विधानसभेत बेलापूरला स्वतंत्र सबस्टेशनची मागणी करुन त्या बाबत पाठपुरावा केल्यामुळेच मंजुरी -आमदार हेमंत ओगले.

बेलापूरः (प्रतिनिधी)-येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या (महावितरणच)विद्युत  सबस्टेशनला  स्वतंञ उपविभाग म्हणून मान्यता मिळाली असुन या प्रश्नाबाबत वेळोवेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन हे काम मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे.  या बाबत माहिती देताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की तालुक्याचे विविध प्रश्न आमदार या नात्याने सतत विधानसभेत मांडत असतो . श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथील सब स्टेशनला अनेक गावे जोडलेले असल्यामुळे या सबस्टेशनवर अतिरिक्त भार येतो. त्यामुळे नागरिकांना वेळोवेळी भार नियमनाचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आपण बेलापूरकरता स्वतंत्र उपविभाग देण्याची मागणी केली होती .  व त्याबाबत सतत पाठपुरावाही केला होता.या मागणीची दखल घेवुन बेलापूर करीता स्वतंत्र विभाग व बारा कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्याचे आदेश नुकतेच करण्यात आलेले आहे याबाबत राज्यमंत्री मेघना दीपक साकोरी बोर्डीकर यांनी आपणास  पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व आपण केलेल्या प्रयत्नामुळे महावितरण मार्फत नवीन उपविभाग व शाखा कार्यालय निर्माण करण्यास अंतरी मंजुरी मिळाली असून याबाबत महावितरण स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे आपण केलेल्यां पाठपुराव्यामुळेच या कार्यालयामार्फत सदर जनहिताचे काम मार्गी लागले असल्याचे पत्र राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे यांनी दिले असल्याचेही आमदार ओगले यांनीसांगितले ,बेलापूर येथील सबस्टेशन हे श्रीरामपूर वीज विभागास जोडलेले होते.यामुळे वीज वितरणात सातत्याने अडथळा येत असे.यामुळे महावितरणच्या श्रीरामपूर विभागाचे विभाजन करुन  बेलापूर सबस्टेशनचे स्वतंञ उपविभागात रुपांतर करावे यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचेही आमदार ओगले यांनी सांगितले .

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget