शिर्डी जितेश लोकचंदानी
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे गावात फळे भाजीपाला ची दुकाने आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार अशी लावण्यात यावी, असा शासकीय आदेश असताना या आदेशाला पहिल्याच दिवशी फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवली, आज शनिवार असताना व कायद्याने, नियमाने बंधन असताना अनेक फळे, भाजीपाला विक्रेते हे नगर मनमाड रोडच्या दुतर्फा मोठ्या संख्येने बसलेले होते, हे लॉक डाऊन च्या नियमाच्या विरोधात तसेच शासकीय आदेशाच्या विरोधात असूनही या विक्रेत्यांवर काय कारवाई झाली। असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे,
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे, या काळात गर्दी होऊ नये, कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये ,म्हणून मोठी दक्षता घेतली जात आहे, त्यासाठी कालच राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कामगार तलाठी गायके व ग्रामसेवक खरडे यांनी शासकीय आदेश काढून सावळीविहीर येथे हे फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार दुकाने मांडावीत ,अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश काढला ,सर्वांना सूचनाही देण्यातआल्या ,वृत्तपत्रात बातम्याही आल्या मात्र तरीही आज या आदेशाच्या केराची टोपली दाखवत अनेक फळ व भाजीपाला विक्री ते मोठ्या संख्येने नगर मनमाड रोडच्या कडेला सावळीविहीर गावात बसलेले होते ,फळे व भाजीपाला विक्री मुळे व घेणाऱ्या ग्राहकां मुळे येथे गर्दी दिसत होती, शासकीय आदेशाला व लॉकडाऊनच्या नियमाला या गोष्टीमुळे हरताळ फासला गेला, यावर आता काय कारवाई होणार। याकडे सर्व नागरिकांचे लक्ष आहे.
Post a Comment