आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प!आमदार एड. फुंडकर विजय संकल्प मेळाव्यात 5 हजार मुस्लीम बांधवांची उपस्थिती

बुलडाणा - 8 ऑक्टोबर
आपण कुणालाही जेलमध्ये टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली नाही, कुणा विरोधकांच्या घरासमोरील रस्ता बंद केला नाही आपण फक्त आणि फक्त विकासावर भर दिला असून सबका साथ, सबका विकास हा माझा ध्यास असून आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार  एड.आकाश फुंडकर यांनी खामगांव येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या विजय संकल्प मेळाव्यात व्यक्त केले.
      भाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार एड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी रात्री खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधीत केले. यावेळी भाजपा सोशल मीडिया सेलचे सागर फुंडकर, मुस्लीम समाजाचे नेते हाजी बुढन खॉ, गनी गाजी लाखनवाडा यांचेसह भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. आमदार फुंडकर पुढे बोलतांना म्हणाले की, मतदार संघात मी निवडुन येण्याआधी 15 वर्षात विशेषत: मुस्लीम बहुल भागात विकास कामे न झाल्याने मुस्लीम समाज बांधवांची अवस्था वाईट झाली होती. हे सर्व पाहून मला अक्षरश: लाज वाटू लागली.  त्यामुळे मी सबका साथ सबका विकास या केंद्र शासनाच्या धोरणानुसार मुस्लीम बहुल वस्त्यांसह संपुर्ण मतदार संघात रस्ते,नाल्या व महत्वाच्या मुलभूत  सुविधांची कामे केल्यामुळे केवळ 5 वर्षात या मुस्लीम वस्त्यांचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे.  आणि येणा-या काळात यापेक्षा दुप्पटीने कामे करण्यात येऊन मतदार संघ समस्या मुक्त केल्या शिवाय राहणार नाही. शिवाय आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प आहे असे त्यांनी सांगितले.
         यावेळी भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, मो.इद्रीस जमादार, शोहरत खान, अनिस जमादार, गुलजमा शाह, गनी गाजी यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.  उपरोक्त नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मुस्लीम समाज बांधव आमदार आकाश फुंडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन सै.नजीब इकबाल तर आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केले. यावेळी मेळाव्याला सुमारे 5 हजार मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती होती.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget