Latest Post

 शिर्डी -नेहमी रात्रंदिवस देश-विदेशातील साई भक्तांनी गजबजलेली श्री साईंची शिर्डी सध्या लॉक डाउनमुळे ठप्प असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने,  ट्रॅव्हल्स, बसेस बंद असून देशातील मंदिराप्रमाणे श्री साईबाबा समाधी मंदिरही सन 1940 नंतर या परिस्थितीत 17 मार्चपासून दु,३ नंतर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे, शिर्डीत प्रथम च इतका सन्नाटा दिसत असून रस्ते ओस पडले आहेत, शिर्डीत राज्यव परराज्यातून येणाऱ्या एसटी बसेस ,
राज्यातून, देशातून येणाऱ्या रेल्वे,  तसेच विमाने ही बंद आहेत, त्यामुळे शिर्डी बस स्टँड, साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक व श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळही सुने सुने दिसत आहे शिर्डी शहरातून जाणारा  नगर मनमाड महामार्ग  सुद्धा ओस पडला आहे, श्री साईबाबा संस्थानने आपले प्रसादालय व भक्त निवासे  ही बंद केले आहेत ,परंतु येथील आरोग्य पोलीस कर्मचारी व रुग्णालयातील नातेवाईक , गरजूंना नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था साई संस्थांनी केली आहे,  सर्वत्र लॉक डाऊन मुळे  शुकशुकाट असताना शिर्डी बस स्थानकावर मात्र  येणारे जाणारे लोक  दिसत आहे,  शिर्डी परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यांवर सकाळ, संध्याकाळ दुध डेअरी यांवर शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची थोडीफार गर्दी दिसून येत आहे,
किराणा दुकानात काहीतरी खरेदीसाठी बहाना करत लोकबाहेर येत असून अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क किंवा सोशल डिस्टंस, दक्षता घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे, शहरात लॉक डाउन पाळला जात असला तरी शिर्डी परिसरातील काही गावे खेडे वाड्या वस्त्या यावर या लॉक डाऊन चा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, लोक दिवसभर घरात असले तरी सायंकाळी काही लोक दूध घालण्याच्या किराणा घेण्याच्या बहाण्याने  बाहेर दिसतात, पोलिसही सकाळी आपल्या पोलिस वाहनांमधून मधून स्पीकर लावून गर्दी करू नका, मास्क लावा म्हणून सांगतात, सकाळी एकदा फेरी मारल्यानंतर  परत त्यांचाही चक्कर होत नाही, ग्रामीण भागात सर्वत्र हीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे, ग्रामीण भागात सध्या गहू ,मका ज्वारी काढण्यासाठी आल्याने व मजूर मिळत नसल्याने ग्रामीण भागातले शेतकरी हार्वेस्टर, मशीनद्वारे किंवा घरातील कुटुंबातील सदस्यांना घेऊन शेतात जाऊन काम करत आहे, पिके सोंगत आहेत, काही शेतकरी शेतातून काढलेले कांदे गोण्यांमध्ये भरण्याचे काम करत आहे, तर कोणी द्राक्षे काढण्याचे काम करताना दिसून येत आहे, अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसत असून लॉक डाऊन शहरात आहे तसाच तो ग्रामीण भागातही असला तरी शेतीत काम करणारे हे आपल्या कामात मग्न आहेत, वाड्या-वस्त्यांवर शेतीत दुर दुर असणारे मळ्यामध्ये लॉक डॉऊनचा प्रभाव फारसा दिसून येत नाही, दूध धंदा व दूध डेअरी सध्या जरी चालू असल्या तरी भविष्यात ग्रामीण भागातले दूध शहरांमध्ये जाणे खूपच कमी झाले असल्याने ग्रामीण भागातील दूध डेअरी ह्या लवकरच बंद करण्याची वेळ येणार असल्याचे दूध डेअरी चे मालक बोलत आहेत, दूध वाहतूक करणारे ट्रक चालक व इतर कर्मचारी ही शहरात जाण्यात उत्सुक नसल्याने  दूध आता ग्रामीण भागातून शहरापर्यंत पोहोचले जाणे मुश्कील होत आहे ,त्यामुळे भविष्यात काही दिवसातच ग्रामीण भागातील दूध गावातच राहण्याची शक्यता आहे ,त्यामुळे शासनाने दूध उत्पादक का नाही ही यापुढे मदत करावी अशी मागणी होत आहे.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :- कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कासारे  येथे रविवार दिनांक 29 मार्च रोजी संपन्न होणारा श्री कालिका मातेचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती कासारे येथील कालिका देवी मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात आली.

कालिका देवी मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशास बांधील राहून हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे दरवर्षी या यात्रोत्सवास महाराष्ट्रभरातून कासार समाज बांधव मोठ्या संख्येने कासारे  येथे येऊन कालिका मातेच्या यात्रा उत्सवात सहभागी होतात व श्री कालिका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात परंतु ह्या वर्षी कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला.

तसेच राहता तालुका कासार समाज संघटनेच्या वतीने घेण्यात येणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आले आहे हा निर्णय बैठकीत घेण्यात आला या बैठकीस सुधीर डंबीर,नंदकुमार कोळपकर, नरेंद्र डंबीर ,संजय डंबीर, आबासाहेब आंभोरे ,संतोष कोळपकर, प्राध्यापक चंद्रकांत खांड्गौरे ,शशिकांत कडुसकर, दत्तात्रय कोळपकर ,रामभाऊ रासने ,अशोक कोळपकर ,दास कुंभकर्ण, कालिदास डंबाळे आदी उपस्थित होते.

शिर्डी ।।राजकुमार गडकरी ।।शिर्डीतील सांडपाणी हे सर्रासपणे शेतीसाठी वापरले जात असून अनेकजन हे पाणी ड्रेनेज मधून थेट पाइपलाइन करून मोटर पंपाच्या साह्याने आपल्या शेतातील पिकांना देत असल्यामुळे या शेतीच्या आसपास व रस्त्याने जाणाऱ्यां येणारांना मोठ्या दुर्गंधी ला तोंड द्यावे लागत असून आरोग्यास ते धोकादायक ठरत आहे, त्याचप्रमाणे शेतीतील पिकेही या खराब पाण्यामुळे खाण्यास हानिकारक ठरत असल्याने याचा विचार करून तसेच या उघड्या ड्रेनेजमध्ये आत्तापर्यंत चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतीने हे उघडे ड्रेनेज बंद करावेत तसेच हे सांडपाणी
 उघड्यावर पिकांना देऊन दुर्गंधी करणाऱ्यांना प्रतिबंध करावा अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे,
          शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून शिर्डीला देशातील स्वच्छ सुंदर शिर्डीचा विशेष पुरस्कारही यापूर्वी मिळालेला आहे ,शिर्डीत श्री साई संस्थान व शिर्डी नगरपंचायत स्वच्छतेबाबत अतिशय जागरूक आहे, असे असतानाही शिर्डीत मात्र जे शहराचे सांडपाणी अंडरग्राउंड नाल्यांमधून शहराबाहेर सोडले जाते मात्र या अंडरग्राउंड नाल्या अनेक ठिकाणी  उघड्या असल्याने आसपासचे शेतकरी पाइपलाइन करून मोटार पंपाच्या साह्याने हे सांडपाणी उपसून आपल्या शेतीसाठी वापरतात, हे सांडपाणी दुर्गंधीयुक्त असते ,ते शेतीत वापरल्यानंतर आसपास रहिवाशांना व या शेतीच्या आसपास असणाऱ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधीचा मोठा त्रास होतो, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही  या दुर्गंधीचा मोठा त्रास होतो,  हे आरोग्यास अपायकारक आहे ,हे सांडपाणी दूषित असते, ते शेतातील पिकांना दिल्यामुळे ही पिकेही खराब होतात, ते खाण्यास हानिकारक असतात, परंतु याचा कोणी विचार करत नाही ,शिवाय ज्या उघड्या ड्रेनेज मधून  हे सांडपाणी पाईप लाईनने मोटरपंप च्या साह्याने घेतले जाते, अशा उघड्या ड्रेनेज मध्ये आत्तापर्यंत शिर्डीतील चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे सर्व माहीत असतानाही अजूनही अशा उघड्या ड्रेनेज मधून मोटार पंप च्या साह्याने थेट पाइपलाइन करून आपल्या शेतात हे सांडपाणी घेतले जाते, मात्र याचा भविष्यात मोठा आरोग्यास धोका आहे, हे जाणून आपापल्यापरीने शेतकऱ्यांनी हे सांडपाणी घेणे बंद करावे, तसेच शिर्डी नगर पंचायतीने तरी त्याची दखल घेऊन उघडे ड्रेनेज बंद करावेत व सांडपाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना मनाई करावी आणि या सांडपाण्यामुळे परिसरात होणारी   रोगराई, डासांचा प्रादुर्भाव व दुर्गंधी टाळावी, अशी मागणी शिर्डी करानी केली आहे.

। प्रतिनिधी ।। सावळीविहीर ग्रामपंचायतीच्या  वतीने कोरोना व्हायरसचा व इतर साथींचे रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे  औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे,
   । सध्या सर्वत्र कोरोना या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनआहे, सर्व दुकाने ,कामकाज ठप्प आहे, लोक घरात आहेत, मात्र घरात डासांच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत, त्यामुळे येथील ग्रामपंचायती तर्फे गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे,  सावळीविहीर बुद्रुक येथे  सध्याचे ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस यामुळे  डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन 
साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव  वाढला आहे , डासांमुळे मलेरिया थंडी ताप अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली , साथींचे आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे येथे जंतनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती  सावळीविहीर ग्रामपंचायतने  ताबडतोब या मागणीची दखल घेऊन सावळीविहीर गावात जंतनाशक फवारणी सुरू केली,  गावातील गल्ली ,रस्त्यावर  ट्रॅक्‍टरच्या साह्याने फवारणी करण्यात येत होती, हि जंतुनाशक फवारणी गावात सर्वत्र व गल्या मध्ये करावी, वाड्या-वस्त्यांवर ही करावी ,असे नागरिक बोलत होते, यावेळी सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच  रूपालीआगलावे, उपसरपंच वृषाली  जपे, तसेच बाळासाहेब जपे ,संतोष आगलावे, चंद्रकांत जपे, विनोद भोसले, ग्रामसेवक खर्डे सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे,सागर पगारे, पारडे, बाप्पु जपे, गणेश कापसे, अनिल वाघमारे  राहुल गोपीनाथ आगलावे व सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी बबन आरणे, नाना पवार,अनिल त्रिभुवन यांनी स्वतः उभे राहून गावात ही फवारणी केली, जंतनाशक फवारणीमुळे येथील साथीच्या रोगाला आळा बसेल, त्यामुळे येथे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी येथील आरोग्य केंद्रानेही नियोजन व उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही मत येथे नागरिक व्यक्त करत आहेत, 

निवासी संपादक जीतेश लोकचंदानी  मुंबई प्रमाण शिर्डीत नगर पंचायतने हि केली फवारणी सुरू  शिर्डी नगर पंचायतच्या वतिने प्रमुख रस्त्यावर काल पासूण फवारणी सुरू केली आहे नगर पंचायत च्या अग्निशामक प्रमुख विलास लासूरे यांनि आमच्या प्रतिनिधि ला दिलेल्या माहिति नुसार शिर्डीत मुख्य  रस्त्यावर रिंग रोड,नाण्दुर्खी रोड,कणकुरी रोड,झूलेलाल मंदिर रोड, पालखी रोड,पिंपलवाडी रोड, मनोज कुमार रोड,भाग्यलक्ष्मी रोड, रूई रोड,गोराडिया रोड,गणपति प्यालेस रोड,सन अण्ड सन रोड, झुना पिंपलवाडी रोड,एच पी गैैैस एजंसि ,
कालिका नगर रोड, छ संभाजी नगर रोड,लूटे वस्ति रोड,एस डी पी रोड, पानमडा रोड,पासुण शिर्डीच्या शिवा पर्यंत फवारणी करण्याचे नगर पंचायतचे विलास लासूरे यांनि सागीतले हि मोहीम काल पासुन चालू केली आहे व येत्या दोन ते तीन दीवसात सर्वत्र फवारणी करनार असुन् शिर्डीच्या उपनगरा  मध्ये हि अश्याच प्रकारे फवारणी करनार असल्याचे विलास लासूरे यांनि सांगीतले ह्या फवारणी मोहीमेत नगर पंचायतचे कर्मचारी शौकत शेख,अशोक गांगुर्डे,दगु खरात व राजू थोराट हे परिश्रम घेत आहेत

बेलापूर  (देविदास  देसाई  )-हिंगोलीहुन रोजी- रोटीच्या शोधार्थ निघालेल्या तीन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन माणुसकीच्या भावनेतुन बेलापूरकरांनी या कुटुंबाना आधार दिला आहे  त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या मुक्कामाची व जेवाणाची व्यवस्था करण्यात आली  आहे               हिंगोली जिल्ह्यातुन पोट भरण्यासाठी तीन कुटुंब दर वर्षी  प्रमाणे याही वर्षी अहमदनगर येथे आली होती केवळ एकच दिवस शेतकर्याकडे रोंजंदारीवर काम मिळाले त्यांनंतर कोरोनाचे थैमान सुरु झाले अन यांच्या पोटापाण्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला काम असुनही बाहेर जिल्ह्यातील म्हणून शेतकरी काम देईना   रोजगाराच्या शोधार्थ  मारुती झाडबा ईंगळे पत्नी दिक्षा मारुती ईंगळे  , कळनु नारायण झरे पत्नी निर्मला झरे , विलास शालीग्राम कोसेकर त्याची साठ वर्षाची आई शिवकन्या कोसेकर रविंद्र सखाराम चौगुले पत्नी  सुनिता तीन लहान मुली एक लहान मुलगा हे दहा जण   अहमदनगर  ते बेलापूर  असा साठ पासष्ठ किलोमीटर पायी चालुन बेलापूरला पोहोचले गावात ही वार्ता समजताच आपत्ती व्यवस्थापन समीतीने त्यांची आस्थेने चौकशी करुन त्यांना नविन मराठी शाळेत राहण्याची व्यवस्था केली बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी देखभाल करण्याची तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घेतली  गौरव सिकची दिपक खंडागळे  लक्ष्मीकांत लखोटीया यशवंत नाईक  यांनी किराणा सामान आणुन दिले जनसेवा झुणका भाकर केंद्राच्या वतीने सुवालाल लुक्कड अमीत लुक्कड प्रविण लुक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली प्राथमिक आरोग्याधिकारी देविदास चोखर यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली वातावरण ठिक होईपर्यंत  याच ठिकाणी  रहाण्याचा सल्ला बेलापूर ग्रामस्थांनी दिला असुन ग्रामस्थ या कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्था करणार आहे बेलापूरचे ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पोलीस पाटील अशोक प्रधान प्रकाश जाजु किरण भांड महावितरणचे चेतन जाधव आदिनी त्या सर्व कुटुंबाला धीर देवुन सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.

शिर्डी  श्री साईबाबा संस्थाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या संकटात सापडलेल्या या राष्ट्रीय आपत्तीत मदत म्हणून ५१ कोटी रुपये  देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे शिर्डीकर व साईभक्तांना मधून स्वागत होत आहे,
     सध्या जगाला, भारत देशालाही कोरोनाच्या संकटामुळे हैराण करून सोडले आहे, दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण झपाट्याने देशात वाढत असून राज्यात ही संख्या सर्वात मोठी आहे, केंद्र सरकारा प्रमाणेच राज्य सरकारही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठा प्रयत्न करीत असून शासनाने अनेक प्रतिबंधात्मक योजनाही आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे,
  देशात कोरोनाच संसर्ग वाढू नये म्हणून देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे देशात, राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे, देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत , त्यामुळे राज्यात सरकारने अनेक धाडसी पावले उचलली आहेत, अशा परिस्थितीत राज्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे अशा राष्ट्रीय किंवा नैसर्गिक आपत्तीत श्री साईबाबा संस्थान नेहमीच मदतीसाठी पुढे आले आहे ,,सध्या देशात ,राज्यात  कोरोना विषाणूमुळे संकट उभे राहिले आहे, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाला मदत म्हणून श्री साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे ,शिर्डीला श्री साई भक्त देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात येत असतात व साईबाबा संस्थानला देणगी देत असतात, या देणगीतूनच साई संस्थानने 51 कोटी रुपये कोरोना मुकाबल्यासाठी देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे, तसेच या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी अहोरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रयत्न करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, तसे पोलीस ,अत्यावश्यक सेवा वाहतूक करणारे ट्रक चालक, गरजू अशा विविध लोकांसाठी साईबाबा संस्थान नाश्ता ,भोजन सुद्धा पुरवणार आहे ,असा हा निर्णय साई संस्थान ने घेतल्यामुळे या  निर्णयाचे साईभक्त व शिर्डी करांमधून मोठे कौतुक होत आहे ,
   सध्या शिर्डीच्या श्री साई संस्थान वर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त गीता बनकर, अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त दिलीप स्वामी,  व श्री साई संस्थान चे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची एक कमिटी आहे ,या कमिटीने हा निर्णय घेतला असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थित होते, श्री साईबाबा संस्थान नेहमी राष्ट्रीय आपत्ती च्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असते ,यावेळी पुढे येऊन साई संस्थानने या कोरोना मुकाबल्यासाठी 51 कोटी रुपये दिल्याबद्दल  श्री साईबाबा संस्थान चे व  संस्थांच्या या कमिटीचे शिर्डीकर व साई भक्तां तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे,
          ।।चौकट।।
    कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान प्रमाणेच श्री तिरुपती देवस्थानं 200 कोटी रुपये ,माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने 7 कोटी रूपये, श्री महावीर हनुमान मंदिर पटना तर्फे एक कोटी रुपये, तसेच देशातील विविध देवस्थानच्या वतीने ही  मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे ,त्याच प्रमाणे अभिनेते अक्षय कुमार यांनी अठरा कोटी ,अजय देवगन यांनी 15 कोटी ,त्याच प्रमाणे उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 200 कोटी ,आनंद महिंद्रा यांनी तीनशे कोटी, मुकेश अंबानी यांनी 1000 कोटी रुपये मदत म्हणून या राष्ट्रीय आपत्तीत देण्याचे जाहीर केले आहे ,विविध संस्था,नेते, अभिनेते, उद्योगपती हे आर्थिक व इतर वेगवेगळ्या प्रकारांनी मदतीसाठी आता पुढे येत आहे, अशा बिकट समयी अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, विविध खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, आपला एक दिवसाचा पगार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत म्हणून देण्याची गरज असल्याचे व प्रत्येक नागरिकांनी आपणास याप्रसंगी काय मदत करता येईल त्याप्रमाणे ती करावी ,गर्दी टाळावी ,असही मत साई भक्त व जिल्हा वासिया मधून व्यक्त होत आहे,

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget