Latest Post

🔸शहर पोलिसाचे डीबी स्कॉडने तिन्ही आरोपिंना घेतले ताब्यात

बुलडाणा - 29 ओक्टोबर

बुलढाणा येथील तीन युवक शॉपिंगसाठी मुंबईला गेले असता त्यांच्याजवळील पैशे संपले म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबून एका विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरला व त्याच्या जवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन पसार झाले.अधिकारीच्या मोबाईल लोकेशन वरून तिन्ही आरोपीना बुलडाणा शहर पोलिसच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसच्या स्वाधीन केले आहे.

    याबाबत पोलिसाने दिलेली माहिती अशी की बुलडाणा येथील अमित सुनील बेंडवाल 18 वर्ष,आबिद खान अयुब खान उर्फ ऑल 18 वर्ष व अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या 19 वर्ष हे तिघे शॉपिंग साठी मुंबईला गेले होते. या पैकी एका जवळचा पाकीट हरवला.पैशे नसल्याने त्यांनी 22 ओक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रैक जवळ,बेलापुर नवी मुंबई येथे रासत्याने पायी जात असलेले 39 वर्षीय विक्रीकर अधिकारी महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकुने वार करुण त्यांना जख्मी केले व त्यांचा जवळचा एंड्रॉइड मोबाइल व पाकिट मधील नगदी 8 हजार रुपये घेऊन फरार झाले.या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चीरला व ते गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.या प्रकरणी अज्ञात आरोपीं विरुद्ध सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात भादवीची धारा 394 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.जख्मी बिनवडे यांच्या मोबाइलचा लोकेशन घेतला असता तो मुंबई येथे दिसला,त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले.याची माहिती बुलडाणा शहर ठानेदार प्रदीप सालुंखे यांना देण्यात आली.शहर डीबी स्कॉडचे शिवाजी मोरे,दत्ता नागरे व संदीप कायंदे यांनी बुलडाणा येथील आरोपी अमित बेंडवाल, आबिद खान व अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले.आज 29 ओक्टोबर रोजी बेलापूर पोलीस बुलडाणा शहरात दाखल झाली असून तिन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या रॉबरीत मुम्बई येथील इतर 2 आरोपिंचा समावेश असल्याची माहिती शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे यांनी असून आरोपी अमित बेंडवाल वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे ही ते म्हणाले.आरोपींना घेण्यासाठी नवी मुंबई येथील पीएसआई एन. डी.शिंदे,पीएसआई एन. पी.सांगळे,संदीप फड,विनोद देशमुख व अज़हर शेख बुलडाणा आलेले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )- बेलापुर गावातील मुख्य पेठेतील रस्त्याची  तातडीने दुरुस्ती करुन डाबरीकरण करण्यात यावे या मागणी करीता सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने बेलापुर बु!! ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यकर्ते आजपासुन उपोषणास बसले आहे                     बेलापुर बाजारापेठेतील रस्ता अतिशय खराब झाला असुन ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे यारस्त्याची ताताडीने दुरुस्ती न झाल्यास सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने उपोषणास बसण्याचा इशारा मंचचे गोपाल जोशी राजेश सुर्यवंशी शशीकांत तेलोरे रोहीत बोरा विकी मुथ्था गोपी दाणी आदित्य जाधव यांनी दिला होता त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज साकाळपासुन हे कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसले आहे.

बुलडाणा - 28 ओक्टोबर

संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे हतबल झालेला आहे.कोरोना पासून वाचन्यासाठी फिजिकल डिस्टन्स,मास्क व वारंवार हाथ धुत राहणे हे उपाय सूचवलेले आहे.या नियमांचा पालन करून आपण कोरोनापासुन सुरक्षित राहु शकतात.बुलडाणा जिल्हा प्रशासन सुद्धा नागरिका मध्ये कोरोना संसर्गा बाबत जनजागृति करीत आहे.जिल्ह्यातील काही ठराविक कोविड सेंटर मध्येच कोरोना तपासणी केली जात होती त्यामुळे रुगणांना व त्यांचे नातेवाइकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत सुरु 52 प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा कोरोना तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.कोरोनाची लक्षणे दिसल्यास ग्रामीण भागातील जनतेने आपल्या गावा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून  घ्यावे,अशे आवाहन सुद्धा डॉ. सांगळे यांनी केले आहे.


बुलडाणा - 27 ओक्टोबर

बँगलोरच्या रिडास इंडीया कंपनीने बुलडाणा येथील एका गुंतवणूकदाराकडून तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेत मूळ परतावा व नफा न दिल्याच्या तक्रारीवरून आज 27 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कंपनीमालक व इतर एका विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील इकबाल नगर, टिपू सुलतान चौकात राहाणाऱ्या फिर्यादी मो. साजीद अब्दुल हसन देशमूख यांनी 7 मार्च 2017 ते 28 सप्टेंबर 2018 दरम्यान स्वतः व कुटुंबातील आई,वडील, भाऊ,पत्नी यांचे एनएफटी व आरटीजीएस मार्फत 11 लाख 50 हजार रुपयांची बँगलोर येथील रिदास इंडिया कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अय्यूब हुसेन व मो. अनिस आयमन दोघे रा. बँगलोर यांनी गुंतवणूकीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात नफ्याचा परतावा व मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दिले होते. मात्र कंपनीकडून कोणतीच रक्कम देण्यात न आल्याची व इतरही नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्यादीने आज 27 ऑक्टोंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबातील सदस्यांना आमिष देऊन 11 लाख 50 हजार रुपयांनी त्यांना गंडविल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अयुब हुसेन व मो. अनिस आयमन या दोघांविरुद्ध भांदवी कलम 420,406,409,34 सह महाराष्ट्र ठेवी वित्तीय संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकिशोर काळे करीत आहे.


बुलडाणा - 27 ओक्टोबर

धामणगांव बढे येथील स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेत स्व:ता जवळील नकली नोटा चलनात आणण्यासाठी भारतीय चलनातील खऱ्या नोटा मध्ये नकली नोटा मिसळवुन चलनात आणण्याचा प्रकार धा.बढे येथे समोर आला आहे. ही घटना 26 आक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे धामणगाव बढे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेतील 4 आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. 

      बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या धामणगांव बढे परिसरातील कुरहा येथील ज्ञानेश्वर मगनसिंग पेले हा 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान पैसे भरण्या करीता स्टेट बँकेत आला. त्याने आपल्या सोबत नगदी 2 लाख  65 हजार रुपयाच्या नोटा आणल्या. नेहमी प्रमाणे बँकेतील कर्मचारीने नोटांचे विवरण लक्षात घेत नोटांची मोजणी करुन बँकेतील काउंटींग मशिनद्वारे तपासणी केली. यामधील 200 रु.च्या एकुण 365 नोटामध्ये तब्बल 181 नोटा नकली निघाल्या. ज्याची दर्शनी किंमत 36,200 रु. असलेल्या या चलनात आणण्या करिता खऱ्या चलनीय नोटा मध्ये समाविष्ट केलेल्या आढळुन आल्या.हा संपूर्ण प्रकार धा.बढे येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापक राजेश संजीव सोनवणे यांचे सतर्कतेने उघड झाला. या घटनेची फिर्याद शाखा व्यवस्थापक सोनवणे यांनी धा.बढे पो.स्टे.दिली असता आरोपी ज्ञानेश्वर मगनसिंग पेले, विठ्ठल सबरु मगरेसे, राहुल गोटीराम साबळे, गोटीराम साबळे यांच्या विरुध्द कलम 489(इ), 489 (उ) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपी चारही अटक करुण त्यांना आज 27 ओक्टोबर रोजी न्यायालया समोर हजर केले असता 2 नोहेंबर पर्यंत त्यांना पोलीस रिमांड मध्ये पाठवण्यात आले आहे. प्रकरणी जि.पो.अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पो. अधीक्षक बजरंग बंसोडे, उपविभागीय पो.अधीकारी रमेश बरकते तसेच बुलडाणा एल.सी.बी.चे पो.निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली धा.बढेचे प्रभारी ठाणेदार योगेश जाधव करीत आहे.या प्रकरणी आरोपी संख्या वाढण्याची शक्यता असून बुलडाणा एलसीबीचा एक पथक शोधकार्या साठी रवाना झाल्याची माहिती एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.


बुलडाणा - 26 ओक्टोबरवा

ईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. यंदा कोरोना महामारीमुळे नियमांच्या चौकटीत दसरा सण साजरा करण्यात आला असून,बुलडाणा जिल्हा पोलिस मुख्यालयात पारंपारीक पद्धतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या हस्ते शस्र पूजन करण्यात आले. यावेळी होम डीवायएसपी बळीराम गिते,राखीव पोलिस निरीक्षक शिंदे व इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे

बुलडाणा - 26 ओक्टोबरको:- रोनाच्या दहशतीतही मोठी जोखीम पत्कारून सेवा बजावणाऱ्या नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कामगार यांचे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वेतन रखडले आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुलडाणा जिल्हा रुग्णालयातच आज 26 ऑक्टोंबर रोजी जिल्हाप्रमुख मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले असता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

    जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात व जगात गेल्या 7 महिन्यापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कोरोना काळात डॉक्टर, नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कर्मचारी जीव मुठीत घेऊन कोविड योद्धे म्हणून कोरोना संशयीत व इतरही आजारग्रस्तां साठी सेवा देत आहे. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून त्यांचे वेतन थकल्यामूळे त्यांना सण उत्सवाच्या काळात प्रपंच सांभाळणे कठीण झाले आहे. या कोरोना योद्धयांसमोर निर्माण झालेला आर्थिक पेचप्रसंग तात्काळ सोडविण्याची आग्रही भूमिका घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी कार्यकर्त्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक देऊन तेथेच ठिय्या मांडला. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी आंदोलकांना भेट देऊन चर्चा केली. काही तासातच प्रलंबित वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे तडस यांनी आश्वासित केल्याने तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख मदन राजे यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हा उपप्रमुख बंटी नाईक,शहर प्रमुख मनोज पवार, अनिल मोरे, विशाल गायकवाड, पवन सुरडकर, मनीष सोनवाल, अमर लोखंडे, अनिल वाघमारे,गौरव इंगळे आदी  उपस्थित होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget