शिर्डीत गावठी पिस्तुलासह दोघांना पकडण्यात शिर्डी पोलिसांना यश.

शिर्डी ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थात आबाधीत राहण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असता, या दरम्यान, शोध मोहिम सुरु असताना गावठी पिस्तुलसह दोघांना पकडण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. अक्षय सुधाकर थोरात (वय22 रा. जवळके, ता.कोपरगाव ह.रा. वाघवस्तीरोड, शिर्डी ता.राहाता), पवन सुभाष भोत (वय 22 रा. क्रांतीचौक, निमगाव ता.राहाता) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे  यांना शिर्डी परिसरात अक्षय सुधाकर थोरात याचेकडे गावठी पिस्टल आहे, अशी गोपनिय पक्की माहिती मिळाली होती. त्यानुसार थोरात याच्या राहत्या घराचे जवळ सापळा लावून अक्षय थोरात व पवन भोत याच्यासह एक अल्पवयीन सहकार्यास 1000 रुम परिसराच्यामागे संशयरित्या फिरताना पकडले. यावेळी त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. अधिक चौकशी केली असता, अक्षय थोरात याने गावठी पिस्टल शिरपूर जि.धुळे येथून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गु.रं.न. 947/2019 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी स.पो.नि.मिथुन घुगे यांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे.
 जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक डॉ.दिपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दीपक गांधले, गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. मिथुन घुगे, पोह. प्रसाद साळवे, पोना बाबा सातपुते, पोना किरण कुर्‍हे, पोशि अजय अंधारे, नितीन सानप आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.   
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget