September 2025

संगमनेर: ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक केवळ धार्मिक उत्साहापुरती मर्यादित न राहता, यावर्षी सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवणारी ठरली. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणुकीनुसार शांतता, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत विविध गटांनी इथे मिलादुन्नबी, पैगंबर जयंतीदरम्यान महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.

यात ​एका स्वयंसेवक गटाने मिरवणूक ज्या मार्गाने गेली, त्या मार्गाची तात्काळ स्वच्छता केली. त्यांच्या या कृतीतून 'स्वच्छता हाच धर्म' असा संदेश देण्यात आला. या तरुणांनी मिरवणुकीचा उत्साह कायम राखत सामाजिक भान जपले, ज्यामुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.तर एका गटाने महा​आरोग्य शिबिराचे आयोजन ते देखील मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार व औषधे अश्या शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार दिला गेला. धार्मिक उत्सवादरम्यान आरोग्यसेवेसारख्या उपक्रमामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला.​काही गटांनी पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी आणि शांततेच्या शिकवणुकीचा प्रसार केला. त्यांनी त्यांच्या विचारांचे फलक तसेच ऐतिहासिक आठवणीतल्या पुरातन काळातील वस्तू आणि माहितीपत्रके घेऊन लोकांना सर्वधर्म समभाव, सलोखा आणि एकता या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.


​एकंदरीत, यावर्षीची ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक धार्मिक उत्साहासह सामाजिक कार्याचा एक आदर्श बनली आहे. या उपक्रमांनी पैगंबरांच्या शिकवणुकीला केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतूनही लोकांपर्यंत पोहोचवले. याचीच दखल घेत ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार आणि न्यूज एन एम पी परिवाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून, पुरस्कार जाहीर केलेली नावे पुढीलप्रमाणे एकता नगर सोशल ग्रुप, ह्युमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशन, एन आर सी सी ग्रुप आणि मंत्री फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्टी, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्टी अशा एकूण पाच संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या  शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3=00 वाजता  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सय्यद बाबा चौक या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष वसीम उर्फ गुड्डूभाई सय्यद अहिल्यानगर  महिला जिल्हाध्यक्ष बानोबी शेख, महासचिव जमीर शेख, यांनी दिली आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आटवाडी, एकलहरे येथे मोठी कारवाई करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ६ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुख्य आरोपी अमजद नौशाद सय्यद (वय ३०, रा. आटवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर) हा सध्या फरार आहे.


गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सपोनि जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. आरोपी अमजद सय्यद याच्या घराच्या पोर्चमध्ये विमल ब्रॅण्डचा केसरयुक्त पान मसाला व तंबाखू असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला.

तसेच घरामध्येही प्रतिबंधित मुद्देमाल असल्याचा संशय आल्याने आरोपीचा भाऊ हमीद सय्यद यांच्या उपस्थितीत घराचे कुलूप उघडण्यात आले. घराची झडती घेतली असता तेथेही मोठ्या प्रमाणात सुगंधी पान मसाला व तंबाखू सापडला. सर्व मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमालाची एकूण किंमत ₹२,०६,१८४/- एवढी असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी राजेश बडे यांना तातडीने कळविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्याची तजवीज करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारने गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेला बंदी आदेश काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. नागरिकांनीही अशा अवैध व्यापाराविषयी माहिती पोलिसांना दिल्यास तातडीने कडक कारवाई केली जाईल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget