बेलापूर (देविदास देसाई )- बेलापूर परिसरातील गोखलेवाडी शिवारात कुत्र्याला पकडण्याच्या नादात बिबट्या विहीरीत पडला . अखेर मोठ्या प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढण्यात ग्रामस्थ व वन विभागाला यश आले . काल सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास बबन बाबुराव दाणी यांच्या वस्तीवर असणार्या कुत्र्याला पकडण्याच्या नादात बिबट्या दाणी याची गट नंबर १५७ मध्ये असणार्या विहीरीत पडला . ही घटना बबन दाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजुच्या शेतकऱ्यांना ही घटना सांगितली . तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे
![]() |
जखमी झालेला कुत्रा |
संचालक सुधीर नवले यांना कळविले . त्यांनंतर वन विभागाशी संपर्क साधण्यात आला . वन विभागाच्या कर्मचार्यानी उक्कलगाव येथुन पिंजरा आणण्यास सांगितले . त्या नुसार बबन दाणी , बाळासाहेब भुजाडी ,प्रकाश मेहेत्रे , वाल्मीक भुजाडी , विजय बर्डे , राजेंद्र बर्डे , दत्तु सरोदे , संजय भुजाडी , सोहम लगे , गणेश मेहेत्रे , गोरख काळे , अशोक शेळके , भास्कर वाघ यांनी उक्कलगाव येथुन पिंजरा आणला . जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा विहीरीत सोडला ,परंतु त्या पिंजर्याच्या कड्याच तुटल्या कसाबसा पिंजरा विहीरीत सोडुन बिबट्याला पिंजर्यात येण्यास भाग पाडले . सायंकाळी साडे आठ वाजता विहीरीत पडलेला बिबट्याला पहाटे साडे तीन वाजता विहीरी बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले .या कामी गोखलेवाडीतील तरुणांची मोठी मदत मिळाली . या बाबत वनरक्षक ऐ आर पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा नर बिबट्या असुन त्याची पुर्ण वाढ झालेली आहे तो साडेचार वर्षाचा असावा या वेळी वन विभागाचे एस एम लांडे गोरक्ष सुरसे उपस्थित होते या वेळी वन अधिकारी फोनच उचलत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच पिंजरे देखील अद्ययावत असावे असेही शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे
Post a Comment