संजय साळवे यांनी अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र तसेच मूकबधिर विद्यालय संचलित दिव्यांग कल्याण मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्र मार्फत दिव्यांगांच्या सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक, व सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान योगदान दिलेले आहे. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत 58 दिव्यांग व्यक्तींना बीज भांडवल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद 5% सेस फंडातून 38 दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली आहे.
मागील पंचवीस वर्षापासून दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग वधु वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजगायत 288 दिव्यांग व्यक्तींचे विवाह मोफत संपन्न करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत आत्तापर्यंत 14 दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवरील सायकल उपलब्ध करून दिले आहे.तसेच अनेक दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर,कुबडी व इतर कृत्रिम साहित्य उपलब्ध करून देऊन दिव्यांगांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करून दिव्यांग बांधवांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे
दरवर्षी दिव्यांग महिला सन्मान सोहळा,संजय गांधी निराधार योजना,अंत्योदय योजना,स्वतंत्र रेशन कार्ड, याचा लाभ दिव्यांगांना मिळवून दिला आहे. अलीमको नवी दिल्ली, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर मार्फत मोफत हातपाय मोजमाप व कॅलिपर्स मोजमाप तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करून 112 दिव्यांगांना याचा लाभ मिळवून दिला आहे.
त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच त्यांची निवड जिल्हा व्यवस्थापन समितीवर करण्यात आली आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा समन्वयक डॉ.दीपक अनाप, दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
Post a Comment