Latest Post

निवासी संपादक जीतेश लोकचंदानी  मुंबई प्रमाण शिर्डीत नगर पंचायतने हि केली फवारणी सुरू  शिर्डी नगर पंचायतच्या वतिने प्रमुख रस्त्यावर काल पासूण फवारणी सुरू केली आहे नगर पंचायत च्या अग्निशामक प्रमुख विलास लासूरे यांनि आमच्या प्रतिनिधि ला दिलेल्या माहिति नुसार शिर्डीत मुख्य  रस्त्यावर रिंग रोड,नाण्दुर्खी रोड,कणकुरी रोड,झूलेलाल मंदिर रोड, पालखी रोड,पिंपलवाडी रोड, मनोज कुमार रोड,भाग्यलक्ष्मी रोड, रूई रोड,गोराडिया रोड,गणपति प्यालेस रोड,सन अण्ड सन रोड, झुना पिंपलवाडी रोड,एच पी गैैैस एजंसि ,
कालिका नगर रोड, छ संभाजी नगर रोड,लूटे वस्ति रोड,एस डी पी रोड, पानमडा रोड,पासुण शिर्डीच्या शिवा पर्यंत फवारणी करण्याचे नगर पंचायतचे विलास लासूरे यांनि सागीतले हि मोहीम काल पासुन चालू केली आहे व येत्या दोन ते तीन दीवसात सर्वत्र फवारणी करनार असुन् शिर्डीच्या उपनगरा  मध्ये हि अश्याच प्रकारे फवारणी करनार असल्याचे विलास लासूरे यांनि सांगीतले ह्या फवारणी मोहीमेत नगर पंचायतचे कर्मचारी शौकत शेख,अशोक गांगुर्डे,दगु खरात व राजू थोराट हे परिश्रम घेत आहेत

बेलापूर  (देविदास  देसाई  )-हिंगोलीहुन रोजी- रोटीच्या शोधार्थ निघालेल्या तीन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन माणुसकीच्या भावनेतुन बेलापूरकरांनी या कुटुंबाना आधार दिला आहे  त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या मुक्कामाची व जेवाणाची व्यवस्था करण्यात आली  आहे               हिंगोली जिल्ह्यातुन पोट भरण्यासाठी तीन कुटुंब दर वर्षी  प्रमाणे याही वर्षी अहमदनगर येथे आली होती केवळ एकच दिवस शेतकर्याकडे रोंजंदारीवर काम मिळाले त्यांनंतर कोरोनाचे थैमान सुरु झाले अन यांच्या पोटापाण्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला काम असुनही बाहेर जिल्ह्यातील म्हणून शेतकरी काम देईना   रोजगाराच्या शोधार्थ  मारुती झाडबा ईंगळे पत्नी दिक्षा मारुती ईंगळे  , कळनु नारायण झरे पत्नी निर्मला झरे , विलास शालीग्राम कोसेकर त्याची साठ वर्षाची आई शिवकन्या कोसेकर रविंद्र सखाराम चौगुले पत्नी  सुनिता तीन लहान मुली एक लहान मुलगा हे दहा जण   अहमदनगर  ते बेलापूर  असा साठ पासष्ठ किलोमीटर पायी चालुन बेलापूरला पोहोचले गावात ही वार्ता समजताच आपत्ती व्यवस्थापन समीतीने त्यांची आस्थेने चौकशी करुन त्यांना नविन मराठी शाळेत राहण्याची व्यवस्था केली बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी देखभाल करण्याची तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घेतली  गौरव सिकची दिपक खंडागळे  लक्ष्मीकांत लखोटीया यशवंत नाईक  यांनी किराणा सामान आणुन दिले जनसेवा झुणका भाकर केंद्राच्या वतीने सुवालाल लुक्कड अमीत लुक्कड प्रविण लुक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली प्राथमिक आरोग्याधिकारी देविदास चोखर यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली वातावरण ठिक होईपर्यंत  याच ठिकाणी  रहाण्याचा सल्ला बेलापूर ग्रामस्थांनी दिला असुन ग्रामस्थ या कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्था करणार आहे बेलापूरचे ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पोलीस पाटील अशोक प्रधान प्रकाश जाजु किरण भांड महावितरणचे चेतन जाधव आदिनी त्या सर्व कुटुंबाला धीर देवुन सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.

शिर्डी  श्री साईबाबा संस्थाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या संकटात सापडलेल्या या राष्ट्रीय आपत्तीत मदत म्हणून ५१ कोटी रुपये  देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे शिर्डीकर व साईभक्तांना मधून स्वागत होत आहे,
     सध्या जगाला, भारत देशालाही कोरोनाच्या संकटामुळे हैराण करून सोडले आहे, दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण झपाट्याने देशात वाढत असून राज्यात ही संख्या सर्वात मोठी आहे, केंद्र सरकारा प्रमाणेच राज्य सरकारही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठा प्रयत्न करीत असून शासनाने अनेक प्रतिबंधात्मक योजनाही आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे,
  देशात कोरोनाच संसर्ग वाढू नये म्हणून देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे देशात, राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे, देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत , त्यामुळे राज्यात सरकारने अनेक धाडसी पावले उचलली आहेत, अशा परिस्थितीत राज्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे अशा राष्ट्रीय किंवा नैसर्गिक आपत्तीत श्री साईबाबा संस्थान नेहमीच मदतीसाठी पुढे आले आहे ,,सध्या देशात ,राज्यात  कोरोना विषाणूमुळे संकट उभे राहिले आहे, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाला मदत म्हणून श्री साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे ,शिर्डीला श्री साई भक्त देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात येत असतात व साईबाबा संस्थानला देणगी देत असतात, या देणगीतूनच साई संस्थानने 51 कोटी रुपये कोरोना मुकाबल्यासाठी देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे, तसेच या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी अहोरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रयत्न करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, तसे पोलीस ,अत्यावश्यक सेवा वाहतूक करणारे ट्रक चालक, गरजू अशा विविध लोकांसाठी साईबाबा संस्थान नाश्ता ,भोजन सुद्धा पुरवणार आहे ,असा हा निर्णय साई संस्थान ने घेतल्यामुळे या  निर्णयाचे साईभक्त व शिर्डी करांमधून मोठे कौतुक होत आहे ,
   सध्या शिर्डीच्या श्री साई संस्थान वर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त गीता बनकर, अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त दिलीप स्वामी,  व श्री साई संस्थान चे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची एक कमिटी आहे ,या कमिटीने हा निर्णय घेतला असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थित होते, श्री साईबाबा संस्थान नेहमी राष्ट्रीय आपत्ती च्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असते ,यावेळी पुढे येऊन साई संस्थानने या कोरोना मुकाबल्यासाठी 51 कोटी रुपये दिल्याबद्दल  श्री साईबाबा संस्थान चे व  संस्थांच्या या कमिटीचे शिर्डीकर व साई भक्तां तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे,
          ।।चौकट।।
    कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान प्रमाणेच श्री तिरुपती देवस्थानं 200 कोटी रुपये ,माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने 7 कोटी रूपये, श्री महावीर हनुमान मंदिर पटना तर्फे एक कोटी रुपये, तसेच देशातील विविध देवस्थानच्या वतीने ही  मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे ,त्याच प्रमाणे अभिनेते अक्षय कुमार यांनी अठरा कोटी ,अजय देवगन यांनी 15 कोटी ,त्याच प्रमाणे उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 200 कोटी ,आनंद महिंद्रा यांनी तीनशे कोटी, मुकेश अंबानी यांनी 1000 कोटी रुपये मदत म्हणून या राष्ट्रीय आपत्तीत देण्याचे जाहीर केले आहे ,विविध संस्था,नेते, अभिनेते, उद्योगपती हे आर्थिक व इतर वेगवेगळ्या प्रकारांनी मदतीसाठी आता पुढे येत आहे, अशा बिकट समयी अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, विविध खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, आपला एक दिवसाचा पगार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत म्हणून देण्याची गरज असल्याचे व प्रत्येक नागरिकांनी आपणास याप्रसंगी काय मदत करता येईल त्याप्रमाणे ती करावी ,गर्दी टाळावी ,असही मत साई भक्त व जिल्हा वासिया मधून व्यक्त होत आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल घेत नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांनी शहरात घरोघर जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आहे . यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांचा शोध घेतला जात आहे . विशेषतः पुणे, मुंबई येथून आलेल्या लोकांची नोंद घेऊन त्यांच्या हातावर शिक्के मारले जात असून त्यांना 14 दिवस घरांमध्येच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.
नगरपालिकेच्या सिस्टर सुनिता त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिका दवाखान्यातील नर्सेसची टीम शहराच्या विविध भागात जाऊन घराघरातून ही पाहणी करीत आहे .आज त्यांनी वार्ड नंबर दोन मध्ये घरोघरी भेटी देऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली.आलेल्या लोकांची नावे व संपर्क क्रमांकाची नोंद घेण्यात आली .याशिवाय घरांमध्ये कोणाला ताप, कोरडा खोकला, सर्दी झाली आहे काय याचीही विचारणा करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या या पथकासोबत पोलीस बंदोबस्त ही देण्यात आला आहे.हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे व त्यांचे सहकारी याकामी सहकार्य करीत आहेत .सदरची पाहणी आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्यांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी . कोरोना पासून सर्व शहरवासीयांचे रक्षण करण्यासाठी ही पाहणी केली जात आहे त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, समीना अंजुम शेख, जायदाबी कुरेशी,तरन्नुम रईस जहागीरदार,कलीम कुरेशी, रज्जाक पठाण,निसारभाई कुरेशी, रईस जहागिरदार,अस्लमभाई सय्यद आदींनी केले आहे .

बेलापूर  (प्रतिनिधी  )- कोरोनाच्या  धास्तीमुळे घरातच बसलेल्या गरीब कुटूंबाला आधार देण्याकरीता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असुन त्यांच्या योगदानातुन गरीबांना जिवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले       कोरोनाचा फैलाव होवु नये म्हणून प्रत्येक जण घरात बसुन असुन जे लोक मोलमजुरी करुन आपली गुजराण करत होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून गावातील हाजी ईस्माईल शेख हाजी शोएब शेख अमीरसाहेब शेख कुरेशी फकीर आतार यांनी वैयक्तिक खर्चातुन किराणा सामान खरेदी करुन त्याचे गरजवंताना मोफत वाटप केले यात शेंगदाणे तेल तुप मीठ बेसन पीठ साबण निरमा
तांदूळ अशा वीस वस्तुचा समावेश होता  या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक पत्रकार देविदास देसाई अजय डाकले सुभाष राजुळे चंद्रकांत नाईक शकील कुरेशी अमीरसाहेब आतार फकीर शेख अल्ताफ शेख सुभान शेख मुस्ताक शेख ईम्रान शेख बिलाल शेख सुभाष मोहीते संजय शेलार  अमोलीक रफीक शेख ईलीयास शेख अल्लाऊद्दीन शेख रविंद्र करपे शरद देशपांडे  पत्रकार गोविंद साळुंके उपस्थित  होते

-राजेंद्र गड़करी अंतरराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी या पावन भूमीत दररोज श्री साई दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो साईभक्त येत असतात मात्र सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग एकमेकांना होऊ नये किंवा वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सर्व देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे, शिर्डीत त्यामुळे लॉक डाऊन असून श्री साई  समाधि मंदिर सह सर्वच बंद आहे, अशा प्रसंगी अत्यावश्यक सेवा पुरवणारे वाहनधारक तसेच येथे असणारे भिकारी साधू यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थाने अशा गरजवंतांना नाष्टा पाकिटे देऊन या संकट समयी मदत करणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहे,
     सध्या जगात, देशात, राज्यात सर्वत्र कोरोना ची चर्चा सुरू आहे, देशात सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्व ठप्प आहे, शिर्डीत अाधी दररोज हजारो साईभक्त येत होते ,परंतु लाक डाऊन मुळे सर्व दुकाने, विमानसेवा, रेल्वे वाहतूक तसेच एसटी महामंडळाच्या बसेस, सर्व काही बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर सुद्धा बंद असल्याने साई भक्त एकही येत नाही श्री साईबाबा संस्थाने मंदिराबरोबरच आपली सर्व भक्त निवासस्थाने व प्रसादालही बंद केले आहे, त्यामुळे शिर्डीत असणारे भिकारी साधू यांचा या काळात उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ,अशासाधू संतांसाठी  तसेच येथे  प्रसादालय वर अवलंबून असणारे  भिकारी यांना श्री साईबाबा संस्थाने मोफत नाश्ता पाकिटे पुरवावीत, त्याच प्रमाणे राज्यात देशात अत्यावश्यक सेवा पुरवणारे मग ते दूध टँकर असो, भाजीपाला किंवा किराणामाल ट्रक असो अश्या ट्रक चालकांना रस्त्यात सर्वकाही बंद असल्यामुळे जेवण तर दूरच पण चहा सुद्धा मिळणे मुश्कील होत आहे, तरी श्री साईबाबा संस्थान नगर मनमाड या महामार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक चालकांना नाष्टा पाकिटे दिली तर त्यांचा अशा समयी चांगला उपयोग होईल अशी मागणी शिर्डी मधून होत आहे
    शिवाय श्री साईबाबा संस्थान कडे नाष्टा पाकिटे बनवण्याची यंत्रणा सज्ज असते ,भविष्यात जर बाका प्रसंग याविषाणू मुळे निर्माण झाला तर शिर्डी परिसरात किंवा जिल्ह्यात किंवा आणीबाणी प्रसंगी महत्त्वाच्या ठिकाणी असे अन्न किंवा नाष्टा पाकीट कसे पोहोचवता येतील याची नियोजन किंवा तयारी ही श्री साई संस्थान करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.


-निवासी संपादक जीतेश लोकचंदानी शिर्डी  हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे सध्या कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र मोठी काळजी घेण्यात येत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे 14 एप्रिल पर्यंत येते लॉक डाऊन आहे,     मात्र अत्यावश्यक सेवा पुरवणारे, किंवा अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडणाऱ्यांना शिर्डीत आता मास्क हे अव्वाच्या सव्वा किमतीला मिळत आहे, काही डुप्लिकेट मास्क बाजारात आल्याचे समजते ,तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन येथील नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करावे, अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे
     सध्या देशात, राज्यात सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरू आहे, संसर्गजन्य हा आजार असल्याने शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या अहवालानुसार लॉक डाऊन करण्यात आले आहे, नेहमी गजबजलेली शिर्डी सध्या शांत शांत आहे, शिर्डीत येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस खाजगी बसेस, रेल्वे वाहतूक विमान वाहतूक सर्व बंद आहे साईभक्त ही  येणे बंद असून दुकाने ,लॉजेस बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे शिर्डी सध्या शांत शांत आहे, मात्र शिर्डीत गोरगरीब व मोलमजुरी करणारेही ही अनेक आहेत ,शिवाय लॉक डाऊन मुळे त्यांना बाहेर पडणे मुश्कील होत आहे ,अशांना संध्याकाळी खाण्यापिण्याची सुद्धा मोठी पंचाईत होत आहे दिवसभर काम करून संध्याकाळी रोजीरोटी मिळवणारे शिर्डीत अनेक आहेत मात्र लोक डाउन  मुळे काम ठप्प झाले आहे, त्यामुळे अशांना बाजारात मास्क घेणेही परवडत नाही, शिर्डीत दूध ,मेडिकल भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच त्या घेण्यासाठी दुकानात येणारे यांना मास्क ची मोठी गरज आहे, स्वच्छ  शिर्डी ,सुंदर शिर्डीचे देशाचे तीसरे बक्षीस शिर्डीला  मिळाले आहे, अशा स्वच्छ सुंदर शिर्डीत आज पर्यंत सर्व  नियम पाळत आहेत, लॉक डाऊन मुळे नागरिक बाहेर पडण्याचे टाळत आहेत, अशा शिर्डीत अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणारे यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मास्क पुरवण्याची गरज आहे कारण सध्या बाजारात मास्क मिळेनासे होत आहे किंवा त्याच्या किमंती अवाच्या सव्वा लावल्या जात आहे ,त्याचप्रमाणे बाजारात डुबलीकेट मास्क आल्याचेही समजते, त्यामुळे येथील नगरसेवक किंवा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आपापल्या वार्ड मध्ये  योग्य असे मास्क मोफत वाटप केले तर त्याचा फायदा नागरिकांना चांगला होईल, इतर वेळी किंवा निवडणुकीच्यावेळी नागरिकांना विविध गोष्टींचे वाटप केले जाते परंतु अशा प्रसंगी हे मास्क चे वाटप केले तर ते सर्व दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले असून तशी मागणी शिर्डी करांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget