पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नातून बेलापूरच्या सबस्टेशनला स्वतञ उपविभाग म्हणून मान्यता

बेलापूरःयेथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या (महावितरणच्)विद्युत  सबस्टेशनला पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नातून दर्जावाढ होवून स्वतंञ उपविभाग म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.                      याबाबत श्री.नवले व श्री .खंडागळे यांनी सांगीतले की,बेलापूर येथील सबस्टेशन हे श्रीरामपूर वीज विभागास जोडलेले होते.यामुळे वीज वितरणात सातत्याने अडथळा येत असे.यामुळे महावितरणच्या श्रीरामपूर विभागाचे विभाजन करुन  बेलापूर सबस्टेशनचे स्वतंञ उपविभागात रुपांतर करावे यासाठी पालकमंञी नाम.विखे पा.,माजी खा.डाॕ.सुजय विखे पा. व महावितरणचे अधिकारी यांचेकडे बेलापूर,ऐनतपूर,उक्कलगाव,एकलहरे,वळदगाव,उंबरगाव,पढेगाव,कान्हेगाव येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळळाने सातत्याने पाठपुरावा केला होता.                            या शिष्टमंडळात  शरद नवले अभिषेक खंडागळे यांच्यासह बेलापूरच्या सरपंच सौ.मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, रणजीत श्रीगोड,जालिंदर कु-हे ,भाऊसाहेब कुताळ, रामराव शेटे, विराज भोसले,किशोर बनकर, विष्णुपंत डावरे,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,अनिल गाडे, बंडू तोरणे, प्रशान्त लिप्टे, मुकुंद लबडे ,महेश खरात, हाजी इस्माईलभाई शेख,मोहसीन सय्यद, शफिक बागवान, मुश्ताक शेख,लाल महम्मद जाहगीरदार, गणेश उमाप,रावसाहेब अमोलिक ,सुभाष अमोलिक ,दिलिप अमोलिक ,भाऊसाहेब तेलोरे, अनिल थोरात, प्रकाश राजुळे, प्रभात कु-हे , महेश कु-हे,अजीजभैया शेख  आदिंचा  समावेश होता. शिष्टमडळ नेवून पाठपुरावा केला होता.                         सदर प्रयत्नास अखेरीस यश येवून बेलापूर उपविभागास मान्यता मिळाल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी कळविले आहे.सदरचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल नाम.राधाकृष्ण विखे पा.,माजी खा.डाॕ.सुजयदादा विखे पा.,महाविरणचे उपअभियंता श्री.वाणी,श्री.भोगले,श्री.अवचिते यांना धन्यवाद दिले आहेत.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget