तालुक्यातील तळणी येथील आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी 10: 30 वाजेच्यासुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना शोधण्यास यश आले. शुक्रवारी दुपारी या तरुणाने खदानीत साचलेल्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती.
मयत पंजाब सुंदरसिंग ठाकूर शुक्रवारी दुपारच्या वेळी आपल्या भावासह दुचाकीवरुण एका मंदिराकडे जात असतांना रस्त्यातील खदानीजवळ दुचाकी उभी करुण पाण्यात उडी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. ग्रामीण पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह
शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण पाणी आधीक असल्याने यश न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले होते. शनिवारी सकाळी 9 वाजता अग्निशमनचे जवान मोहन मुंगसे, सुभाष दुधे, परेश दूधे, प्रसाद शिंदे, इरफान पठान, विक्रम भुईगळ, किरण पागोरे, तुषार तौर, दिनेश मूंगसे यांनी शोध मोहीम हाती घेतली व मृतदेह शोधून काढला.
सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी ठान मांडून होते. सकाळी मृतदेह मिळून आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुण शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह शोधण्यास माजी सभापती अशोक गरुड, प्रभाकर ठोंबरे, पोलिस पाटील संतोष वाघ, प्रभाकर वाघ, काकासाहेब वाघ आदी गावकऱ्यांनी मदत केली.
तरुणाला केले होते होम क्वारंटाईन
मयत तरुण औरंगाबाद येथे रिक्षा चालवत होता. लॉकडाऊन सुरु असल्याने आठ दिवसापूर्वी तो गावाकडे (तळणी) येथे आला होता. यामुळे आरोग्य तपासणी करुण त्याला होम क्वारंटाईन केले होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणावर दुपारी 2 वाजेच्यासुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Post a Comment