Latest Post

शिर्डी राजेंद्र गडकरी। - सध्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशभर विविध प्रयत्न केले जात आहेत, शासन विविध प्रकाराने कोरोणाला आळा बसावा म्हणून प्रयत्नशील आहे, जो तो आपापल्या परिने त्यासाठी प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत येथील मानवता फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या  वतीने कोरोना व्हायरसचा शिरकाव गावात होऊ नये म्हणून सावळीविहीर व परीसरातील असणाऱ्या  गावांमध्ये  सॅनिटायझशंन करण्यात येत आहे, मानवता फाउंडेशनच्या वतीने सावळीविहीर परीसरातील सावळीविहीर बुद्रुक ,सावळीविहिर खुर्द, निमगाव, निघोज ,रुई,कोहकी, शिंगवे  तसेच वाड्या-वस्त्यांवर आवश्यक असे निर्जंतुकीकरण फवारणी करून करण्यात येत आहे ,त्यासाठी आवश्यक असे सोडियम हायक्लोराईड  संबंधित गावांना देण्यात येत आहे, ही फवारणी झाल्यानंतर गावात निर्जंतुंकीकरण होण्यासाठी प्रयत्न होणार आहे , मानवता फाउंडेशन या समाजिक संघटने मार्फत काही दिवसांपूर्वीच साईबाबा संस्थान सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी, शिरडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच राहता तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा, यांना चांगल्या दर्जाचे मास्क दिले होते, आता या मानवता फाउंडेशन च्या वतीने सावळीविहीर परिसरातील गावात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे,हा उपक्रम राबविण्यासाठी राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता, या संकटसमयी अशा वेगवेगळ्या प्रकाराने मदत करून मानवता फाउंडेशन एक चांगले कार्य करत असल्याने या मानवता फाउंडेशनचे सावळीविहीर व परिसरातून अभिनंदन होत आहे, हा उपक्रम राबवण्यासाठी पं स, उपसभापती ओमेश जपे  , सा, वि ,बु।।चे सरपंच सौ,रूपाली आगलावे,सा वि खु।चे सरपंच सौ, सुजाता जमधडे, निघोज सरपंच गणेश कनगर, रूई सरपंच संदीप वाबळे ,शिंगवे सरपंच राहुल घाडगे ,निमगाव सरपंच सौ शिल्पा कातोरे यांच्याबरोबर सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक, उपसरपंच यांचे सहकार्य लाभले , हा उपक्रम राबवण्यासाठी मानवता फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नितीन बारहाते, उपाध्यक्ष श्री. विनय गिरी, सचिव श्री. मोसीन शेख, खजिनदार अशोक गाडेकर, सौ. छायाताई देशपांडे,   डॉ. प्रदीप केंद्रे, डॉ. अनंतकुमार भांगे, डॉ. वृषाली लोखंडे, API नयना आगलावे, सौ. निलोफर शेख, ऍड. राजेश कातोरे, डॉ. सुभाष खकाळे, डॉ. किरण भोईटे, मनोज हजारे, सचिन काळोखे, सचिन शिरोळे, बाबा डांगे, विशाल गोसावी, गिरीश क्षीरसागर, श्री. चंदू बोरसे, दिलीप भारुड, महेश चव्हाण, निलेश उगले, महेश आगलावे, योगेश जपे, श्री. संतोष तांबे, नितीन पठारे, वाल्मिक गाडेकर, संतोष तांबे आदींनी विशेष परिश्रम घेतले

मुंबई | प्रतिनिधी -नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार, कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु करणे गरजेचे आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलीच तर वरळी आणि गोरेगाव येथील प्रदर्शनांची मैदानांवर आपण रुग्णांची सोय करण्याचे कार्य करत आहोत. संकटावर मात करावयाची असून आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.ते आज राज्याला संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले राज्यातील नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळले तरच करोनावर मात करणे शक्य होणार आहे. राज्यात कुन्हीही उपाशी राहणार नाही यासाठी सरकार बांधील आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारसोबत वेळोवेळी बोलणे सुरु आहे.केंद्रीय पथकाने राज्यातील व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले. राज्यामध्ये टाटा, अंबानी, इस्सार यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींनी मदतीचा हात देत ठिकठिकाणी सामाजिक कार्य त्यांनी सुरु केले आहे.महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण रेल्वे सुटणार नाही, गर्दी करायची नाहीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. राज्यात कुठल्याही फळांच्या वाहतुकीवर बंधने नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.बाजारसमित्या सुरु असून शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व कामांमध्ये काहीही अडचण भासणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज एक लाखांपेक्षा अधिक थाळी गरिबांना दिल्या जात आहेत. दोन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले असल्याचे ते म्हणाले.

मुंबई : शहरात करोनाचा प्रभाव वाढत असून नुकताच पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान करोना विषाणू विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र, आता वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारीही करोनाच्या कचाट्यात येत असल्याचे समजत आहेत. दरम्यान, मुंबईत करोनामुळे एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे.राज्यात २३ मार्चपासून ते २२ मार्चपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण ६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, २२ एप्रिलला एकाच दिवसात तब्बल १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यातील ९६ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे.मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे,त्यांना दोन मुले व एक मुलगी पत्नी आहे आहे अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

मुंबई - कोरोनाची लक्षण असूनही चार पालिका रुग्णालयांनी दाखल करून घेण्यासाठी नकार दिलेला पोलिसाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. एका वरिष्ठ अधिका-यांनी त्याला दुजोरा दिला आहे. या पोलिसाला उपचारासाठी चार सरकारी रुग्णालयात फिरायला लागले. कोणीच त्यांना रु्ग्णालयात दाखल करून घेतले नाही, अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांना रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात केले होते.संबंधीत पोलिस हवालदार कुर्ला वाहतुक विभागात कार्यरत आहेत. त्यांना सोमवारी (ता.20) ताप आल्यामुळे त्यांनी स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले. पण फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. याबाबत त्यांनी मुलाला सांगितल्यानंतर त्यांचा मुलगा आजारी वडिलांना घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेला. तेथील डॉक्टरांनी या पोलिसाला जागा नसल्यामुळे तुम्ही नायर रुग्णालयात जा, असे सांगितले. त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही व बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले.त्यानंतर या आजारी पोलिसाचा मुलगा त्यांना वडिलांना घेऊन परळ येथील केईएम रुग्णालयात गेला. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. सगळीकडे हेळसांड झाल्यानंतर केईएम रुग्णालयात तरी वडिलांना दाखल करण्यात येईल, असे त्यांना वाटले. पण तेथेही डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही व जागा नसल्यामुळे तुम्ही कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले. सगळीकडून भरती करण्यास नकार देण्यात आल्यामुळे अखेर त्यांनी वरिष्ठांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या पोलिसाच्या वरिष्ठांनी केईएम रु्गणालय ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते अशा भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला व घडलेल्या सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला.अखेर भोईवाड्यातील पोलिसांनी विनंती केलयानंतर या पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या पोलिसाचा कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील तळणी येथील आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी 10: 30 वाजेच्यासुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना शोधण्यास यश आले. शुक्रवारी दुपारी या तरुणाने खदानीत साचलेल्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती.
    मयत पंजाब सुंदरसिंग ठाकूर शुक्रवारी दुपारच्या वेळी आपल्या भावासह दुचाकीवरुण एका मंदिराकडे जात असतांना रस्त्यातील खदानीजवळ दुचाकी उभी करुण पाण्यात उडी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. ग्रामीण पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह
शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण पाणी आधीक असल्याने यश न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले होते. शनिवारी सकाळी 9 वाजता अग्निशमनचे जवान मोहन मुंगसे, सुभाष दुधे, परेश दूधे, प्रसाद शिंदे, इरफान पठान, विक्रम भुईगळ, किरण पागोरे, तुषार तौर, दिनेश मूंगसे यांनी शोध मोहीम हाती घेतली व मृतदेह शोधून काढला.
    सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी ठान मांडून होते. सकाळी मृतदेह मिळून आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुण शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह शोधण्यास माजी सभापती अशोक गरुड, प्रभाकर ठोंबरे, पोलिस पाटील संतोष वाघ, प्रभाकर वाघ, काकासाहेब वाघ आदी गावकऱ्यांनी मदत केली.
तरुणाला केले होते होम क्वारंटाईन
        मयत तरुण औरंगाबाद येथे रिक्षा चालवत होता. लॉकडाऊन सुरु असल्याने आठ दिवसापूर्वी तो गावाकडे (तळणी) येथे आला होता. यामुळे आरोग्य तपासणी करुण त्याला होम क्वारंटाईन केले होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणावर दुपारी 2 वाजेच्यासुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


।।। रोजाःतराविहःऐक आलौकीक पुण्य ।।।
अल्लाहाच्या अद्वितीय पर्वाची सुरूवात  शाबान महिनाच्या 30 तारीखेला चंद्रदर्शना नंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या नंतर आपआपल्या मनातील ईच्छा आल्लाहा जवळ मांगुन ,त्या दिवशी जेवढ पुण्य असेल ते सर्व पदरात पाडून, बांधव ज्या ऐका विशिष्ट आशी पवित्र रमजानुल मुबारक चीच खास वैशिष्ट्य पुर्ण ""तराविह नमाज" ची तैयारी करण्याची असते .आपल्या रोजच्या आयुष्यातील ५पाच वेळची जे आल्लाहाने केलेल्या आनिवार्य केलेल्या१),फजर२)जोहर३)असर४)मगरीब५)ईशा या, व्यतिरिक्त फक्त पवित्र रमजानुल मुबारक च्याच महिन्यातील खास वैशिष्ट्य पुर्ण नमाज ""तराविह"'
रात्रीच्या ईशाह नमाजनंतरच तराविह नमाज ला सुरुवात होते ,बांधव आपल्या वडील- धाऱ्यासह,मुलांना, घेऊन सहभागी होतात,
खास वैशिष्ट्य म्हणजे या नमाज मधे संपूर्ण पवित्र "कुरआन शरिफ " चे पढण होतात.पवित्र कुरआन शरिफ आल्लाहाने आपल्याला धरतीवर स्वर्गातूनआपल्या खास दूता मार्फत दररोज हजरत प्रेषित मुहम्मद (स्व.)ला विशेष करून रमजानुल मुबारक च्या महिन्यातच आवतरित केले ,जगाला ऐकमेवद्धैताय,आलौकीक,आदभुत आशी ऐक पवित्र देणगी, भेटच दिली ,पाठवली.
पवित्र कुरआनशरिफ हे ३०तिस पारे(आध्याय) आसतात,६६६६(सहाहाजार सहाशे सहाशष्ट) आयाती.११४ सुरहाअसतात, अशा अदुतिय पवित्र कुराण शरिफचे पठण तराविह नमाजमध्ये ऐक खास व्यक्ती असते त्यांना संपूर्ण कुराण शरिफ तोंडपाठ(मुखद) असते ते व्याकरणासह,आलंकारासह, विशेष म्हणजे सात(७)विविध प्रकारे सुंदर,  ,मंजुळ स्वरांच्या, आवाजात पठन करतात, त्यांना आम्ही " हाफिज-ऐ-कुरआन'" व "कारी-ऐ-कुरआन"" म्हणतात
तराविह नमाजमध्ये २-२-२-२-२चे विभागात आशा प्रकारे २० विस रकात पुर्णपणे करतात ,रोज १-१/२ऐक ते दिड आध्याय पारा घेऊन २६व्या रोजाच्या तराविह नमाजमध्ये ३० पारे पुर्ण (खत्मुल कुरआन) करून आशा आदुतिय पर्वाची सुरुवात होवुन सांगताही  आलौकीक पद्धतीने होत असते,
जगातील सर्व बांधव या आदभुत आशा पर्वणीची वर्षभर आतुरतेनेवाट बघत असतात,कारण वर्षातील ऐक महिना आपल्याला आलेली मरगळ, आळस, आलेले दुर्गुण, आलेल्या मानसिक व शारीरिक त्रासदायक घटना,सुस्तावलेले शरीर निरोगी राहिले पाहिजे म्हणून,झालेला सहन शिलतेचा अंत, धासळलेला आत्मविश्वास ,पोखरलेले मन ,या सर्वांना ऐक नियोजन बध्य ,नैसर्गिक व साचेबद्ध लयबद्ध आध्यात्मिक रिफ्रेश शर कार्यक्रम कोर्स पवित्र रमजानुल मुबारक असते तर बांधवांनी हि संधीआहे या संधी चा फायदा होईल तेवढा करून ,जेवढे पुण्य प्राप्त करता येईल तेवढे थोडेच आहे,,
परंतु या वर्षी संपूर्ण भारतात जगामध्ये CORONA_covid_19 सारख्या महाभयंकर महामारीने धुमाकूळ घातला आहे, तर Corona virus चा आजाराची लागण ,संसर्ग पसरवु नयेत म्हणून ,,
महाराष्ट्र व भारत सरकार ने ,WHO या जागतिक आरोग्य संघटनेचे आदेशानुसार सर्व बांधवांनी आपल्याला आपल्या घरात बसून राहुन घरात च ,
रोजा,नमाज,तराविह नमाज , रोजची नमाज घरामध्ये च आदा करून ,नमाज चे पुण्य ,सबाब, कमावायचेआहेत ,हे सर्वंचेआरोग्य चांगले राहण्यासाठी फायदा आपल्या च आहेत.तर मग अपण सर्व प्रकारे सरकार ला साथ देऊन,सरकारी आदेश पाळु या ,
stay Home,
stay Healthy,
You are Healthy ,
Nation Healthy ,.
लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख,बैतुशशिफा. दवाखाना ,श्रीरामपुर,
9271640014

 शिर्डी जितेश लोकचंदानी
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे गावात फळे भाजीपाला ची दुकाने आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार अशी लावण्यात यावी, असा शासकीय आदेश असताना या आदेशाला पहिल्याच दिवशी फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवली, आज शनिवार असताना व कायद्याने, नियमाने बंधन असताना अनेक फळे, भाजीपाला विक्रेते हे नगर मनमाड रोडच्या दुतर्फा मोठ्या संख्येने बसलेले होते, हे लॉक डाऊन च्या नियमाच्या विरोधात तसेच शासकीय आदेशाच्या विरोधात असूनही या विक्रेत्यांवर काय कारवाई झाली। असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे,
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे, या काळात गर्दी होऊ नये, कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये ,म्हणून मोठी दक्षता घेतली जात आहे, त्यासाठी कालच राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कामगार तलाठी गायके व ग्रामसेवक खरडे यांनी शासकीय आदेश काढून सावळीविहीर येथे हे फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार दुकाने मांडावीत ,अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश काढला ,सर्वांना सूचनाही देण्यातआल्या ,वृत्तपत्रात बातम्याही आल्या मात्र तरीही आज या आदेशाच्या केराची टोपली दाखवत अनेक फळ व भाजीपाला विक्री ते मोठ्या संख्येने नगर मनमाड रोडच्या कडेला सावळीविहीर गावात बसलेले होते ,फळे व भाजीपाला विक्री मुळे व घेणाऱ्या ग्राहकां मुळे येथे गर्दी दिसत होती, शासकीय आदेशाला व लॉकडाऊनच्या नियमाला या गोष्टीमुळे हरताळ फासला गेला, यावर आता काय कारवाई होणार। याकडे सर्व नागरिकांचे लक्ष आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget