अहमदनगर (प्रतिनिधी) हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेला एक रुग्ण रस्त्यावर फिरत असताना पोलिसांना दिसला. शहर पोलिसांनी त्याला सर्जेपुरा येथे फिरत असताना ताब्यात घेतले आहे. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाबरोबर एक व्यक्ती होती. या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिले आहे.लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून घरात थांबण्याचे आहवान करण्यात येत आहे. शहरातील चौका-चौकात पोलीस तैनात आहे. होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेल्यांना घरीच थांबण्याचे आदेश आहे. पोलिसांकडून त्यांची दोन वेळा हजरी घेण्यात येते. आज दुपारी सर्जेपुरामध्ये तोफखाना पोलीस बंदोबस्तावर होते. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघे फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.त्याचवेळी त्या दोघांना पोलिसांनी थांबून चौकशी केली. त्यातील एकाच्या हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानुसार त्याला रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान या रुग्णावर आणि त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपअधीक्षक मिटके यांनी दिली आहे.
Post a Comment