Latest Post

कोपरगाव प्रतिनिधी-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात दोन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने  वाईनशॉप बंद आहेत. जिल्हयात काही ठिकाणी वाईनशॉप सुरू झाले, मात्र कोपरगावात  खबरदारी म्हणुकन वाईन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक मद्यप्रेमींची हाल होत होते. नुकतेच कोपरगाव शहरामध्ये दुकाने उघडण्या संदर्भात लॉक डाऊन  शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यानुसार उद्या गुरूवार दिनांक 21 मे पासून आठवड्यातुन दोन दिवस सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत कोपरगाव शहरातील वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील मद्यपी मधुन मोठे समाधान व्यक्त होत आहे
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात, राज्यात लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे येथे सर्व बंद होते, दोन महिन्यापासून कोपरगाव येथील वाईन शॉप व मध्य विक्री केंद्रही बंद होती , व आजपर्यंत बंद आहेत, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मद्यविक्री केंद्रे अटी व शर्तींवर चालू करण्यात आली आहेत, मात्र कोपरगावात आज पर्यंत मध्य विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती, कारण कोपरगाव जवळच येवला शहरात कोरोना चे रुग्ण आढळत असल्याने कोपरगावात ही मोठी दक्षता घेण्यात येत होती ,त्याच धर्तीवर येथिल मद्य विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात शहरात थोडी ढिलाई देण्यात आली असल्याने तसेच काही दुकाने काही वेळेसाठी उघडण्यात येणार आहेत ,गेल्या दोन महिन्यापासून बंद असणारे वाईन्स शॉप ,देशी दारू दुकाने, बिअर शॉपी आदी मद्य विक्री केंद्र आठवड्यातून दोन दिवस सकाळी १० ते५ या वेळेत उघडण्यात येणार आहे, तशी प्रशासनाने परवानगी दिल्याचे मद्यपीमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे, मात्र ही मद्यविक्री केंद्रे उघडल्यानंतर लॉक डाऊन चे नियम पाळणे महत्त्वाचे आहे अन्यथा श्रीरामपूर, राहता, राहुरी याठिकाणी वाईन शॉप उघडताच मोठी गर्दी झाली होती ,सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते, अनेकांच्या तोंडाला मास्क ही नव्हते ,त्यामुळे हे वाईन शॉप त्वरित पोलिसांनी कारवाई करत बंद केली होती, कोपरगावात ही गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली वाईन्स गुरुवारी उघडणार असे समजताच मद्यपींची  गर्दी येथे होण्याची दाट शक्यता आहे ,परंतु वाईन शॉप दुकानात लॉक डाऊन चे नियम पाळणे अति महत्त्वाचे आहे अन्यथा दुकानदार व ग्राहकांवर कारवाई करण्यात यात येईल असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे ,तसेच
दि, 22 तारखे नंतर दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यास पुढील सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे अशे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेआहे. 

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )-शिंगणापूर येथील मायलेकी मंगल किसन ढोले वय ४५ व मुलगी सुमन विठ्ठल कुदळे वय २५व लहान मुलगा गौरव वय ३व सौरव वय एक वर्ष या घरातुन बेपत्ता झाल्याची तक्रार  पती  विठ्ठल सुखदेव कुदळे यांने कोपरगाव ग्रामीण पोलीसात दिली होती शोधाशोध करून हि तपास लावण्यात यश आले नव्हते घरात असलेली अडचण बेरोजगारी व कोरोणा महामारी आजारामुळे लाॅकडाउन व संचारबंदी असल्याने मला काम नव्हते घरातील कौटुंबिक अडचणी मुळे बाहेर पडलेल्या होत्या त्यांनी भोजणालया समोरील जागेत शिर्डी येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र जवळपास असलेले साईबाबा संस्थान चे सुरक्षा रक्षक व काही तरुणांच्या लक्षात हा प्रकार येताच शिर्डी पोलीसांनी तात्काळ गंभीर दखल घेऊन साईनाथ रुग्णालयात त्याना दाखल केले  यावेळी या महिला पोटाला अन्न मिळत नसेल तर जगायचे कशाला व कौटुंबिक ताणतणाव यामुळे टोकाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून डॉ प्रफुल्ल पोरवाल यांनी उपचार सुरू केले आहेत मंगल ढोले या महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्याचे तपासणी मध्ये पुढे आले  आहे दोघींची ही प्रक्रृत्ती सुधारत आहे  कौटुंबिक ताणतणाव असलेली गरिबी बेरोजगारी व दोन महिन्यांपासून नसलेला रोजगार यातुन हा प्रकार घडला आहे   बेरोजगारी गरिबी कौटुंबिक ताणतणाव यातुन हा प्रकार घडला आहे असावा असा संशय महिलेचा पती विठ्ठल सुखदेव कुदळे यांने बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले.

शिर्डी ( राजेंद्र गडकरी ) सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन सुरू आहे, या लॉक डाऊन मुळे शिर्डीतही ही सर्व काही बंद आहे, गेल्या दोन महिन्यापासून शिर्डीत सर्व बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प आहे, त्यामुळे शिर्डीतील घरपट्टी ,पाणीपट्टी शिर्डी नगरपंचायत ने माफ करावी, अशी मागणी शिर्डी करांमधून होत आहे, दरवर्षी शिर्डीतून मोठ्या प्रमाणात नगरपंचायतला कर शिर्डीकर देतात, मात्र या संकटकालीन आपत्तीत यावर्षी शिर्डीकरानाही आर्थिक टंचाई भासत असल्याने यावर्षी घरपट्टी ,पाणीपट्टी नगरपंचायतीने रद्द करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे,शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राचे शहर आहे, येथे नगरपंचायत आहे, शिर्डीतील नगरपंचायत ही राज्यातील श्रीमंत अशी नगरपंचायत समजली जाते, दरवर्षी शंभर टक्के घरपट्टी पाणीपट्टी वसुली होत असते, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू आहे ,दोन महिने शिर्डीतील दुकाने पूर्ण बंद होती ,साईभक्त येणे बंद असल्यामुळे शिर्डीतील आर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प होती शिर्डीतील बहुतांशी लोकांचे जीवन हे साई मंदिर व साई भक्तांवर अवलंबून आहे ,मात्र तेच बंद असल्याने येथे आर्थिक टंचाई जाणू लागली आहे, अशा संकटकालीन परिस्थितीत यावर्षी नगरपंचायतीने शिर्डी करांना सहकार्य करण्याऐवजी शिर्डीतील नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी भरण्याचे फोनवर सूचना केल्या जात आहेत, घरपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन कट करण्यात येईल असेही सांगितले जात आहे, मुळातच लॉक डाऊन मुळे संकटात सापडलेला शिर्डीकर आता या शिर्डी नगरपंचायत च्या फतव्याने मोठा पेचात सापडला आहे त्यामुळे सर्व थरातून यावर्षी शिर्डीतील  घरपट्टी व पाणीपट्टी नगरपंचायतने मोठे  मन दाखवून माफ करावी, अशी एकमुखी मागणी आता शिर्डीतील सर्वसामान्य व गरीब तसेच सर्व रहिवाशी करत आहेत.

शिर्डी (जय शर्मा)- शिर्डी व परिसरात लॉकडाउन च्या काळात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, परिसरात अवैध दारू तसेच वाहने चोरीला जाण्याचे प्रकारात मोठी वाढ झाली आहे, वाहने जाळण्याचे प्रकार  सुरूच आहेत, या गोष्टीवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नुकतीच रांजणगाव येथून चोरीला गेलेली महिंद्रा पिकअप जीप एम एच ४५/९३५२व ती चोरी करणारे चार आरोपी उमेश वायदंडे, आकाश दीपक गायकवाड संदीप दिलीप रजपूत व एक लहान मुलगा यांना मुद्देमालासह पकडले आहे, अहमदनगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी शिर्डीत येऊन हे चोरी करणारे चार आरोपी पकडतात मुद्देमाल जप्त करतात मग स्थानिक पोलिस काय करतात। असा सवाल शिर्डीकर करत आहेत, तसेच शिर्डी व परिसरात सध्या लॉक डाऊन च्या काळात सुद्धा मोटरसायकली,कार, जाळणारे  यांचा तपास मात्र अजून लागत नाही, यामुळे शिर्डीतील  पोलीस अधिकारी कुठे।आहेत,असा प्रश्न शिर्डीकर विचारत आहेत,शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, येथे लॉकडाउनच्या अगोदर दररोज हजारो साईभक्त साई दर्शनासाठी येत जात असत, मोठी आर्थिक उलाढाल येथे होत असत, अशा आर्थिक उलाढाल होणाऱ्या शहरात दोन नंबर धंदे हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, सध्या कोरोणामुळे सर्व बंद असताना व लॉक डाऊन सुरू असतानाही ही अवैध दारूधंदे, अवैध व्यवसाय ,व्यवसाय अवैध दारूचे साठे,दारू चोऱ्या तसेच रस्त्याने जाणारे वाहने अडवून पैसे लुटणे ,वाहने चोरी, करणे, घराबाहेर अंगणात उभ्या असणाऱ्या मोटरसायकली ,कार जाळणे असे प्रकार शिर्डी व परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढले आहे, मात्र  या सर्व गोष्टींकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे ,शिर्डी व परिसरात असे अवैध धंदे वाढले असतानाही स्थानिक पोलीस मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे, त्यामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून शिर्डीत नेमकी पोलीस प्रशासन काय करते आहे असा सवाल उठत आहे याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे असेही शिर्डीतून बोलले जात आहे.

राहता प्रतिनिधी ( मुस्ताक शाह ) कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  देशात, राज्यात लॉक डाऊन सुरू आहे ,राहता शहरात लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात ढिलाई झाल्यासारखे वाटत आहे, कारण येथेकिराणा,भाजीपाला,दुध,मेडीकल,आदी घेण्यासाठी रस्त्यावर खूप गर्दी दिसून येते ,तसेच रस्त्यावर दुकानात मोठी गर्दी होत आहे,  राहाता शहरात  व्यावसायिकांना नियम अटी ठेऊन व्यापार करण्यास परवानगी दिली असली तरी अनेक जण मास्क वापरत नाही, सुरक्षितव  सामाजिक अंतर ठेवत नाही , लॉकडाउनचे नियम पाळत नाही, परवानगी नसतानाही विनाकारण मोटरसायकल ,वाहने घेऊन फिरतात,अशीच परिस्थिती राहिली तर कोरोणाचां शिरकाव शहरात होण्याचे प्रकार घडतील, शासनाने जरी व्यापार करण्याची, काही दुकाने काही वेळेसाठी उघडण्याची परवानगी दिली असली तरी अनेक जण दुकानांची वेळ पाळत नाहीत, तसेच खरेदीच्या निमित्ताने लोकही बाहेर पडत आहेत, म्हणून लोकांनी विनाकारण फिरू नये, गरजे पुरतेच बाहेर निघायला हवे आणि यावर प्रशासनाने बंधने  आणणे गरजेचे आहे, राहता शहर कोरोणा मुक्त आहे ,ते तसेच या पुढेही  राहावे, यासाठी पोलीस, महसूल, राहता नगरपालिका व सर्व नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आता राहताकरामधुन  बोलले जात आहे.

शिर्डी,दि.20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची कामे बंद झाली. यामुळे या बंद काळात अनेक मजुरांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना मदत व्हावी यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जेवण व प्रवासाची व्यवस्था केली. संगमनेर येथून 1662 परप्रांतियांनी त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर तेथून ‘थँक्यू थोरात साहब’ असे म्हणत नामदार बाळासाहेब थोरात, सर्व संगमनेरवासीय व महाराष्ट्रीयन जनतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून राज्यातील सर्व  परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर या सर्व परप्रांतीय मजूरांना जेवणाची,  राहण्याची व  औषधोपचाराची सुविधाही देण्यात आली होती. राज्यात हे मदत कार्य सुरू असताना संगमनेर तालुक्यातही अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बसेस उपलब्ध करुन देऊन मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड या ठिकाणी जाणाऱ्या विविध परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली. अनेक गावातून पायी चालणाऱ्या या परप्रांतीय मजूरांना संगमनेर तालुक्यात मायेचा वेगळाच ओलावा अनुभवायला मिळाला. अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी या मजुरांसाठी आंघोळीची व्यवस्था, औषधोपचाराची व्यवस्था व निवासाची, आरामाची व्यवस्थाही करण्यात आली होती. या मदतीमुळे संगमनेरवासीयांच्या माणुसकीचे कौतुकही झाले.

       नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये आलेल्या परप्रांतीय मजुरांना बसच्या माध्यमातून अहमदनगर येथे सोडण्यात आले. अहमदनगर येथून रेल्वेने हे परप्रांतीय मजूर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व झारखंड या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र परप्रांतीय मजुरांनी भावनिक होऊन थँक्यू थोरात साहेब म्हणत त्यांच्या कार्यालयात फोन करून व एसएमएस'द्वारे आपली कृतज्ञता व भावना व्यक्त केली.

              यामध्ये रामविलास वर्मा यांनी म्हटले आहे थँक्यू थोरात साहेब महाराष्ट्राचे आम्हाला प्रेम मिळाले. आपुलकी मिळाली ती जगाच्या पाठीवर कुठेही मिळाली नाही. महाराष्ट्रामुळे आमचे कुटुंब रोजीरोटी मिळवत आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार जरी बंद झाला तरी महाराष्ट्रातील जनतेने आमची मदत केली. ती आम्ही जीवनात कधीही विसरू शकणार नाही. संगमनेरकर तर आम्हाला आमच्या कुटुंबातले आहेत. खरे तर संगमनेर गाव सोडताना खूप भावना अनावर झाल्या होत्या. आपण आम्हाला जेवणाखाण्याची, राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली त्याबद्दल संपूर्ण उत्तर प्रदेशमधील मजुरांच्यावतीने आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. कोरोनाचे संकट लवकर संपवून आम्ही पुन्हा महाराष्ट्रात परतणार आहोत आणि महाराष्ट्रात व देशाच्या विकासात आमच्यापरीने योगदान देऊ असा, भावनिक संदेशही त्यांनी दिला.

            कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रभावीपणे काम करत असून या संपूर्ण लॉकडाऊन काळामध्ये संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी ही कौतुकास्पद असून परप्रांतीय मजूर, हातावर रोजंदारी करणारे कामगार यांच्यासाठी विविध संघटनांनी सुमारे 3 हजार 500 डबे देण्याच्या उपक्रमासह लॉकडाऊन काळात सातत्यपूर्ण केलेले मदतकार्य हे राज्यासाठी मॉडेल ठरणारे असल्याचे गौरवौद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच काढले होते. संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला असून ज्या ज्या सेवाभावी संघटना व पदाधिकाऱ्यांनी  मदत केली त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राहता (शाह मुस्ताक आली  )-अहमदनगर जिल्ह्यात  राहाता शहरात लॉक डाउन च्या काळात  गेल्या काही दिवसापासून  शहरातून  मुली  फरार होण्याचे  प्रमाण वाढले असून  गेल्या आठ-दहा दिवसात शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्या असल्याचे  खात्रीशीर वृत्त आहे,  या घटनेमुळे राहता शहरात  उलट-सुलट चर्चा होत असून  नागरिकांमध्ये  खळबळ उडाली आहे,कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन  सुरू असून राहता शहरात  सर्व बंद आहे, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहे, किराणा,भाजीपाला,मेडीकल, घेण्यासाठी तसा बहाणा करुन किंवा काही  मुली बाहेर येतात, खरेदीच्या निमित्ताने बाहेर फिरतात व त्याचा फायदा घेत येथून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे, राहता शहरातून गेल्या आठ दहा दिवसात तीन मुली फरार झाल्याचे समजते, याची शहरात कुजबुज सुरू आहे, लॉक डाऊन मुळे सर्व जण घरात असल्याने याचे जास्त वाच्यता होत नाही, शिवाय यासंदर्भात जाहीर बोलायला कोणी तयार नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे, या  मुली बेपत्ता होण्यामागे कोणाचा हात आहे का। किंवा स्वतःहून या मुली गायब होत आहे किंवा यामागे  नेमकी ,कोण आहे का।याचा तपास लावणे गरजेचे आहे, सध्या देश संकटातून जात असताना शहरात असे प्रकार वाढत असेल तर याला वेळीच आळा घातला जाणे गरजेचे आहे, असे राहता मधून आता बोलले जात आहे, मुली बेपत्ता होण्याचे असे शहरात प्रकार यापुढे वाढत राहिले तर शहरात मोठी समस्या निर्माण होणार आहे या दबक्या आवाजात शहरात सुरू असलेल्या चर्चेमुळे अनेक कुटुंबात मुलींचे आई-वडील मोठे चिंतेत पडले आहे ,यामागे नेमकी काय आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे ,असे आता नागरिक बोलत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget