पुढेही राहावे, यासाठी पोलीस, महसूल, राहता नगरपालिका व सर्व नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आता राहताकरामधुन बोलले जात आहे.

Post a Comment