श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा

श्रीरामपूर (प्रतिनिधी):श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा दिवस भारतरत्न, महान अभियंता, दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञ तसेच आधुनिक भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात उप प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अभियंत्यांचे समाजातील व राष्ट्राच्या विकासातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “अभियंते केवळ इमारती, रस्ते वा प्रकल्प उभारणारे नसून ते समाजाच्या गरजा ओळखून विकासाचे दिशा-दर्शक ठरतात. विश्वेश्वरय्या यांचे कर्तृत्व व कार्यपद्धती हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही संदीप निमसे यांनी भूषविले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या प्रसंगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अभियंता दिनानिमित्त अभियंता समाजाला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget