Latest Post

शिर्डी लगतच्या निमगाव कोर्राळे गावात ११मे रोजी पहाटे ४वाजेच्या सुमारास साईबाबा संस्थान च्या भोजनालयात काम करत असलेल्या भागवत दामोधर साळवे यांची होंडा शाईन  एम एच १७सी बी २११४व नातेवाईक संखाराम गोविंद विर यांची बजाज डिस्कव्हर एम एच १७ अॆ एच ५८३४व हिरो होंडा एम एच १७वाय६०२२अशा जवळपास एक लाख रुपये किंमतीच्या दुचाकी पेट्रोल टाकून  कोणीतरी खोडसाळ पणे पेटवून दिल्याने  मोठी खळबळ उडाली आहे
एक महिन्यापूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांची नवी कोरी कार पेटवून देण्यात आली होती अजुन या आरोपींचा शिर्डी पोलीसांना तक्रार दाखल करुन हि तपास लावण्यात यश आले नसताना संचारबंदी व लाॅकडाउन सुरू असताना अडचणी मध्ये आलेल्या रोजंदारीवर काम करत असलेल्या साळवे यांच्या सह नातेवाईक लोकांच्या दुचाकी पेटवून देणारया आरोपींचा शिर्डी पोलीसांनी शोध घ्यावा  अशी मागणी भागवत साळवे यांनी. शिर्डी पोलीसात दिलेल्या तक्रारीत केली या घटनास्थळी  शिर्डी पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली आहे   या कुटुंबातील लोकांना आधार देण्यासाठी संरपच शिल्पा कातोरे उपसरपंचअजय जगताप माजी उपसरपंच विजय कातोरे सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे  चेअरमन राजेंद्र गाडेकर ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ कातोरे माजी सदस्य धनंजय पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी तलाठी भाऊसाहेब मांढरे ग्रामविकास अधिकारी आर के गायकवाड हजर होते  तीन दुचाकी पेटवून नुकसान करणारा जो कोणी संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून असा प्रकार करत असेल अशाच शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे यांनी केली आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लोकडाऊन सुरु असून या आपत्तीजनक परिस्तिथीत गोरगरीब सर्व सामान्य  कुटुंबांना कामधंदे नसल्याने पोटाचा प्रश्न पडत आहे  राज्याचे माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सिंधुताई विखे पाटील अन्नदान योजने अंतर्गत गोरगरिबांना पाच रुपयात भोजन पाकिटे देण्यात येत असून या योजनेचा सावळीविहीर  बु तालुका राहता येथे आज रविवार पासून शुभारंभ करण्यात आले                                                      सावळीविहीर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून लाभार्थींना उभे करत शोषलं  डिस्टन्स  पाळत या भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले यावेळी राहाता कु उ बा समितीचे संचालक बाळासाहेब जपे सरपंच रुपाली आगलावे शिवाजी आगलावे गणेश आगलावे शांताराम आगलावे ग्राम पंचायत सदस्य व  कार्यकर्ते उपस्तिथ  होते यावेळी लोकडाऊनच्या नियमाचे पालन करून भोजन पाकीट वाटण्यात आले आहे  नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७०० गरजवंतांना हि पाकिटे देण्यात आली या एका पाकिटामध्ये  लापशी व खिचडी होती यावेळी येथे चोख नियोजन  ठेवण्यात आले होते                                                                                         या योजनेमुळे गावातील गरजवंत व रस्त्या वरून येणाऱ्या जाणाऱ्या काही परप्रांतीय मजुरांनाही कार्यकर्त्यांनी हि अन्न  पाकिटे कार्यकर्त्यांनी स्वतः घेऊन मोफत वाटली हि योजना दररोज राज्यात लोवकडाऊ असे पर्यंत  सुरु राहणार आहे सर्वांनी अन्न पाकिटे  घेतांना सोशल डिस्टन्स पाळावे मास्क लावावे गर्दी करू नये असे आव्हान यावेळियावेळी करण्यात येत होते.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )साईबाबांच्याभूमीत चालत असलेले अवैद्य  व्यवसाय बंद  होत नाही येथे मोठा पोलीस फौज फाटा असतांना व लोकडाऊन मध्ये जिल्हा बंदी असतांना गांजा सापडला जातो अवैद्यरित्या दारू पकडली जाते हे सर्व इतकी कडक पहारा  असतांना शिर्डीत हा माल  येतेच कशे  असा प्रश्न निर्माण होत आहे  गांजा चरस अफिम दारू वेश्याव्यवसाय पाकिटमारी गुन्हेगारी  विरोधात अनेकदा शिर्डीतील सामाजिक संस्था समाजसेवक व ग्रामस्थानीं अनेकदा आंदोलने केली आहे अनेकदा उपोषणे झाली तरीही शिर्डीतील अवैद्य व्यवसाय सुरूच आहेत तेही लोकडाऊनच्या काळात त्यामुळे पाणी कुठं मुरतंय हे आजून गुलदस्त्यात आहे ह्या सर्व अवैद्य  वस्तूंची वाहतूक होतीच  कशी तसेस या अवैद्य धंद्यांची पोलीस पत्रकारपरिषदेत सांगतात कि अवैद्य धंदे चालू असलेतर  कळवा काळविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल मग अनेकदा कळविणाऱ्यांचे  नाव कसे बाहेर येतात  अवैद्य धंदे दारूधंद्यावाल्यांना छाप्या  अगोदर  कशी व कोण खबर देतो त्याची चोकशी घेणे गरजेचे आहे शिर्डी व परिसरात अवैध दारू गांजा वैश्यव्यवसाय लोकडाऊनकाळांत सर्व बंद असतांना चालतो तर मग पोलीस काय करीत आहेत पोलिसांनी ठरवले तर मंदिरा समोरून चप्पल सुद्धा चोरी जाऊ शकत नाही. असा सवाल शिर्डीकर करत असून सर्वात मोठं असणाऱ्या अहमदनगर जिल्यात आंतराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र शिर्डीत चालणाऱ्या या धंद्याबाबत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस आधीक्षक अखीलेशकुमार सिंग यांचीही जबाबदारी मोठी वाढली  आहे त्यांनीच आता शिर्डीतील व परिसरातील अवैध धंद्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे व गुप्त चौकशी करून  अवैध धंद्यांवर धाडी  टाकणे गरजेचे आहे अशी परिसरातुन मागणी होत  आहे.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा/  राजेंद्र गडकरी
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दारूबंदी केली होती ,मात्र लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू बंदी उठविण्यात आली, त्यामुळे राहता येथील प्रसाद वाईन्स  मध्ये मद्य घेणाऱ्यांसाठी मोठी गर्दी झाली, 400 ते 500 लोकांचा जमावला या वाईन्स मालकाने  आपल्या मालकीच्या साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये सर्वांची बसण्याची व्यवस्था केली, जमाव बंदी आदेश असतानाही या लॉन्स मध्ये हे लोक  एकत्रित बसली लॉकडाउनच्या काळात कोणतेही लॉन्स, मंगल कार्यालय उघडण्यास बंदी असताना या लॉन्सचा उपयोग वाईन शॉप साठी  करण्यात आला त्याच प्रमाणे या प्रसाद वाइन्स मालकाने व राहता नगरपालिकेची बॅरिकेट्स लावण्यासाठी  परवानगी ही घेण्यात आली नाही  बॅरिकेट्स रोडवर  लावणे चुकीचे असताना येथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते, त्याचप्रमाणे कोणतेही फलक सूचना न दिल्याने नियमाचे उलंघन केल्याने   बिंदास न्यूज  व जनमत मराठी न्यूजच्या बातमीत दाखवले. कर्तव्यदक्ष अधिकारी  तहसीलदार कुंदन हिरे व पोलिस उपविभागीय अधिकारी  सोमनाथ वाघचौरे यांनी लक्ष देऊन हे वाईन शॉप बंद केले व या प्रसाद वाईन्स मालकावर विविध गुन्हे दाखल केले आहेत, अधिक तपास पोलीस निरीक्षक  करत आहेत, या प्रसाद वाईनचे परवानाही रद्द करण्यात यावा, अशी मागणी  होत आहे ,या काळात जमावबंदी आदेश असतानाही लोक जमा करणे, लॉकडाउनचे नियम न पाळणे या सर्वांमुळे राहता शहर व परिसरात आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन  अश्या घटना परत घडू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे  ह्या पुढे अशे प्रकार कोणी करीत असेल व नियमाचे पालन करणार नसेल तर त्यावरही गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार कुंदन हिरे व  उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले त्यामुळे सर्वांनी नियमाचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )    लॉक डाऊन सुरु होऊन  ५० दिवस होत आहे  सर्वजण घरात बसून आहेत सर्व व्यवसाय बंद असून अंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीतही सर्व शांत शांत आहे शिर्डी व परिसरातील फुल शेती धोक्यात आली आहे अनेकांनी फुलबागा तोडल्या आहेत तर काही दररोज फुले सस्त्यावर बांधावर फेकून देत आहेत त्यामुळे शिर्डी व परिसरातील बागकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे शिर्डीत साईबाबांना मोठ मोठे पुष्पहार पुष्पगुच्छ मोठया श्रद्देने साईभक्त अर्पण करीत असतात पण सध्या साईबाबा मंदिर बंद आहे फुलांचा दररोज भरणारा बाजारही बंद आहे शिर्डी येथून राज्य व परराज्यात दररोज फुल्ल बसने जातात तेही बंद झाले आहेत त्यामुळे  मोठ्या प्रमाणात शिर्डी व परिसरातील फुलबाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत  फुलबागात गुलाब गलांडा गुलछडी झेंडू आदी येथे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असते सध्या बंद असल्याने आर्थिक उलाढाल पूर्णतः बंद झाले आहे त्या मुळे फुलबागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) शासनाने अटी व शर्ती टाकून परवानगी दिल्याने लॉक डाऊनचा तिसराताप्पा सुरु झाल्यानंतर परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात मोठ्या  संख्येने कुटुंबासह आपला कामाधंदा सोडून जात आहेत प्रशासनाने त्यांना जाण्यासाठी विविध ठिकाणाहून सरकारी बसेस व श्रमिक रेल्वे सोडल्या असल्यातरी या बस व रेल्वे मध्ये शोषलं डिस्टन्स पाळला जात असल्याने प्रवासी नेहमीपेक्षा कमी प्रमाणात  जात आहेत त्यामुळे अनेक लोकांची  इच्छा असूनही आहे त्या ठिकाणी नाईलाजास्तव राहावे लागत आहे अनेकांनी ग्रामपंचायतचे व नगरपंचायतचे  आरोग्य दाखले काढले आहेत परंतु आपल्या राज्यात जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत आवश्यक वस्तूची ने  आन करण्यार्या वाहनांमध्ये कोणी घेत नाहीत त्यामुळे अशे परप्रांतीय लोक  पायीच जातांना दिसत आहेत.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )लॉकडाऊनमुळे सर्वजन घरात असतांना व कडक उन्हामुळे हैराण झालेले असतांना राहता तालुक्यातील काही भागात   काल सायंकाळी अचानक पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा जरी मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे परिसरात अनेक वृक्ष पडली फांद्या पडल्या काही ठिकाणी छ परावरील पत्रे उडाली काहींचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे मात्र सुदैवाने  कुठेही जीवित हानी झाली  नाही मात्र बराच वेळ वीज गायप झाली होती व  काही गावात अंधारात रात्रभर लोकांना  राहावे लागले काही दिवस असाच गडगडाटासह वादळी पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे आधीच लॉक डाऊनमुळे  मोठे आर्थिक नुकसान झालेले असतांना या वादळी पावसाने आजून त्यात भर पडू नये अशीच प्रार्थाना या परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget