नगर- औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे स्थिर सर्वेक्षण पथक व नाकाबंदी पथकाने ब्रिझा या वाहनातून केले 42 लाख 20 हजार रुपये जप्त.

नेवासा (प्रतिनिधी)-  नगर- औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे स्थिर सर्वेक्षण पथक व नाकाबंदी पथकाने ब्रिझा या वाहनातून 42 लाख 20 हजार रुपये जप्त केले.ही रक्कम बँक ऑफ बडोदाची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आली.सोमवारी दुपारी स्थिर सर्वेक्षण पथक व नाकाबंदी (एसएसटी) चे एस. एल. खेले या पथक प्रमुखांसह पोलीस कर्मचारी जी. के. अढागळे, वाय. एम. झिने, बी. एन. गडाख हे पथक पांढरीपूल येथून ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी कार्यरत असताना दुपारी नगरहून नेवासा फाट्याकडे जात असलेली ब्रिझा गाडी (क्र. एमएच 17 बीएक्स 1117) हे वाहन पथकाने थांबविले. या वाहनाची तपासणी करण्यात आल्यानंतर बॅगमध्ये तसेच पोत्यामध्ये एकूण शंभर, पन्नास, पाचशे, दोन हजार अशा विविध मूल्यांच्या नोटा आढळल्या. वाहनातील संजय बबन डोंगरे यांच्याकडून ही रोकड जप्त केल्यानंतर पैसे जास्त असल्यामुळे सर्व पैसे नेवासा तहसीलमधील आचारसंहिता कक्षात आणण्यात आले. नेवासा येथील स्टेट बँकेतील पैसे मोजण्याचे मशीन आणि कर्मचारी तहसीलमध्ये आल्यावर जप्त केलेली रक्कम सर्वांसमक्ष मोजण्यात आली. ब्रिझामध्ये असलेले संजय बबन डोंगरे हे बँक बडोदाचे शाखाधिकारी आहेत. ही रक्कम नगर येथील बँक ऑफ बडोदा सावेडी शाखेतून भेंडा शाखेत नेली जात होती. रक्कमेमध्ये पाचशे, शंभर, पन्नास व दोन हजाराच्या नोटा होत्या. नगर तसेच भेंडा येथील अधिकारी आल्यानंतर रकमेची शहानिशा केल्यावर ही रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे व सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget