Latest Post

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल १.७ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल 10 कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या  व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल. 
महत्वाच्या घोषणा कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिक आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५०  लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर माणसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात येणार आहेत. याचा फायदा 8.69 करोड शेतकऱ्यांना होणार आहे. जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार. उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.वृद्ध, दिव्यांग, पेन्शनधारकांना पुढील तीन महिने १००० रुपये देण्यात येणार आहेत. ३ कोटी लोकांना फायदा.बचत गटाच्या महिलांना कोणतीही संपत्ती तारण न ठेवता मिळणारे कर्ज दुपटीने वाढविले. आता २० लाखांचे कर्ज मिळणार. ७ कोटी महिलांना फायदा. सरकार पुढील तीन महिने खासगी नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग असे दोन्ही २४ टक्के टाकणार आहे. यासाठी ही कंपनी १०० पेक्षा कमी कर्मचारी आणि ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५००० पेक्षा कमी असायला हवा.कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के नॉन रिफंडेबल ऍडव्हान्समध्ये  पैसे काढू शकणार आहेत. किंवा तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकणार आहे.भारतामध्ये बुधवारी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे १३० कोटी लोकसंख्येला घर सोडण्यावर बंदी आणण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात येत आहे.  020-21 या आर्थिक वर्षासाठी सरकार कर्ज वाढवू शकते. येत्या आर्थिक वर्षासाठी 7.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची सरकारची योजना आहे. आरबीआयला केंद्राचे बाँड खरेदी करण्यास सांगितले होते. मात्र, महागाईच्या भीतीने गेल्या दशकभरापासून आरबीआयने खरेदी केलेली नाही. यामुळे आता आरबीआला जगातील अन्य देशांसारखाच सरकारी बाँड खरेदी करावा लागणार आहे. राज्यांकडेही आहे पर्यायजर रोख रकमेची कमतरता पडली तर सरकार आरबीआयची वेज-अँड मिन्स ही सुविधाही वापरू शकते. हे आरबीआयने राज्यांना देऊ केलेली ओव्हरड्राफ्ट सुविधा असते. अर्थमंत्रालयाने या योजनेवर काही बोलण्यास नकार दिला असून आरबीआयनेही रॉयटर्सला पाठविलेल्या मेलला काही उत्तर दिलेले नाही.

अहमदनगर (प्रतिनिधी)  हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेला एक रुग्ण रस्त्यावर फिरत असताना पोलिसांना दिसला. शहर पोलिसांनी त्याला सर्जेपुरा येथे फिरत असताना ताब्यात घेतले आहे. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाबरोबर एक व्यक्ती होती. या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिले आहे.लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून घरात थांबण्याचे आहवान करण्यात येत आहे. शहरातील चौका-चौकात पोलीस तैनात आहे. होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेल्यांना घरीच थांबण्याचे आदेश आहे. पोलिसांकडून त्यांची दोन वेळा हजरी घेण्यात येते. आज दुपारी सर्जेपुरामध्ये तोफखाना पोलीस बंदोबस्तावर होते. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघे फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.त्याचवेळी त्या दोघांना पोलिसांनी थांबून चौकशी केली. त्यातील एकाच्या हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानुसार त्याला रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान या रुग्णावर आणि त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपअधीक्षक मिटके यांनी दिली आहे.

बेलापूर (देविदास देसाई )- बेलापूर  परिसरातील गोखलेवाडी शिवारात  कुत्र्याला पकडण्याच्या नादात बिबट्या  विहीरीत पडला . अखेर मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाला यश आले    .        काल सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास बबन बाबुराव दाणी यांच्या वस्तीवर असणार्या कुत्र्याला पकडण्याच्या नादात बिबट्या दाणी याची गट नंबर १५७ मध्ये असणार्या विहीरीत पडला . ही घटना बबन दाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजुच्या शेतकऱ्यांना ही घटना सांगितली . तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे
जखमी झालेला कुत्रा
संचालक सुधीर नवले यांना कळविले . त्यांनंतर वन विभागाशी संपर्क  साधण्यात आला . वन विभागाच्या कर्मचार्यानी उक्कलगाव येथुन पिंजरा आणण्यास सांगितले . त्या नुसार बबन दाणी , बाळासाहेब भुजाडी ,प्रकाश मेहेत्रे ,  वाल्मीक भुजाडी , विजय बर्डे , राजेंद्र बर्डे ,  दत्तु सरोदे , संजय भुजाडी ,  सोहम लगे ,  गणेश मेहेत्रे ,  गोरख काळे ,  अशोक शेळके ,  भास्कर वाघ यांनी उक्कलगाव येथुन पिंजरा आणला .    जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा विहीरीत सोडला  ,परंतु  त्या पिंजर्याच्या कड्याच तुटल्या कसाबसा पिंजरा विहीरीत सोडुन बिबट्याला पिंजर्यात येण्यास भाग पाडले . सायंकाळी साडे आठ वाजता विहीरीत पडलेला बिबट्याला पहाटे  साडे तीन वाजता विहीरी बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले  .या कामी गोखलेवाडीतील तरुणांची मोठी मदत मिळाली . या बाबत वनरक्षक ऐ आर पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा नर बिबट्या असुन त्याची पुर्ण वाढ झालेली आहे तो साडेचार वर्षाचा असावा या वेळी वन विभागाचे एस एम लांडे गोरक्ष सुरसे उपस्थित  होते या वेळी वन अधिकारी फोनच उचलत नसल्याचे शेतकऱ्यांनी  सांगितले तसेच पिंजरे देखील  अद्ययावत असावे असेही शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदीजींनी संपुर्ण देशात लाँक डाउनची घोषणा केली असुन मोलमजुरी करणार्या गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरवठा करण्यात यावा .अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी  पुरवठा मंत्री  नामदार छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे  .         जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा मंत्री नामदार छागन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात देसाई यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वसामान्य जनता घरातच बसुन आहे त्यांना कामधंदा नसल्यामुळे त्यांच्याकडे पैसे उपलब्ध होवुच शकत नाही . शासनाने कार्डधारकांना तीन महीन्याचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय  घेतला असला तरी सर्व सामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे . अनेक कुटूंब अशी आहेत की ती दररोज काम करुन खाणारी आहेत .अशा कुटुंबांनी काय खायचे, हाच मोठा प्रश्न आहे . शासनाने धान्य उपलब्ध करुन दिले असले तरी ते घ्यायला देखील त्यांच्याकडे  पैसा नाही . त्यामुळे शासनाने गोरगरीब जनतेला विनामुल्य धान्य उपलब्ध करुन द्यावे .जेणे करुन गोरगरीब जनतेचा उदरनिर्वाह चालु शकेल, असेही निवेदनात म्हटले आहे .  या निवेदनावर देविदास देसाई  , रज्जाक पठाण, मिनाताई कळकुंबे  ,विश्वासराव जाधव , विजय दिघे  ,बाबा कराड, सुरेश उभेदळ ,बाळासाहेब देवखीळे , मच्छिंद्र पवार , बजरंग दरंदले , चंद्रकांत झुरंगे , भाऊसाहेब वाघमारे ,माणिक जाधव  ,ज्ञानेश्वर वहाडणे  ,गणेश यलम, कैलास  बोरावके  ,गजानन खाडे , खताळ, गणपत भांगरे , रावसाहेब भगत  ,सुरेश कोकाटे , माळवदे , बाबासाहेब ढाकणे  आदिंच्या सह्या आहेत.

सध्या भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आहे तरी सदर बाब लक्षात घेता अहमदनगर जिल्हयात मा जिल्हाधिकारी सो यांनी अहमदनगर जिल्हयात संचार बंदी लागू केली आहे सदरच्या आदेशामधुन अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे तरी अत्यावश्यक सेवा बजावणारे अधिकारी / कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेशी निगडीत असणारे सर्व नागरीक यांना आपली सेवा बजावत असतांना काही अडचण / तक्रार असल्यास त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर फोन करावा अगर व्हॉटसअप क्रमांकावर मेसेज करावा जेणेकरुन आम्हास आपल्या अडचण / तक्रारीचे निवारण करणे सोईस्कर होईल .
नियंत्रण कक्ष अहमदनगर (१) . ०२४१२४१६१०० (२) . ०२४१२४१६१३२ (३) . ०२४१२४१६१३८
(४) . १०० नियंत्रण कक्ष अहमदनगर व्हॉटसअप क्रमांक (१) . ९१५६४३८०८८


बुलढाणा - 24 मार्च
सरकारी अनाज की तस्करी की गुप्त जानकारी मिलने के बाद  चिखली तहसीलदार ने अपनी टीम के साथ एक गोडाउन पर छापा मारकर करीब 525 कट्टे चावल व गेहूं के पकडे हैं. इस मामले में के बाद अंढेरा पुलिस स्टेशन में अनाज तस्कर के खिलाफ जीवनावश्यक वस्तु अधिनियम के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.
      चिखली के तहसिलदार अजितकुमार येले को 23 मार्च की शाम में गुप्त जानकारी मिली कि ग्राम मेरा खुर्द के पास गुट क्र 36 में संतोष डोंगरदिवे के खेत स्थित जिनिंग की इमारत में सरकारी अनाज की कालाबाज़ारी कर ज़खीरा किया गया है पश्चात तहसीलदार येले ने अपनी टीम गठित कर रात 8:30 बजे के करीब चिखली तहसिल के ग्राम मेरा खुर्द के पास उक्त स्थान पर पहोंचे जहां उन्हें एक मालवाहू वाहन क्र MH 20 BT 3995 नज़र आई जो गेहूं के कट्टों से आधी भरी हुई थी पश्चात जिनिंग का जायज़ा लेने पर वहां गेहूं और चावल के पोतों का जखीरा नज़र आया. रात का अंधेरा हो जाने के कारण टीम वहीं रुकी रही और आज सुबह 8 बजे वहां मौजूद अनाज की गिनती की गई जिसमें 435 कट्टे चावल 180 क्विंटल और 89 कट्टे गेहूं 44 क्विंटल मिले जिसे सील कर दिया गया.इस कार्रवाई में चावल,गेहूं,पोते सीने की मशीन,मालवाहू वाहन इस प्रकार कुल 5 लाख 11 हज़ार का साहित्य जप्त किया गया है.तहसीलदार अजितकुमार येले की शिकायत पर अंढेरा पुलिस थाने में आरोपी मनोज पांडुरंग खेडेकर के खिलाफ जीवनावश्यक वस्तु अधिनियम कज धारा 3,7 के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.बता दे कि आरोपी मनोज खेडेकर चिखली कृषि उतपन्न बाज़ार समिति में संचालक है और जिसके पिता बुलढाणा जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष रहे चुके हैं.

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. हा रुग्ण परदेशातून आलेला नाही किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातही आलेला नव्हता.          सदरचा रुग्णाला सर्दी, खोकला येत असल्याने तो स्वत:हून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो कोणाच्याही संपर्कात आलेला नव्हता. त्याला लगेच नगर येथील एका रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. सदरचा रुग्ण हा एका शहरातला असून तो विदेशातून किंवा अन्य कोणत्या गावातून आलेला नव्हता. हा वेगळा स्वतंत्र रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता लोकांनी मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील २०८ जण संशयित असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी जवळपास १९७ जणांना घरी पाठविण्यात आलेले आहे. याशिवाय दोन जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच चिंता व्यक्त केली जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget