मुंबई | प्रतिनिधी -नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार, कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु करणे गरजेचे आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलीच तर वरळी आणि गोरेगाव येथील प्रदर्शनांची मैदानांवर आपण रुग्णांची सोय करण्याचे कार्य करत आहोत. संकटावर मात करावयाची असून आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.ते आज राज्याला संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले राज्यातील नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळले तरच करोनावर मात करणे शक्य होणार आहे. राज्यात कुन्हीही उपाशी राहणार नाही यासाठी सरकार बांधील आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारसोबत वेळोवेळी बोलणे सुरु आहे.केंद्रीय पथकाने राज्यातील व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले. राज्यामध्ये टाटा, अंबानी, इस्सार यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींनी मदतीचा हात देत ठिकठिकाणी सामाजिक कार्य त्यांनी सुरु केले आहे.महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण रेल्वे सुटणार नाही, गर्दी करायची नाहीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. राज्यात कुठल्याही फळांच्या वाहतुकीवर बंधने नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.बाजारसमित्या सुरु असून शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व कामांमध्ये काहीही अडचण भासणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज एक लाखांपेक्षा अधिक थाळी गरिबांना दिल्या जात आहेत. दोन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment