शिर्डी राजेंद्र गडकरी। - सध्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशभर विविध प्रयत्न केले जात आहेत, शासन विविध प्रकाराने कोरोणाला आळा बसावा म्हणून प्रयत्नशील आहे, जो तो आपापल्या परिने त्यासाठी प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत येथील मानवता फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने कोरोना व्हायरसचा शिरकाव गावात होऊ नये म्हणून सावळीविहीर व परीसरातील असणाऱ्या गावांमध्ये सॅनिटायझशंन करण्यात येत आहे, मानवता फाउंडेशनच्या वतीने सावळीविहीर परीसरातील सावळीविहीर बुद्रुक ,सावळीविहिर खुर्द, निमगाव, निघोज ,रुई,कोहकी, शिंगवे तसेच वाड्या-वस्त्यांवर आवश्यक असे निर्जंतुकीकरण फवारणी करून करण्यात येत आहे ,त्यासाठी आवश्यक असे सोडियम हायक्लोराईड संबंधित गावांना देण्यात येत आहे, ही फवारणी झाल्यानंतर गावात निर्जंतुंकीकरण होण्यासाठी प्रयत्न होणार आहे , मानवता फाउंडेशन या समाजिक संघटने मार्फत काही दिवसांपूर्वीच साईबाबा संस्थान सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी, शिरडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच राहता तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा, यांना चांगल्या दर्जाचे मास्क दिले होते, आता या मानवता फाउंडेशन च्या वतीने सावळीविहीर परिसरातील गावात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे,हा उपक्रम राबविण्यासाठी राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता, या संकटसमयी अशा वेगवेगळ्या प्रकाराने मदत करून मानवता फाउंडेशन एक चांगले कार्य करत असल्याने या मानवता फाउंडेशनचे सावळीविहीर व परिसरातून अभिनंदन होत आहे, हा उपक्रम राबवण्यासाठी पं स, उपसभापती ओमेश जपे , सा, वि ,बु।।चे सरपंच सौ,रूपाली आगलावे,सा वि खु।चे सरपंच सौ, सुजाता जमधडे, निघोज सरपंच गणेश कनगर, रूई सरपंच संदीप वाबळे ,शिंगवे सरपंच राहुल घाडगे ,निमगाव सरपंच सौ शिल्पा कातोरे यांच्याबरोबर सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक, उपसरपंच यांचे सहकार्य लाभले , हा उपक्रम राबवण्यासाठी मानवता फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नितीन बारहाते, उपाध्यक्ष श्री. विनय गिरी, सचिव श्री. मोसीन शेख, खजिनदार अशोक गाडेकर, सौ. छायाताई देशपांडे, डॉ. प्रदीप केंद्रे, डॉ. अनंतकुमार भांगे, डॉ. वृषाली लोखंडे, API नयना आगलावे, सौ. निलोफर शेख, ऍड. राजेश कातोरे, डॉ. सुभाष खकाळे, डॉ. किरण भोईटे, मनोज हजारे, सचिन काळोखे, सचिन शिरोळे, बाबा डांगे, विशाल गोसावी, गिरीश क्षीरसागर, श्री. चंदू बोरसे, दिलीप भारुड, महेश चव्हाण, निलेश उगले, महेश आगलावे, योगेश जपे, श्री. संतोष तांबे, नितीन पठारे, वाल्मिक गाडेकर, संतोष तांबे आदींनी विशेष परिश्रम घेतले
Post a Comment