मुंबई : शहरात करोनाचा प्रभाव वाढत असून नुकताच पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान करोना विषाणू विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र, आता वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारीही करोनाच्या कचाट्यात येत असल्याचे समजत आहेत. दरम्यान, मुंबईत करोनामुळे एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे.राज्यात २३ मार्चपासून ते २२ मार्चपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण ६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, २२ एप्रिलला एकाच दिवसात तब्बल १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यातील ९६ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे.मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे,त्यांना दोन मुले व एक मुलगी पत्नी आहे आहे अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment