Latest Post

बुलढाणा - 14 अक्तुबर
बुलढाणा जिले के धार्मिक स्थल सैलानी में वन ज़मीन पर कई लोग अतिक्रमण कर अवैध रूप से झुग्गी-झोपड़ी बनाकर रहनेवाले लोगो का अतिक्रमण जेसीबी की मदद से वनविभाग ने हटाया हटाना शुरू कर दिया है.
       बुलडाणा तहसील के ग्राम पिंपलगांव सराय से करीब में हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा की दरगाह है जहां पर देश भर से लाखों भाविक सैलानी बाबा के मज़ार पर अकीदत की चादर चढाने के लिए आते है.दरगाह के अतराफ़ में पहाड़ियां है और ये वनज़मीन है.लोगो की श्रद्धा है कि सैलानी बाबा की दरगाह पर हाजिरी देने से करनी- कौटाल,जादू-टोना,भुत-प्रेत व अन्य प्रकार के रोगों से मुक्ति मिलती है. अधिकांश लोग इसी उपचार के लिए यहां आने के बाद अपने रुकने के लिए वनज़मीन पर झोपड़ी बनाकर रहते और फिर ज़मीन पर कब्ज़ा कर लेते.उपचार के नाम पर सैलानी में रहनेवाले कई बाहरी लोग राज्य में आपराधिक घटनाओं को अंजाम देकर सैलानी में आ कर इन्ही झोपड़ियों में रहेकर पुलिस की नज़र से बचते है.यही आपराधिक
गतिविधियों में लिप्त लोग जिले भर में मोबाइल व अन्य चोरियों की घटनाओं को अंजाम देते जिसके कारण सैलानी के मूल निवासियों को भी दिक्कत उठानी पड़ती है.इतना ही नही वनजमीन पर अतिक्रमण कर कुछ लोग यहां अवैध शराब भी बेचते है.इन सभी बातों को ध्यान में रखते हुए डीएफओ संजय माली ने सैलानी के 500 से अधिक अतिक्रमण धारकों को वनभूमि से अतिक्रमण हटाने का नोटिस जारी किया और फिर 11 अक्तुबर से जेसीबी की सहायता से अतिक्रमण हटाने का काम प्रत्यक्ष रूप से शुरू कर दिया है.बुलढाणा डीएफओ संजय माली,एसीएफ गायकवाड़,बुलढाणा आरएफओ गणेश टेकाले खुद अपनी उपस्तिथि में अतिक्रमण हटाने के लिए दिशा निर्देश दे रहे है.इस काम मे कोई बाधा ना आये इसके लिए पुलिस व एसआरपी भी तैनात है जबकि जिले भर के वनकर्मी सैलानी में अतिक्रमण हटाने में जुटे हुए है.वनविभाग के इस कड़े कदम से सैलानी भक्त और स्थानिक अनेक नागरिकों ने वनविभाग के इस अच्छे काम का समर्थन किया है जबकि निजी ज़मीन धारकों को किसी प्रकार की परेशानी ना हो इसका भी वनविभाग ध्यान दे,ऐसी अपेक्षा भी व्यक्त की है.

भारतीय जनता पार्टी  शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज शिर्डी परिसरात मोठया उत्साहाने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आले विविध ठिकानि विविध नगरात प्रचार फेरी निघाली बिरोबा बनात   रतिलाल लोढ़ा यांचा मार्गदर्शना ख़ाली प्रचाराचे शुभारंभ झाले बिरोबा मंदिरात छोटे खानी सभा झाली त्यात अनेक मान्यवरान्नी आपापले मनोगत व्यक्त केले प्रचार शुभारंग प्रसंगी मार्गदर्शन रतिलाल लोढ़ा तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्वोसर्व राजेंद्र गोंदकर न्यानेश्वर गोंदकर दिगंबर क़ोते हरिभाऊ गोंदकर अभय शेडके नगराद्यक्षा अर्चनाताई क़ोते प्रतापराव जगताप शिवाजी गोंदकर मधुकरराव क़ोते मनोज लोढ़ा सर्जेराव काटकर विलास वाघ कविताताइ निकम बाबासाहेब गोंदकर साहेबराव काटकर साहेबराव काटकर नानासाहेब काटकर बालासाहेब काटकर ठकाजी काटकर वसंतराव शेडके विजय कोते भास्कर क़ोते विलास गोंदकर अशोक वाघ दिनुमामा क़ोते अरविंद क़ोते यादव क़ोते आबासाहेब क़ोते चांगदेव बनकर नामदेव बनकर राजेंद्र वाघ अदि मान्यवर उपस्तिथ होते

शिर्डी ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थात आबाधीत राहण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असता, या दरम्यान, शोध मोहिम सुरु असताना गावठी पिस्तुलसह दोघांना पकडण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. अक्षय सुधाकर थोरात (वय22 रा. जवळके, ता.कोपरगाव ह.रा. वाघवस्तीरोड, शिर्डी ता.राहाता), पवन सुभाष भोत (वय 22 रा. क्रांतीचौक, निमगाव ता.राहाता) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे  यांना शिर्डी परिसरात अक्षय सुधाकर थोरात याचेकडे गावठी पिस्टल आहे, अशी गोपनिय पक्की माहिती मिळाली होती. त्यानुसार थोरात याच्या राहत्या घराचे जवळ सापळा लावून अक्षय थोरात व पवन भोत याच्यासह एक अल्पवयीन सहकार्यास 1000 रुम परिसराच्यामागे संशयरित्या फिरताना पकडले. यावेळी त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. अधिक चौकशी केली असता, अक्षय थोरात याने गावठी पिस्टल शिरपूर जि.धुळे येथून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गु.रं.न. 947/2019 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी स.पो.नि.मिथुन घुगे यांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे.
 जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक डॉ.दिपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दीपक गांधले, गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. मिथुन घुगे, पोह. प्रसाद साळवे, पोना बाबा सातपुते, पोना किरण कुर्‍हे, पोशि अजय अंधारे, नितीन सानप आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.   

धोत्रा येथे प्रचाराचा शुभारंभ करताना अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचे प्रतिपादन
सिल्लोडदि.८ (प्रतिनिधी) ज्या लोकांना आतापर्यंत साथ दिलीत त्यांनी धोका देण्याचे काम करून राजकारणाचा धंदा केला दडपशाहीच्या पैशाच्या जोरावर सामान्य लोकांना त्रास देण्याचे काम केले, अशा लोकांना जनताच यावेळी घरी बसवणार आणि सिल्लोड तालुक्यात परिवर्तन घडणवणार असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी केले यावेळी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ हभप कापरसिंग दादा वांजोळा ह भ प भगवान महाराज जंजाळ ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर ह भ प संतोष महाराज आढावणे ह भ प भगवान महाराज ह भ प पंढरीनाथ महाराज दळवी दिगंबर महाराज, कमलाकर बाबा सुभानपुरकर रघुनाथ महाराज भुतेकर, यांच्या हस्ते श्री क्षेत्र धोत्रा येथे करण्यात आला यावेळी सुरेश बनकर रंगनाथ काळे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे ज्ञानेश्वर मोठे श्रीराम महाजन सुनील मिरकर इद्रीस मुलतानी दिलीप दानेकर राजेंद्र जैस्वाल, श्रीरंग साळवे अशोक गरुड ठगन भागवत ओबीसी नेते दादाराव आळणे विजय दौड सुभाष मानकर पुष्पाताई काळे अरुण काळे ज्ञानेश्वर तायडे जयप्रकाश चव्हाण राहुल ताठे मारोती वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती
[ ] यावेळी बोलताना पालोदकर म्हणाले की सर्वांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाने स्वतः उमेदवार समजून या निवडणुकीला समोरे जाऊया झुंडशाहीचा नाश करण्यासाठी मी राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी नाकारली, आपल्या सर्वांच्या पाठबळाने अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ उद्घाटन केली आहे मात्र कामे झाले नाही माणिकदादा पालोदकर यांनी उभे केलेले सहकारी संस्थाने बंद पडण्याचे काम केले, एकही संस्था दहा वर्षात त्यांना उभी करता आली नाही सतत खोटे बोलून खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करून मते घेतली यावेळेस जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसून आपण सर्वांनी सिल्लोडमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहावे , केवळ मतासाठी हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश करणे पसंत केले परंतु जनता वेडी नाही हा माणूस कसा आहे हे सगळ्यांना माहीत आहे, त्यांचे सगळे गैरव्यवहार बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही मर्दाची अवलाद असेल तर तालुक्यात एकदा फिरून दाखवा वाघाचे कातडे पांघरलेला हा नौटंकी वाघ आहे, मुस्लिम समाजाच्या मालमत्ता हडपण्याचे काम केले त्यांनाही आता बदल हवा आहे त्याच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील सर्वच शिवसेना उमेदवार धोक्यात आले आहेत दिवस संपत आले आहेत या परिवर्तनासाठी आमच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पालोदकर यांनी केले

• तालुक्याचा विकास झाला नाही मात्र आमदाराचा कसा विकास झाला लोकांच्या मालमत्ता परत करण्याचे काम केले वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येतील त्याला बळी पडू नका :- ज्ञानेश्वर मोठे
• बदल अटळ आहे अंमलबजावणीसाठी सर्वांनी झटावे दोन्ही तालुके दहशत मुक्त करायचे आहेत :- माजी आमदार सांडू पाटील लोखंडे
• गेली दहा वर्ष आमदारकी भोगली मात्र विकास झाला नाही फक्त घोषणा केल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही नेत्यांना त्याचे श्रेय घेण्यासाठी त्याची धडपड सुरू आहेत आम्ही सर्व त्याग करायला तयार आहे तुम्ही तयारी ठेवली पाहिजे :-सुरेश बनकर
यावेळी गजानन राऊत सुनील काकडे, गणेश बनकर विनोद मंडलेचा अशोक तायडे,संजय डमाळे, नारायण बडक, भीमराव काळे सुनील काळे सुभाष गव्हाणे बंडू काळे रमेश चिंचपुरे, कैलास काळे शिवाजी बुधाळ, गणेश लोखंडे, पुंडलिक लोखंडे, मेघराज चोडिये, श्रीरंग लोखंडे, कैलास जंजाळ, प्रभाकर सुरडकर, कृशीवर्ता बडक, किरण पवार, गोविंदराव भोजने, विजय मंडलेच्या, लुकमान सेठ विष्णू काटकर, गंगाबाई ताठे, वृषाली मिरकर, कौतिक बडक सुनील काकडे, पुडलिक मोरे, काशिनाथ जंजाळ, नारायण जाधव, संजय जामकर, काशिनाथ पांडव,चरणसिंग नाईक, राजेंद्र आहिरे, लेखराज उपाध्याय पुंजाराम गरुड देविदास आमटे पोपटराव कुंटे अनिस सय्यद शेख अमन महेश शंकरपल्ली यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते हजारो संख्येने उपस्थित होते

बुलढाणा - 9 अक्तुबर
बुलढाणा विधानसभा से एमआइएम के प्रत्याशी मो.सज्जाद के प्रचार के लिए पार्टी के अध्यक्ष व सांसद असद्दोदिन ओवैसी आगामी 13 अक्तुबर को बुलढाणा में आकर प्रचार सभा को संबोधित करेंगे.
       एमआइएम के औरंगाबाद स्थित राज्य के मुख्यालय दारुस्सलाम से मिली जानकारी के अनुसार महाराष्ट्र में होने जा रहे आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर अपनी पार्टी के उम्मीदवारों के प्रचार के लिए सांसद असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्र भर में घूमकर उम्मीदवारों के लिए मतदान मांग रहे है.आगामी 13 अक्तुबर को दोपहर 12 बजे असदुद्दीन ओवैसी की सभा का आयोजन मलकापुर मार्ग स्थित एआरडी मॉल के सामने किया गया है.इसी प्रकार एमआइएम के पूर्व प्रदेशाध्यक्ष सय्यद मोइन की सभा 10 अक्तुबर को रात 8 बजे रखी गई है जबकि प्रदेशाध्यक्ष व सांसद इम्तियाज़ जलील की बुलढाणा व मोताला में 15 अक्तुबर को प्रचार सभा होने जा रही है.इसके अलावा भी एमआइएम के अन्य नेता बुलडाणा की अपनी सीट पर ध्यान केंद्रित किए हुए है.
    बता दे कि,बुलढाणा से वंचित बहुजन आघाडी से बुलढाणा नागराध्यक्षा श्रीमती नजमुन्निसा के पति पार्षद मो.सज्जाद विधानसभा चुनाव लडने के लिए इच्छुक थे किंतु पार्टी ने उन्हें टिकिट नही दिया इसी से नाराज़ हो कर मो.सज्जाद ने एमआइएम का दामन थाम लिया और एक ही दिन में एमआइएम से उम्मीदवारी प्राप्त करते हुए बुलढाणा विधानसभा के चुनाव में रंगत डाल दी है.अब देखना ये है कि,असद ओवैसी,इम्तियाज़ जलील,सय्यद मोइन की सभाओं के बाद मो.सज्जाद किसका खेल बिगाडकर कितनी सफलता पाते है.

नेवासा (प्रतिनिधी)-  नगर- औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे स्थिर सर्वेक्षण पथक व नाकाबंदी पथकाने ब्रिझा या वाहनातून 42 लाख 20 हजार रुपये जप्त केले.ही रक्कम बँक ऑफ बडोदाची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आली.सोमवारी दुपारी स्थिर सर्वेक्षण पथक व नाकाबंदी (एसएसटी) चे एस. एल. खेले या पथक प्रमुखांसह पोलीस कर्मचारी जी. के. अढागळे, वाय. एम. झिने, बी. एन. गडाख हे पथक पांढरीपूल येथून ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी कार्यरत असताना दुपारी नगरहून नेवासा फाट्याकडे जात असलेली ब्रिझा गाडी (क्र. एमएच 17 बीएक्स 1117) हे वाहन पथकाने थांबविले. या वाहनाची तपासणी करण्यात आल्यानंतर बॅगमध्ये तसेच पोत्यामध्ये एकूण शंभर, पन्नास, पाचशे, दोन हजार अशा विविध मूल्यांच्या नोटा आढळल्या. वाहनातील संजय बबन डोंगरे यांच्याकडून ही रोकड जप्त केल्यानंतर पैसे जास्त असल्यामुळे सर्व पैसे नेवासा तहसीलमधील आचारसंहिता कक्षात आणण्यात आले. नेवासा येथील स्टेट बँकेतील पैसे मोजण्याचे मशीन आणि कर्मचारी तहसीलमध्ये आल्यावर जप्त केलेली रक्कम सर्वांसमक्ष मोजण्यात आली. ब्रिझामध्ये असलेले संजय बबन डोंगरे हे बँक बडोदाचे शाखाधिकारी आहेत. ही रक्कम नगर येथील बँक ऑफ बडोदा सावेडी शाखेतून भेंडा शाखेत नेली जात होती. रक्कमेमध्ये पाचशे, शंभर, पन्नास व दोन हजाराच्या नोटा होत्या. नगर तसेच भेंडा येथील अधिकारी आल्यानंतर रकमेची शहानिशा केल्यावर ही रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे व सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांनी दिली.

बुलडाणा - 8 ऑक्टोबर
आपण कुणालाही जेलमध्ये टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली नाही, कुणा विरोधकांच्या घरासमोरील रस्ता बंद केला नाही आपण फक्त आणि फक्त विकासावर भर दिला असून सबका साथ, सबका विकास हा माझा ध्यास असून आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार  एड.आकाश फुंडकर यांनी खामगांव येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या विजय संकल्प मेळाव्यात व्यक्त केले.
      भाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार एड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी रात्री खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधीत केले. यावेळी भाजपा सोशल मीडिया सेलचे सागर फुंडकर, मुस्लीम समाजाचे नेते हाजी बुढन खॉ, गनी गाजी लाखनवाडा यांचेसह भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. आमदार फुंडकर पुढे बोलतांना म्हणाले की, मतदार संघात मी निवडुन येण्याआधी 15 वर्षात विशेषत: मुस्लीम बहुल भागात विकास कामे न झाल्याने मुस्लीम समाज बांधवांची अवस्था वाईट झाली होती. हे सर्व पाहून मला अक्षरश: लाज वाटू लागली.  त्यामुळे मी सबका साथ सबका विकास या केंद्र शासनाच्या धोरणानुसार मुस्लीम बहुल वस्त्यांसह संपुर्ण मतदार संघात रस्ते,नाल्या व महत्वाच्या मुलभूत  सुविधांची कामे केल्यामुळे केवळ 5 वर्षात या मुस्लीम वस्त्यांचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे.  आणि येणा-या काळात यापेक्षा दुप्पटीने कामे करण्यात येऊन मतदार संघ समस्या मुक्त केल्या शिवाय राहणार नाही. शिवाय आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प आहे असे त्यांनी सांगितले.
         यावेळी भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, मो.इद्रीस जमादार, शोहरत खान, अनिस जमादार, गुलजमा शाह, गनी गाजी यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.  उपरोक्त नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मुस्लीम समाज बांधव आमदार आकाश फुंडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन सै.नजीब इकबाल तर आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केले. यावेळी मेळाव्याला सुमारे 5 हजार मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती होती.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget