Latest Post

राहुरी (तालुका प्रतिनिधी)-राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या कोम्बीग ऑपरेशन मोहिमेत भरत अशोक चितळकर हा अट्टल गुन्हेगार जेरबंद केला. त्याचे दोन साथीदार पोलिसांना पाहताच पसार झाले. चितळकरवर राहुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.राहुरी पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन बागुल, पोउपनि. गणेश शेळके तसेच दहा पोलीस कर्मचारी व दोन महिला कर्मचारी यांनी ही मोहीम राबविली. राहुरी पोलिसांच्या धडक कारवाईमुळे बारागाव नांदूर परिसरातील पसार गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना भरत चितळकर यास पाठलाग करून पकडण्यात आले. चितळकर याच्यावर राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 237/19 नुसार भादंवि. कलम 399, 402 अन्वये, तसेच राहुरी पोलीस गुन्हा रजिस्टर क्रमांक 621/19 नुसार भादंवि. 399, 402 अन्वये व सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/19 नुसार भादंवि 395 (नुकताच पेट्रोल पंपा नजिक घडलेला दरोडा ) असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, चितळकरला बेड्या ठोकल्याने आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

बुलडाणा - 29 सप्टेंबर
एकीकडे कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांचा आलेख झपाट्याने वाढत असतानाच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या पैशांची ऑनलाइन चोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. खातेधारकांना खात्याचे तपशील न विचारता किंवा ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारा ओटीपीही न विचारता थेट ग्राहकांच्या खात्यातून रक्कम गहाळ होत असल्याच्या अनेक घटना मागील काही आठवड्यांत घडल्या आहेत. यामध्ये बुलढाण्यात ही असाच प्रकार घडला असून या प्रकरणात ग्राहकाने बैंके विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
        बुलडाणा येथील तक्रारकर्ते वसीम शेख यांचे अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत खाता आहे.त्यांच्या खात्याला त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला असून मोबाईल मध्ये गुगल पे या एप्सच्या माध्यमातून ते इतरांना पैशे ट्रांसफर करतात. दरम्यान 13 सप्टेंबर रोजी वसीम शेख यांनी आपल्या मित्रांच्या म्हणण्यावरून त्याच्या औरंगाबाद येथील कोटक बँकेच्या खात्यामध्ये रुग्णालय कामाकरिता 7 हजार रुपये पाठविले असता हे 7 हजार त्याच्या मित्राच्या अकाउंट मध्ये न जाता इतरत कुठे गेले व यांच्या अकाउंड मधून 7 हजारची कण्यात झाली. तक्रारकर्ते शेख हे  याची माहिती विचारायला अक्सिस बँकेत गेल्यानंतर हा विषय बँकेचा नसून तुम्ही गुगल पे यांच्याशी संपर्क करा असे सांगण्यात आले. जेव्हा दोन ते तीन वेळा गुगल पे यांच्या कस्टमर केअरला सांगितल्या नंतर अकाउंड मध्ये कपात झालेले 7 हजारा ची रक्कम 21 सप्टेंबर रोजी परत आली. मात्र 22 सप्टेंबर ला रात्रि 1 वाजून 13 मिनिटाला गुगल एग्रोमार्ट नावाने कोणतेही बँकेचा ओटीपी नंबर न येता परस्पर 3 हजार 250 रुपये अकाउंड मधून कापल्या गेले.याची माहिती एसएमएस च्या माध्यमातून कळल्यानंतर यासंदर्भात वसीम शेख यांनी 25 सप्टेंबर रोजी अक्सिस बँकेत जाऊन याबाबत शाखेतील ऑपरेशन हेड किशोर धुर्वे यांना विचारपूस केली असता त्यांना तुमचा अकाउंड हैक झाल्याची माहिती देत ऑनलाइन पद्धतीने पैसे कापल्या गेले असून एटीएमचा पिन नंबर बदलण्याचा सल्ला देत उडवा-उडवी ची उत्तरे दिली.यामुळे वसीम शेख यांनी बुलडाणा शहर पोलिसात अक्सिस बँकेने अकाउंट मधून विना परवानगी परस्पर पैसे कापून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली यावरून पोलिसात 27 सप्टेंबर ला बुलडाणा येथील अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एव्हढेच नव्हे तर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला पुन्हा मध्यरात्री गुगल एग्रोमार्ट नावाने कोणतेही बँकेचा ओटीपी नंबर न येता पुन्हा परस्पर 3 हजार 250 रुपये अकाउंट मधून कापल्या गेले.यासंदर्भात अक्सिस बँकेने ऑनलाइन पद्धतीने ओटीपी नंबर न देता अकाउंड मधून परस्पर कसे पैसे ट्रान्सफर केले याचा तपास पोलीस करीत आहे.

गंगापूर औरंगाबाद महामार्गावरील
अरबी मदरसा जवळ डिझेल - पेट्रोलची वाहतुक करणारा टँकर पलटी झाला. अपघातात टँकरने रस्त्यालगत एक पलटी घेतल्याने टँकरच्या झाकणांमधून इंधनाची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. कायगाव येथे गांधी पेट्रोल पंप येथे जात होता. सुदैवाने इंधनाची गळती होऊनही अन्य घटना घडली नाही.
रस्त्याचे काम चालू होता परंतु काय दिवसापासून हे रस्त्याचा काम बंद पडला आहे त्यामुळे ही घटना घडली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी वाचनात आला आहे.  पेट्रोल  3 हजार व 9 हजार लिटर डिझेलची घेऊन जात होता . घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. इंधन वाहतूक करणारा टँकर एम एच 18 जी 2465   मनमाड मार्ग गंगापूर कायगावकडे
जात होता. येणारे जाणारे दोन्ही बाजूचे मोहन तीन तास थांबवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस निरीक्षक अर्जुन चव्हाण यांच्यासह त्या परिसरामध्ये राहणारे शमशेर शेख,   बाबा शेख, नीलेश गांधी, यांच्यासह पोलिस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने मदत केली.

शिर्डी प्रतिनिधी:- शिर्डी येथिल सुपर हाँस्पिटल मध्ये अड्मिट असलेल्या आढाव नावाच्या व्यक्तीने सुपर हाँस्पिटल च्या छतावरुण उड़ी घेउन स्वताच जीवन संपाविन्याचे प्रयत्न केले प्रथम दर्शनी लोकांनि आमच्या प्रतिनिधीशि बोलतांना सांगीतले की आढाव नावाच्या व्यक्तिचा जागेवर मृत्यु झालेले आहें तेव्हा आमच्या प्रतिनिधिने हाँस्पिटल मधे सम्पर्क केले असता आढाव यांचीं प्रकृति अत्यंत नाज़ुक आहें असे समजले आढाव यांनि का जीवन संपवन्याचा प्रयत्न केले हे आजुन गुलदसत्यातच आहें परंतु याची उलटसुलट चर्चा सध्या शिर्डीत चालु आहें

बुलढाणा -  28 सितंबर
पारिवारिक बेबनाव के कारण पत्नी अपने मायके रहने लगी थी किंतु पति ने बात करने के बहाने घर में बुलाया और पत्नी की इच्छा के खिलाफ ज़बरदस्ती शारीरि संबंधित बनाएं, पत्नी की इस शिकायत के बाद आरोपी पति तथा सास के खिलाफ बुलढाणा शहर थाने में विभिन्न धाराओं के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.
      पुलिस से मिली जानकारी के अनुसार बुलढाणा के मिर्ज़ानगर निवासी आरोपी अकबर खान नाजिमा खान के साथ पीडिता का विवाह 2 नवंबर 2016 में हुआ था. आरंभ काल ने सब कुछ ठीक था किंतु बाद में पति और सास ने मायके से 2 लाख रूपये लाने को कहा,मायके की आर्थिक स्थिति कमजोर होने के कारण पीड़िता ये मांग पूरी नही कर पाई जिसके बाद उसे शारीरिक व मानसिक रूप से प्रताड़ित किया जाने लगा.पति अकबर खान ने 3 माह में ही पत्नी को घर से बाहर निकाल दिया तब से पीडिता अपने बुलढाणा स्थित मायके में रहने लगी थी.पीड़िता ने कोर्ट में पिटीशन दायर की है तब से पति फोन पर मीठी बातें कर घर ले जाने की बात कर रहा है.21 जनवरी 2019 को आरोपी ने पीड़िता को मिलने के लिए अपने घर ले गया और बेडरूम में ले जा कर इच्छा के विरुद्ध ज़बरदस्ती शारीरिक संबंध स्थापित किया और जान से मारने की धमकी दी.पीडिता की इस शिकायत के बाद बुलढाणा शहर थाने में आरोपी पति अकबर खान नाजिमा खान व सास नाजिमा खान के खिलाफ भादवी की धारा 498-A,376-B,323,504,506,34 के तहत विगत 19 सितंबर को अपराध दर्ज कर लिया गया है.दोनों आरोपी अब तक पुलिस की गिरफ्त में नही आए हैं.मामले की अधिक जांच थानेदार शिवाजी कांबले कर रहे हैं.


डेंग्यु ताप सावधानता बाळगा डॉक्टर सलीम शेख
भारतात जवळ जवळ साथीचे आजार उद्भवतात आशिया आफ्रिका खंडात साथीचे आजार वारंवार डोके काढत असतात व गावच्या गाव साथीच्या कचाट्यात सापडतात व त्यामध्ये  फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा होते त्यामध्ये डेंगू ताप हासुद्धा एक घातक रूप घेत आहे सध्या तो महाराष्ट्रात आंध्र ,कर्नाटक ,आसाम या राज्यात धुमाकूळ घालत आहे आता सध्या पुणे व औरंगाबाद शहरात धुमाकूळ घालतोय व कधीकधी आपल्या अहमदनगर श्रीरामपूर जिल्ह्यात त्याचे रुग्ण आढळतात सध्या पावसाचे दिवस आहेत त्याचप्रमाणे कधी किती वाढेल हे बिलकुल सांगता येत नाही त्याचा प्रसार कमी व्हावा हाच हेतू जनजागृती व्हावी ही आजची गरज प्रथम 1950 मध्ये दक्षिण आशिया व आफ्रिका येथे हा व्हायरस सापडला व नंतर तो क्युबा व अमेरिका या देशात पसरला हा व्हायरस चिकुन गुनिया  ज्या अँडीस नावाच्या जातीच्या डासांपासून होतो त्या तासांपासून डेंगू होतो हे डास चांगल्या वातावरणात चांगल्या स्वच्छ पाण्यात स्वच्छ डबक्यात स्वच्छ व निर्मळ वातावरणात आपले वास्तव करतात याचे पैदास प्रजनन व संगोपन हे चांगल्या पाण्यात व वातावरणात करतो व आठवड्यात याची पूर्ण वाढ व सक्षम म्हणून श्वास घेण्यास सुरुवात करतो अर्थात तयार राहतो याचे एक विचित्र पद्धत आहे तो फक्त दिवसातच चावा घेतो म्हणजे हा पूर्ण कार्यालयीन काम करतो
लक्षणे:- यामध्ये एकदम ताप येतो मळमळल्यासारखे होते कधीकधी उलट्या होणे डोके फार दुखणे डोळ्यात लाली येउन डोळ्यांमध्ये फार दुखणे डोळ्यांची उघडझाप करताना वेदना होणे सर्दी होणे भरपूर थंडी वाजून येणे अंग हात पाय खुप खुप दुखणे जबरदस्त कंबर दुखणे शरीरातील गाठी वाढतात व त्यावर सर्व शरीरावर लालसर चट्टे व पुरळ येणे ही लक्षणे सर्वात महत्वाचे डेंगू मध्ये असतात तसेच महत्त्वाचे लक्षण म्हणजे तोंडामध्ये लालसर चट्टे येतात नंतर पायावर चट्टे येउन संपूर्ण अंगावर  माशी पसरतात संपूर्ण शरीर लालसर गथील चावल्यासारखे होते ही सर्व प्रक्रिया शरीरांतर्गत चालू असते ती 3 ते 5 दिवसांपर्यंत चालू असते त्या नंतर पहिल्या लक्षणासारखीच लक्षणे पुन्हा पुन्हा उद्भवतात परंतु त्याची तीव्रताही कमी प्रमाणात असते
डेंगू चा प्रकार:- म्हणजे (डेंगू हीमोरेजीक फियर) अर्थात डेंगू रक्त भावी ताप हा प्रकार असेल तर धोकादायक असतो यामध्ये धोका होण्याची अत्यंत शक्यता असते या प्रमुख्याने शरीरातून एकदमच रक्तस्राव चालू होतो नाकातून तोंडातून शौचावाटे रक्‍त वाहू लागते झिरपू लागते रुग्ण एकदमच गळुन जातो बेशुद्ध अवस्थेत जातो ही अवस्था अत्यंत घातक असते धोकादायक असते ही अवस्था तिसऱ्या किंवा पाचव्या दिवसापासून होते कारण रुग्णांचे निदान लवकर न झाल्याने त्यामध्ये पांढरे पेशी कमी होणे व प्लेटलेट्स फार प्रमाणात कमी होऊन  थ्रम्बोसावटोपेनीया ल्युकोसाबटोसीस व रक्त गोठण्याची प्रक्रिया कमीकमी होते हे सर्व प्रक्रिया फेल हो जाते व रुग्ण दगावण्याची शक्यता येते.
खबरदारीचा उपाय:- डेंगू चे पहिल्याप्रथम सामाजिक कार्य म्हणून जनजागृती करावी नागरिकांनी एक सामाजिक कर्तव्य समजून आपल्या घराच्या परिसरातील परिसर स्वच्छ करावा त्यामध्य डबके ते बुजवावे व ते स्वच्छ करून निर्जंतुक करावे पाणीसाठल्यास ते स्वच्छ करून फेकून देऊन त्यामध्ये डासांचा साम्राज्य होणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या घरातील हौद स्वच्छ करावा गटारी पहिल्याप्रथम स्वच्छता ठेवावे त्या गटारी मध्ये त्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी करावी गार्डन बगीचे झाडे असल्यास त्यावर कीटकनाशकांची फवारणी करून घ्यावी रात्री झोपताना स्वच्छ मच्छरदाणीचा वापर करावा किंवा मच्छर च्या वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात मच्छर प्रतिबंधक भेटतील ते वापरावे जेणेकरून पहिल्याप्रथम आपल्या स्वतःची काळजी घेता येईल आपल्या अगर आपल्या शेजारी किंवा कामगारांना याची लागण दिसल्यास शक्यता लवकरात लवकर आपल्या नजीकच्या किंवा फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा व त्वरित उपचार करावे आपल्या सरकारी आरोग्य केंद्रास किंवा नगर परिषद कार्यालयात याची नोंद घ्यावी जेणेकरून ते कीटकनाशकांची फवारणी करण्यास प्राधान्य देतील अशाप्रकारे प्रशासनास सहकार्य करावे व पुढील अनर्थ टाळण्याचा प्रयत्न करावा
डॉक्टर सलीम शेख बैतूश्शिफा हॉस्पिटल श्रीरामपूर.

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.27, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी शिवसेनेच्या युवासेना मध्ये सहभागी होवून ऐतिहासिक चळवळीचे साक्षीदार बनावे असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनीं केले.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील शिवना सर्कल मध्ये युवासेनेच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अब्दुल समीर यांनी विविध गावांत बैठका घेवून युवकांशी संवाद साधला.
 अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार करण्यात आली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदारसंघातील युवासेनेने निर्धार केला असल्याचे अब्दुल समीर यांनी युवकांशी संवाद साधताना स्पष्ठ केले.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ अब्दुल समीर यांनी सोयगाव तालुक्यातून पदयात्रेला सुरुवात केली आहे. सोयगाव मध्ये जवळपास 100 किलो मीटर पदयात्रा पूर्ण करून समीर यांनी सिल्लोड तालुक्यात पदयात्रेला सुरुवात केली आहे. त्यांच्या पदयात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
 शिवना सर्कल मध्ये आयोजित पदयात्रेस
शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, देविदास लोखंडे, पंचायत समिती सदस्य सलीम शेख,मुरलीधरराव काळे,उपतालुका प्रमुख सुभाष करवंदे,सर्कल प्रमुख सुधाकर काळे, राजुमिया देशमुख, राजरत्न निकम, शेख सलिम, सुधाकर बनकर, पंजाबराव चव्हाण, भास्कर बनकर, रुद्राजी इंगळे, लक्ष्मण गव्हाणे, नाना गव्हाणे, अकिल देशमुख, रमेश चव्हाण, राजेश्वर आरके, जगन ठाले, गोविंदा गव्हाणे, तानाजी गव्हाणे, गणेश गव्हाणे, पंढरीनाथ चव्हाण, उपविभाग प्रमुख उत्तम भागवत, श्रावण गिरी, शिवा टोम्पे,गणेश राणा काळे,दादा पाटील काळे,संदीप राऊत,इस्माईल कुरेशी,शामराव लोखंडे,गणेश सपकाल,रावसाहेब काळे,विनायक काटकर,सुनील सपकाल,किरण दहितकर,सखाराम धनवई, दीपक वाघ, अमोल बोराडे,

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget