Latest Post

"डॉ.प्रकाश गरुड,प्रमोद भारुळे उपाध्यक्ष, विष्णू गायकवाड कार्याध्यक्ष तर विनायक सापा,देवदत्त साळवे प्रधान सचिव"

अहिल्यानगर( प्रतिनिधी):---  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त 

 सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत,उपाध्यक्ष पदी प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.प्रकाश गरुड तर कार्याध्यक्ष पदी विष्णू गायकवाड यांची निवड झाली आहे.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हा प्रेरणा मेळावा  रविवार दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता नगर येथील शार्दुल नर्सरी,नालेगाव येथे  संपन्न झाला. 

समितीचे राज्य कार्यवाह कॉ.बाबा आरगडे, राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस अड.रंजना गवांदे या राज्य निरीक्षकांच्या उपस्थितीत पुढील दोन वर्षांकरिता अहिल्यानगर  जिल्हा कार्यकारिणी

निवडण्यात आली.


*नवीन जिल्हा कार्यकारिणी अशी....*


श्री.बाबासाहेब  बुधवंत (जिल्हा अध्यक्ष),डॉ.प्रकाश गरुड व  श्री. प्रमोद भारुळे (जिल्हा उपाध्यक्ष),श्री.विष्णू गायकवाड (जिल्हा कार्याध्यक्ष), श्री.विनायक सापा व श्री.देवदत्त साळवे (जिल्हा प्रधान सचिव), अड.अभय राजे (कायदेशीर सल्लागार), श्री.सुखदेव फुलारी (सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाह),  श्री.शशिकांत गायकवाड (बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.कारभारी गायकवाड (जात पंचायत मुठमाती अभियान विभाग जिल्हा कार्यवाह),

श्री.दीपक शिरसाठ (संविधान जागर विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.बी.के.चव्हाण (विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह),प्राचार्य अशोक गवांदे (निधी संकलन विभाग जिल्हा कार्यवाह),श्रीमती छाया बंगाळ

(महिला सहभाग विभाग जिल्हा कार्यवाह)


यावेळी अशोक सब्बन,कॉ.आप्पासाहेब वाबळे,कॉ.भारत आरगडे, अनिता सापा, प्रा. किसन शेवाळे, अरविंद गाडेकर, काशिनाथ गुंजाळ, हरिभाऊ उगले, विनायक ताकपेरे, शशिकांत जाधव, भावना भारुळे, शब्बीरभाई पठाण, रामचंद्र जाधव, संजय शिरोळे, एड. अभय राजे, शुभम पात्रकंठी, दीपक शिरसाठ, अड. राहुल बुधवंत यांचे सह  जिल्ह्यातील अकारा शाखाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


निरीक्षक कॉ.बाबा आरगडे, डॉ.ठकसेन गोराणे, अड.रंजना गवांदे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब बुधवंत,उपाध्यक्ष डॉ. प्रकाश गरुड,कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, अशोक सब्बन  यांनी मार्गदर्शन करून संघटना वाढीकरिता सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, शाखांच्या नियमित साप्ताहिक शाखा बैठका घ्याव्यात, समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते शाखेत जाणिवपूर्वक जोडून घ्यावेत, महिला व युवांना जोडून घेऊन पुढील दोन महिन्यांत प्रत्येक शाखेचे शाखा कार्यकर्ता व शिक्षक प्रशिक्षण शिबीर आयोजित करावेत, शाळा- महाविद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करावे,सर्वांनी अंनिप या मासिकाचे वर्गणीदार व्हावे, आँनलाईन सभासद नोंदणी केलेल्या सभासदांना त्या त्या ठिकाणी जोडून घ्यावे असे आवाहन केले.

शशिकांत गायकवाड यांनी आभार मानले.

हम होंगे कामयाब  या गीताने प्रेरणा मेळाव्याचा समारोप झाला

बेलापूर ( प्रतिनिधी)-श्रीरामपुर तालुक्यातील कडीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या सहा गाव पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या जलजीवन कामावरील पाईपला भीषण आग लागून  लाखो रुपयांचे  ठेकेदाराचे नुकसान झाले.अग्नीशामक बंड वेळेवर दाखल झाल्याने मोठी हानी टळली.                      सहा गावाला पाणी पुरवठा करणार्या खंडीत पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला अचानक आग लागली .सदरील आगेची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा कारखान्याच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास वेळ लागला शेजारी च शंभर दीडशे फूट अंतरावर असलेले नारळाचे झाडे देखील पेटले. उष्ण वातावरण असल्याने धुराचा लोळ एवढा मोठ्या प्रमाणात होता की दोन अग्निशमन दल येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. सदर कामावरील सुपरवायझर यांच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली असल्याचे नागरिक बोलत होते. सहा गावातील व कोलारसह नागरिक आगार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र वातावरणातील उष्णता व आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला सदर ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. तालुक्यात व जिल्ह्यात जलजीवांचा कामाचा खेळ खंडोबा आणि ठिकाणी पहावयास मिळाला यामध्ये ही घटना घडल्याने अनेक ठिकाणी आपापसात नागरिक बोलताना सांगत होते की जलजीवन म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा अतिशय दिन मे गतीने या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते त्यातच ही आग लागल्याने अजून एक दीड वर्ष पुढे लुटल्याने नागरिक बोलत होते. याआधी देखील ट्रांसफार्मर शिफ्टिंग करताना सदरील पाईप ने पेट घेतला होता तरीही सुपरवायझरने दक्षता घेतली नसल्याचे नागरिक बोलत होते

बेलापूर (प्रतिनिधी )-बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन व जैन स्त्रावक संघ बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या सहकार्याने बेलापूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराचा जवळपास 90 शिबीरार्थींनी लाभ घेतला बेलापूर येथील जैन स्थानकात बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन व जैन श्रावक  संघ बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आनंद ऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा जवळपास 90 लाभार्थ्यांनी लाभ घेतला यात डोळे तपासणी मोतीबिंदू तपासणी तसेच डोळ्यांच्या सर्व आजाराची  तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना नंबरच्या चष्म्याची आवश्यकता होती अशा व्यक्तींना अल्पदरात चष्म्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी आनंद ऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर येथील प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, नेत्र चिकित्सक परमेश्वर मोटे, तसेच आनंद ऋषीजी नेत्रलयाचे जनसंपर्क अधिकारी सागर देवकर उपस्थित होते या शिबिरास जि प सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई यांनी शिबीरास भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष व जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष शांतीलाल हिरण, जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष विजय कटारिया, अमित लुंक्कड,  संदीप देसर्डा, योगेश कोठारी, सचिन कोठारी, विकी मुथा, दिलीप बाठीया, स्वप्निल बोरा आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

बेलापूर ( प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर येथील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपन्न केले असून त्यांनी केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.                             चिरंजीव साईश ढोकणे एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे.त्याने आय एम विनर या परीक्षेत दोनशे पैकी 180 गुण मिळवून राज्यात पाचवा जिल्ह्यात दुसरा व तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. त्याचबरोबर बीटीएस परीक्षेत राज्यामध्ये सहावा जिल्ह्यातील तिसरा तर तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविला तसेच एन एस सी परीक्षेत राज्यात सातवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच मंथन या परीक्षेत राज्यांमध्ये नववा जिल्ह्यात चौथा व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तसेच ऑलिंपियाड या परीक्षेत राज्यात नववा जिल्ह्यात सहावा क्रमांक व तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला तसेच लक्षवेध परीक्षेत राज्यांमध्ये तेरावा जिल्ह्यात आठवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच महात्मा फुले जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. या सर्व स्पर्धेमध्ये चिरंजीव साईश यांने कमी वयात हा बहुमान मिळवला आहे. त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पैठणी मॅडम व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले साईश ढोकणे हा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत



निधन वार्ता.. नरसाळी बेलापूर खुर्द येथील शेतकरी मुरलीधर लक्ष्मण शेलार यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले ते 78 वर्षाचे होते . सर्व समाजातून नातेवाईकात ते नाना म्हणून प्रसिद्ध होते सर्वांच्या सुखदुःखामध्ये अडचणीमध्ये ते सहभागी होत. मोठा कष्टाने त्यांनी परिवार सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.अशोक शेलार व रवींद्र शेलार यांचे ते वडील . अशोक शेलार विद्यापीठात कर्मचारी तर रवींद्र शेलार कार्पोरेट मध्ये अधिकारी आहेत तर  बाबासाहेब शेलार यांचे चुलत बंधू होते. त्यांची पाठीमागे पत्नी कौशाबाई दोन मुले दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे..

येवला,एसएनडी मैदान – येथील एसएनडी मैदानावर पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यात नंदुरबारने श्री शारदा संघावर ३ गड्यांनी विजय मिळवला.


कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्री शारदा संघाला केवळ ७५ धावांत गुंडाळण्यात नंदुरबारच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने यश मिळवले. जय शिंदे आणि सैराम शेलके हे दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले, त्यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.


नंदुरबारकडून दुर्व तपस्वीने भेदक गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला हंसराज आणि तनयने प्रत्येकी २ बळी घेऊन उत्तम साथ दिली आणि शारदा संघाचा डाव लवकर संपवला.


७६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना नंदुरबारच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच गडी गमावले, मात्र संयम राखत त्यांनी फक्त ८ षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला.


इशी गावितने नाबाद २५ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर जॉननेही २१ धावांची उपयुक्त खेळी केली. श्री शारदाकडून विहान कसलीवालने जबरदस्त गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर विराट घेगडमलनेही ३ बळी घेतले आणि पुनरागमनाची आशा निर्माण केली होती.

बेलापूर( प्रतिनिधी)- बेलापूर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळा रंगाच्या फिल्म लावून बेकायदेशीर रित्या फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की  बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये किरकोळ  चोऱ्यांचे प्रमाण  वाढले  होते. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी  परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळा रंगाचे फिल्म लावून बेकायदेशीर  फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी दिवसभर ही मोहीम राबवली. त्यामध्ये अनेक दुचाकी या विना नंबरच्या तसेच फॅन्सी नंबर असलेल्या आढळून आल्या त्या गाड्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.  त्यात 19  दुचाकी विना नंबर तसेच फॅन्सी नंबरच्या दुचाकी आढळून आल्या एका मोटरसायकलवर तर चक्क नंबर प्लेटच्या जागी नंबर न टाकता सरपंच लिहिलेले होते  या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख याच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव  त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे ,  पोहेकॉ सचिन गायकवाड,पोकॉ संपत बडे, भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे, रविंद्र अभंग, पंकज सानप ,महेश थोरात आदिंची ही कारवाई केली. पकडलेली गाडी सोडविण्याकरता अनेकांनी आपल्या मित्रांना पुढार्यांना फोन लावले परंतु कारवाई का केली हे सांगताच त्यांनीही फोनवर  तुमच्या पद्धतीने काय असेल ते करा असा सल्ला पोलिसांना दिला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget